कोरोनावरची लस घेतली म्हणजे संकट टळलं असं नसतयं भिडू….

मागच्या काही दिवसातल्या कोरोना लसीवरच्या बातम्या बघितल्या असल्या तर एक बातमी अधून मधून चर्चेत असते, ती म्हणजे ‘कोरोनाची लस घेतल्यानंतर देखील रिपोर्ट पॉजिटीव्ह आला. यात पहिला डोस घेतलेले तर होतेच शिवाय, दुसरा डोस घेतल्यानंतर देखील काहींचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे.

आता उदाहरण सांगायचं झालं तर, नुकतंच महाराष्ट्रात औरंगाबादमधल्या २ डॉक्ट रांच आणि छत्तीसगडमधल्या जाजगीर या भागाच्या जिलाधिकाऱ्यांचा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर पण रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे लसीबद्दल आधीच संशयाचं वातावरण असताना अशा बातम्यांमुळे त्यांना अधिक हवा मिळते.

पण नक्की कशामुळे लस घेतल्यानंतर देखील रिपोर्ट पॉजिटीव्ह येत आहे? लसीमध्ये काही दोष आहे का? 

तर भिडूनों, यात संशय बाळगायचं आणि घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण लसीमध्ये कोणताही दोष नाही. कारण तूप खाल्लं कि लगेच रूप येत नसतं, किंवा पी हळद आणि हो गोरी, असं पण नसतं.

हा रिपोर्ट पॉजिटीव्ह येण्यामाग २ कारण असू शकतात. 

एक तर समजून घ्या की ही लस दोन टप्प्यात घ्यायची आहे. भारत बायोटेकने सांगितल्याप्रमाणे, लसची एफिशिअन्सी एकूण ८१ टक्के इतकी आहे. यात पहिल्या टप्प्यात लस घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत ५० टक्के अँटीबॉडीज तयार होतात, आणि दुसऱ्या टप्प्यात लस घेतल्यानंतर पुढच्या २८ दिवसांपर्यंत २० ते ३० टक्के अँटीबॉडीज तयार होतात.

म्हणजे काय तर लस घेतलेल्या व्यक्तीला ५६ दिवसांमध्ये १०० टक्के अँटीबॉडीज तयार होतातच असं नाही. 

इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवी म्हणाले,

आता या ५६ दिवसांच्या काळात किंवा त्यानंतर ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे, जे थेट कोरोना रुग्णांच्या सहवासात येतात त्यांना वरच्या २० टक्क्याच्या कमी अँटीबॉडीजमुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असतो.

त्यामुळेच तर लस घेतल्यानंतर देखील सर्व प्रतिबंधात्मक उपाय जस की, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळणं गरजेचं आहे. कारण कोण ८० टक्क्यात आहे आणि कोण २० टक्क्यात आहे हे सांगता येत नाही.   

सायन रुग्णालयाच्या एका आरोग्य कर्मचार्यांला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी सायन रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी देखील असचं काहीस स्पष्टीकरण दिलं होतं.

आता हे मास्क वगैरे कधी पर्यंत पाळणं गरजेचं आहे? 

तर यासाठी आपण पोलिओच उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे भारतातून जरी पोलिओ हद्दपार झाला असला तरी अजूनही आपण लहान मुलांना पोलिओची लस देतो. त्याच कारण म्हणजे अजून देखील पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळतात.

तज्ञ सांगतात, भारतात हा पोलिओचा संसर्ग सांडपाणी किंवा इतर कोणत्याही माध्यमातून येऊ शकतो. त्यामुळे हे लसिकरण अजूनही चालू आहे. आणि जोपर्यन्त शेवटचा विषाणू जात नाही तो पर्यंत चालू राहणार. 

कोरोनाचे देखील असच आहे. जोपर्यंत जगातला शेवटचा कोरोना विषाणू नष्ट होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला धोका आहे. त्यामुळे तोपर्यंत आपण मास्क, सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. लसीचे दोन्ही डोस घेवूनही कोरोनाचा धोका १०० टक्के टाळता येत नाही. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियम पाळून कोरोनाचा धोका १०० टक्के टाळता येतो.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.