पांडू बघितल्यावर लक्षात आलं, पोलीसाला पण कुकरच्या शिट्ट्या मोजाव्या लागतात.

पोलीस स्टेशनला काॅल येतो दंगल झाली. पांडू साहेबांच्या समोरच असतो. एका क्षणात सुस्तावलेलं स्टेशन खडबडून जागं होत.

साहेबांच्या रुममध्ये पोलीस शिपायांपासून ते पांडू पर्यन्त सर्वजण जमतात.

साहेब आयपीएस कॅडरचा. म्हणजे त्यांच्या मोडक्या तोडक्या मराठीवरून आपल्याला समजलेलं असती की ते एसीपी वगैरे असतील.

साहेब सूचना देतात.

व्हॅन घेवून निघा. काही झाल्यास वाॅकीटाॅकीवरून संपर्क करा. काहीही होवूदे माॅबच्या मागे जावू नका. गनचा वापर करू नका. सिव्हिलियन्सला प्रोटेक्ट करा.

साहेब आपल्या चालकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ॲाफिसकडे निघतात.

इकडे पांडू आणि त्यांची गॅंग व्हॅनमध्ये बसू लागते. दंगलीत आवश्यक असणारी सगळी सामग्री सोबत घेतलेली असते.

पांडू पोलीस व्हॅन सुरू करायची ॲार्डर देतच असतो तोच काहीच दिवसात रिटायर होणारा पोलीस नाईक येतो.

पोलीस दलात याची दंगल एक्सपर्ट म्हणून ओळख असते. आयुष्यातल्या बऱ्याच दंगलीचा बिमोड एकट्याने केला आहे हे भाव त्याच्या चेहऱ्यावर असतात. बाकीचे पोलीस नाईकला पाहून नाईकबाच्या नावाची घोषणा देतात.
पण पांडू त्याला सोबत घेवून जायला नकार देतो. नाईक नाराज होवून जातो.

आत्ता ही व्हॅन दंगलग्रस्त भागातून फिरत असते.

एका ठिकाणी उतरून जमावाला पांगवल जातं. काॅन्फिडन्स वाढतो. आत्ता व्हॅन दूसऱ्या भागांत जाते तोच व्हॅनवर दगडांचा मारा होवू लागतो. ऐन जमावाच्या तावडीत व्हॅन सापडते. समोर जाळपोळ सुरू असतेच.

पांडू पाठीमागून समोरच्या ड्रायव्हरला व्हॅन यू टर्न घेण्याचा आवाज देत राहतो. गडबड वाढू लागते पण व्हॅन सहीसलामत त्या माॅबमधून सुटते.

सर्वजण सुटकेचा निःश्वास टाकतात. टिममधली लेडी काॅन्स्टेबल आपल्या बॅगमधून शेंगदाण्याच पाकीट घेवू खावू लागते.

इतक्यात वाॅकीटाकीवरून साहेबांचा संदेश येतो. तुम्ही पोलीस स्टेशनला या. सर्वांची जीव भांड्यात पडतो.

व्हॅन पोलीस स्टेशनच्या दिशेने वळवली जाते. पण रस्त्यांवर माॅब आहेच, दंगल जाळपोळ सुरूच आहे.

अशातच व्हॅनचा चालक व्हॅन थांबवतो. पांडू विचारतो काय झालं तेव्हा तो एक नंबर लागल्याची खूण करतो. गाडी थांबवून तो लघवीला जातो.

पाठीमागे बसलेल्या सर्वांच्या चर्चा रंगात येतात. पण आपल्या डोक्यात विचार चालू असतो अचानक माॅब आलाच तर. कारण ड्रायव्हर तर लघवीला गेला आहे.

इतक्यात ड्रायव्हर शेजारी बसणारा देखील लघवीला जाण्याचं विचारतो. आत्ता शंका वाढते. इथं दिग्दर्शक आणि लेखकांने काहीतरी मोठ्ठ कांड लिहलं असणार हे फिक्स होतं. पांडु ड्रायव्हरच्या शेजारच्याला देखील परवानगी देतो.

आत्ता एका गल्लीबोळाच्या रस्त्यावर ती व्हॅन उभा आहे. पाठिमागे पोलीस दल आहे. काही घडलच तर व्हॅन चालवायला कोणी नाही.

तरिही इकडे चर्चा रंगात आलेल्या असतात. अचानक बाहेरून आवाज येतो. सर्वजण शांत होतात. माॅबला व्हॅन आयती तावडीत सापडल्याची शंका मनात येते.

तोच दारावर जोरात धाप पडते. पांडू सर्वांना शांत रहाण्याची ॲार्डर देतो. गन ताणली जाते. दरवाजा एकदम उघडून समोरच्या अज्ञात गोष्टीवर आक्रमण करायचं हे फिक्स झालेलं असतं.

दरवाजा उघडताच समोर दिसते ती गाऊनमधली बाई. ती म्हणते,

दंगल चालूय न. म्हणून तुमच्यासाठी बिस्कीट आणि पाणी घेवून आले.

तिच्या या डाॅयलाॅगवर हवलदार गायकवाडांच उत्तर असतं,

अहो बाई पूर आणि दंगल यातला फरक कळतो का?

यावेळी नेमकं काय होतं तर आपल्या चेहऱ्यावर एक समाधान असतं. पडद्यावर का होईना या पोलीसांना काहीच न झाल्याचं समाधान.

पांडु या वेबसिरीज मधला हा एक प्रसंग.

वेबसिरीज नेमकी कशी आहे हे सांगण्यासाठी हा प्रसंग पुरेसा बोलतां वाटतो.

एकामागून एक घडलेले प्रसंग अजिबात मोठ्ठे, काहीतरी गुढ असणारे, सस्पेंन्स क्रिएट करणारे नाहीत.

मध्यंतरी एका पीएसआय झालेल्या मित्राला बऱ्याच वर्षांनंतर फोन केलेला. मित्र पीएसआय झाला. त्यातही मुंबईला पोस्टिंग मिळालं.

आत्ता पिक्चरसारखं काहीतरी सस्पेंन्सवालं काम करत असेल म्हणून फोन केला तेव्हा तो म्हणाला एखाद्या सरकारी ॲाफीसमध्ये जसं टेबलवर बसून काम करतात तसं चाललंय. दिवसभर येणाऱ्या कम्पेंन्ट लिहून काढायच्या.

खरं पोलीस स्टेशन कमीअधीक फरकाने असच असत. तेच सुस्तावलेलं जग. तीच पोलीस लाईन. पोलीस अधिकाऱ्याला देखील कुकरच्या शिट्या मोजाव्या लागतात. त्यालापण डब्यात रोज रोज तेच खावून कंटाळा येतो.

पण या सगळ्यात छोटे छोटे किस्से घडतात. ते सर्व या सिरीजमध्ये पहायला मिळतात. दिल खुष टाईप घरातल्यांसोबत एखादी सीरीज बघायची असेल तर पांडू अवश्य बघावी.

बाकी खासकरून उल्लेख करावा लागतो तो सुहास शिरसाट आणि गेंडा स्वामी म्हणून आपल्याला माहित असणारे दिपक शिर्के आणि तृप्ती खामकर यांचा.

सोबतच आपल्या छोट्या छोट्या प्रसंगातून अबिष मॅथ्यू यांनी पण फोडलं आहे.

Mx प्लेअरवरती आपण पांडू पाहू शकता.

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.