तेलंगणा मधीलं कॉंग्रेस चे हार्ड हिटर म्हणवून घेणारे रेवंत रेड्डी कोण आहेत ?

तेलंगणा कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्षपदी रेवंत रेड्डी यांची नियुक्ती झाली आणि राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. रेवंत रेड्डी यांची त्यांच्या राज्यात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तरुणाई गटात त्यांचे आकर्षण, त्यांची राजकारणातील आक्रमक शैली आणि पॉलीटिकल रेकॉर्ड याच कारणामुळे त्यांची नियुक्ती केल्याचे म्हंटले जात आहे.

एका मुलाखतीत रेड्डी यांनीही मान्य केलं कि,

पार्टी हाय कमांडचे आपल्याला पाठबळ आहे, राहुल गांधींचा माझ्यावर विश्वास आहे. राहुल गांधींशी माझे चांगले संबंध आहेत. मी फक्त एकदा प्रियांका गांधींना भेटलो, पण त्यांच्याशी कोणत्याही विस्तृत राजकारणाच्या विषयावर चर्चा होऊ शकली नाही.

मलकाजगिरी मतदारसंघातील कॉंग्रेसचे ५३ वर्षीय खासदारांना गेल्याच महिन्यात प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले गेले. हे पद पदरात पाडण्यासाठी त्यांनी कमीतकमी चार राजकीय दिग्गज नेत्यांना मागे टाकलं होतं. आणखी एक महत्वाचं म्हणजे, तेलंगाना मध्ये महत्वाच्या असलेल्या चारही राजकीय पक्षाचे भाजपा, तेलंगणा राष्ट्र समिती आणि तेलगू देशम पार्टीचे ते सदस्य राहिले आहेत.

इतके पक्ष बदलून तरीही त्यांना अध्यक्ष केलं गेलं हे चकित करणारं आहे.

पण घडामोड घडली जेंव्हा राज्यात कॉंग्रेस कमकुवत होत होती आणि त्याचदरम्यान राज्यात भाजपाचा  उदय दरम्यान हे घडले आहे.
राजकारणाचा क्रिकेटप्रमाणे विचार करा असं रेड्डी म्हणतात.

कसोटी सामन्यांमधून आपण टी -२० सामन्याकडे गेलो आहोत. तर, हिट आऊट किंवा गेट आउट होण्यासारखे आहे आणि सध्या तेलंगणातील राजकीय परिस्थिती अशीच आहे. येथील बहुतेक लोकसंख्या १८-ते ५५ वयोगटातील आहे, तेव्हा त्यांच्यात लोकप्रियता मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची आणि विरोधी ‘हिट’ करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आहे, असा मी विचार करतो.  रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस पुढील चार मंत्रावर अवलंबून आहे ते म्हणजे,

धोरणे, कॅलक्युलेशन, कम्युनिकेशन आणि अंमलबजावणी.

सर्वप्रथम, पीसीसीचे नवे अध्यक्ष लवकरच विभागीय स्तरीय कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतील आणि तळागाळातील केडरला बळकट करण्यासाठी एक रोडमॅप तयार करतील. त्यांनी हे हि वेळीच स्पष्ट केलं आहे कि, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव किंवा केसीआरशी स्पर्धा करण्यासाठी सद्या तरी पक्षाकडे निधी किंवा संसाधने नाहीत. 

टीआरएस हा पैसा आणि बळावर राजकारण करतो, असा आरोप त्यांनी केला.

रेड्डी यांनी मुख्यमंत्री राव यांच्यावर आरोप केलेत कि, ते मंत्र्यांसमवेत हुकूमशहाप्रमाणे वागतात,  पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आणि केसीआर यांच्यात हीच समानता अही असंही ते म्हणाले आहेत.

मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री फक्त उपस्थिती लावतात, त्यापेक्षा जास्त काही करीत नाही. फार तर फार हे मंत्री फक्त फायलींची क्रमवारी लावण्यास मदत करतील. राज्यात हि आणखी वाईट स्थिती आहे. केसीआरच्या मंत्रिमंडळातील मंत्री फक्त नोकरदार असतात, जे चहाचे कप इकडे तिकडे नेतात. असं मी म्हणत नाहीये तर, केसीआरचे माजी मंत्री एटाला (राजेंद्र) यांनी पक्ष सोडतांना हि गोष्ट जाहीररीत्या सांगितली होती.

आता पुन्हा ‘केसीआर यापुढे तेलंगणाच्या लोकांच्या भावनेसोबत खेळू शकत नाही. लोकांना आता कळून चुकले आहे, कारण याच लोकांनी तेलंगानासाठी संघर्ष केला त्यामागील एक कारण म्हणजे आपल्याकडचे स्वातंत्र्य आहे,

परंतु मोदींच्या राजवटीत तर लोकं टीका तर सोडा तक्रार हि करू शकत नाहीत.

रेड्डी यांना पीसीसी चीफ म्हणून बढती देण्याव्यतिरिक्तहि इतरीही हालचाली तेलंगणा मध्ये चालू आहेत. वाय.एस. शर्मिला, तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन रेड्डी यांच्या बहिणीने 8 जुलै रोजी स्वत: ची राजकीय संस्था – वायएसआर तेलंगणा पार्टी सुरू केली आहे.

केसीआर लवकरच निवडणुका घेण्याची मागणी करेल असा विश्वासही कॉंग्रेस प्रमुखांनी व्यक्त केला आहे पण १५ ऑगस्ट २०२२ च्या निवडणुकीमध्ये भाजप तसेच वागेल जसे २०१८ मध्ये त्यांचे प्रयत्न दाखवले होते.  असंही म्हणलं जातंय कि, पुढील निवडणुकींच्या काळात असदुद्दीन ओवैसी हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जातील, कारण रेड्डी आणि ओवेसी हे दोघेही चांगले मित्र आहेत.

स्वत: चा प्रबळ विरोधक म्हणून प्रस्थापित करणाऱ्या कॉंग्रेसला तिसर्‍या क्रमांकावर नेऊन ठेवण्यासाठी  भाजप आक्रमकपणे प्रयत्न करीत आहे. परंतु या प्रयत्नांना रेवंत रेड्डी तितक्याच आक्रमकपणे उत्तर देतील का हे पाहणे महत्वाचे ठरते.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.