टिंडरवर डेटिंग करता आलं नाही म्हणून जगातील एकमेव पांढऱ्या गेंड्याचा मृत्यू !!!

 

केनिया मधील सुप्रसिद्ध ओलपजेटा संग्राहलयातील नार्थन व्हाईट ऱ्हायनो अर्थात पांढरा गेंडा असणाऱ्या सुदान या गेंड्याचं वार्धक्यामुळे निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते.

सुदान नाव असणारा हा पांढरा गेंडा त्यांच्या जातीतील एकमेव पांढरा गेंडा म्हणून जगविख्यात होता. मुर्ती महान पण किर्ती लहान ही उक्ती साध्य करत सुदानने त्याच्या ४५ वर्षाच्या कालखंडात कोणतेच कांड न केल्यामुळे तो त्याची पुढील पिढी जन्माला घालू शकला नाही. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही पत्नी अनुक्रमे नाझिन आणि फातू शिल्लक राहिल्या असून त्यांना आत्ता नवरा नसल्याने ही प्रजाती नष्ट झाल्याचं केनियामध्ये बोललं जात आहे.

 

Screen Shot 2018 03 20 at 5.57.22 PM
reuters

सुदान हे मुळचे झेक प्रजासत्ताक स्थित डेवर कार्ललोव्ह संग्रालयातील निवासी होते. तिथेच त्यांच एकमेवाद्वितीय असणं सिद्ध झाल्यानंतर त्यांना केनियामध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं होतं. या संग्रहालयात असणाऱ्या माद्यांबरोबर नैसर्गिकरित्या संबध घडवून आणण्यास प्राणीसंग्रहालयातील “काम”गारांना अपयश आलं. या अपयशाचे कठोर घाव झेलत सुदानच्या वार्धक्यात देखील आपण प्रयत्न करू अशी इच्छा बाळगत त्या कामगारांनी त्यांची प्रोफाईल चक्क टिंडर या जगप्रसिद्ध डेटिंगडिंगडांग या साईटवर बनवली होती. मात्र तिथे सुद्धा मादी न भेटल्यामुळे अखेर सुदान यांना वंशाचा दिवा निर्माण करता आला नाही.

दरम्यान केनियाचे विरोधी पक्षनेते श्री. टांग्झन वायकू यांनी टिंडरच अपयश पचवू न शकल्यानं या गेंड्यानं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र हा आरोप गेंड्याच्या कातडीप्रमाणे झेलून केनियाचे पंतप्रधानांनी, “आम्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या जातीच्या गेंड्याची पुनरुत्पादन घडवून आणण्याचा आशावाद केनियन जनतेला दिला.”

Screen Shot 2018 03 20 at 5.57.42 PM

आपण पाहूया या शेवटच्या जातीच्या गेंड्याची थोडक्यातली वैशिष्ठे –

१) या गेंड्याचा रंग पांढरा असल्याचं बोलल जात असलं तरी पांढरा न दिसणारा पांढरा गेंडा म्हणून तो विशेष प्रसिद्ध होता.

२) शिकारीच्या वाढत्या कंडामुळे हा गेंडा नामशेष झाल्याचं बोललं जात आहे.

३) या गेंड्याच्या शिंगाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ५०,००० डॉलर म्हणजे ३२ लाखांच्या आसपास असल्याची चर्चा आहे..

जगातल्या या शेवटच्या गेंड्याला बोल भिडू टिमकडून भावपुर्ण श्रद्धांजली !!!

टिप –  बातमी खरी असून ती सिरीयसच बातमी होती पण गेंड्याचं कातडं पांघरलेल्या उपसंपादकांनी या बातमीचा बाजार उठवला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.