२६ जानेवारी देखील एकेकाळी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जायचा

तुम्हांला माहिती आहे का? कि देशाला 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन मिळण्याच्या 20 वर्षाआधी 26 जानेवारी हा दिवस आपल्या देशात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता. त्याला भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एका घटनेची किनार आहे. 

आपण इंग्रजांकडून १५ ॲागस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालो असलो तरी आपला देश इंग्रजांच्याच १९३५ च्या कायद्यान्वये चालत होता. आपला देश स्वतंत्र व्हायच्या आधीपासूनच भारताच स्वतंत्र संविधान बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. ६ डिसेंबर १९४६ रोजी ३८९ लोकांची संविधान समिती स्थापन झाली. या समितीच्या प्रमुखपदी डॅा. राजेंद्र प्रसाद होते. भारताच्या फाळणीनंतर यामध्ये २९९ सदस्य राहिले. या समितीने २२ जुलै १९४७ला आपण राष्ट्रीय झेंड्याची म्हणजेच तिरंग्याची निवड केली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 26 जानेवारीला लाहोरमध्ये पहिल्यांदा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता. होय, तोच लाहोर जो आता पाकिस्तानात आहे, तो पूर्वी भारतीय भूमीचा भाग होता. या लाहोर शहरात २६ जानेवारी हा विशेष दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.

पार्श्वभूमी –

 १९२९ साली लाहोरमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. जवाहरलाल नेहरू अध्यक्षस्थानी होते. ३१ डिसेंबर १९२९ च्या मध्यरात्री या अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात आला. 26 जानेवारी 1930 पर्यंत ब्रिटीश सरकारने भारताला डोमिनियन राज्याचा दर्जा दिला नाही तर भारत स्वतःला पूर्णपणे स्वतंत्र घोषित करेल, असे या ठरावात म्हटले होते. काँग्रेसला आशा होती की ब्रिटिश सरकार या मताशी सहमत होईल, परंतु 26 जानेवारी 1930 ही तारीख आली पण ब्रिटिश सरकारने काहीच केले नाही.

1927 मध्ये 6 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर गांधीजी सक्रिय राजकारणात परतले होते. महात्मा गांधी डिसेंबर 1928 मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सहभागी झाले होते. काँग्रेसचे पहिले काम उग्रवादी डाव्यांशी समेट घडवून आणणे हे होते. डिसेंबर १९२९ मध्ये लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले.

या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी यांची निवड झाली, पण त्यांनी त्यांच्या जागी जवाहरलाल नेहरूंना अध्यक्ष केले, म्हणजेच लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षपद पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बजावले होते.

लाहोर अधिवेशनात पारित झालेले काही ऐतिहासिक ठराव पुढीलप्रमाणे आहेत-

1. या अधिवेशनात नेहरू समितीचा अहवाल पूर्णपणे रद्दबातल ठरवण्यात आला.

2. लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनात पास झालेल्या पूर्ण स्वराजच्या ठरावानुसार, काँग्रेसच्या राज्यघटनेतील स्वराज या शब्दाचा अर्थ पूर्ण स्वातंत्र्य किंवा पूर्ण स्वातंत्र्य असा असेल , हे आता राष्ट्रीय चळवळीचे ध्येय निश्चित करण्यात आले होते.

3. आता संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली आहे.जवाहरलाल नेहरू म्हणाले की आज आपले एकच ध्येय आहे, स्वातंत्र्याचे ध्येय, आपल्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्यवादापासून पूर्ण स्वातंत्र्य. या अधिवेशनात सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

संघर्षाचे काम महात्मा गांधींवर सोपवले गेले आणि अशा प्रकारे राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधींच्या हाती देण्यात आले. 31 डिसेंबर 1929 रोजी मध्यरात्रीची  घंटा वाजली त्याबरोबर 1 वर्ष अगोदर 1928 साली कलकत्ता येथे काँग्रेसने दिलेल्या अल्टिमेटमची तारीख संपताच   जवाहरलाल नेहरू यांनी लाहोरमध्ये रावी नदीच्या काठावर संघर्षलढ्याचा ध्वज फडकावला. 2 जानेवारी 1930 रोजी काँग्रेसच्या नवीन कार्यसमितीची बैठक झाली, त्यात 26 जानेवारी 1930 रोजी संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

15 ऑगस्ट पूर्वी 26 जानेवारी देशाचा स्वातंत्र्यदिन

इंग्रज सरकारची डोमिनियन राज्यासंबंधीचा प्रस्ताव न मानण्याची वृत्ती पाहून काँग्रेस पक्षाने या दिवसापासून सक्रिय चळवळ सुरू केली. 26 जानेवारी 1930 ला लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनात पहिल्यांदा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. यासोबतच दरवर्षी २६ जानेवारीला पूर्ण स्वराज दिन देशभर साजरा करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. २६ जानेवारीला स्वातंत्र्यसैनिक पूर्ण स्वराज्यासाठी प्रचार करतील. अशाप्रकारे, देश स्वतंत्र होण्यापूर्वीच २६ जानेवारी हा दिवस भारताचा अघोषित स्वातंत्र्यदिन ठरला. 1930 पासून ते सन 1947 पर्यंत म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य सैनिक हा दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करत होते.

 २६ जानेवारीचा इतिहास-

या दिवसाचा संबंध आपल्या संविधानाशी जोडलेला आहे. तर १५ ॲागस्टला स्वातंत्र मिळाल्यानंतर दोनच आठवड्यांनंतर २९ ॲागस्ट १९४७ला संविधानाचा मुख्य मसुदा तयार करण्यासाठी ‘मसुदा समिती’ ची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी डॅा. बाबासाहेब आंबेडकर हे होते, त्यांच्यासह एकूण ७ लोकांची मुख्य मसुदा समिती तयार झाली.

२ वर्ष ११ महिने १८ दिवसांच्या अथक मेहनतीनंतर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ला संसदेने मंजूर केली व बरोबर २ महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आणण्याच ठरवल गेल. यानंतरही राज्यघटनेच्या अंमलबजावणीची चर्चा जवळपास वर्षभर सुरू राहिली आणि 24 जानेवारी 1950 रोजी सर्व खासदार आणि आमदारांनी भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षरी केली. यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. त्यामुळे भारताला प्रजासत्ताक देश म्हणून जगात ओळख प्राप्त झाली.

 हे हि वाच भिडू :

 web title : Republic Day : Once upon a time Republic day used to celebrate as Independence Day of India

 

Leave A Reply

Your email address will not be published.