नालायकपणा बघा, गरिबांना जे अन्न देण्यात येत आहे त्यावर श्रीमंत लोक कसा डल्ला मारतायत.

संकटाच्या काळात माणसांची किंमत खऱ्या अर्थाने कळते. जवळची लोकं अशा वेळी दूर जातात आणि दूरची लोकं जवळ येतात. आपल्यासाठी झटणाऱ्या माणसांची नव्याने ओळख होते. माणूसकी हा माणूस अशाच अडचणीच्या काळात शिकतो.

पण वाईट गोष्टींच काय. समाजात वाईट लोकं पण असतात. कधीकधी नालायकपणाचा कळस इतका घाण असतो की त्यावर काय बोलायचं हेच समजत नाही.

असाच एक प्रकार छत्तीसगडच्या रायपुरमधून समोर आला. राजस्थान पत्रिकामध्ये ही बातमी छापण्यात आली. 

काय झालं तर छत्तीसगडच्या रायपुरमध्ये नगरपालिकनेद्वारे एक स्किम सुरु करण्यात आली.

या स्किमअंतर्गत गरिब व गरजू लोकांना मोफतमध्ये तयार जेवण देण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे ज्यांचा रोजगार बंद आहे, ज्या व्यक्तिंच हातावर पोट आहे. ज्यांना किराणामाल विकत घेता येत नाही. घरात उपाशी लोक आहेत अशा व्यक्तिंसाठी मोफत अन्न पुरवण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

नगरपालिका क्षेत्रातले गरजू लोक फोन करुन आपल्या घरात किती लोक उपाशी आहेत हे सांगत व त्यानुसार नगरपालिकेचे कर्मचारी व स्वयंसेवक त्यांना घरात नेवून फूड पॅकेट देवू लागले.

इथपर्यन्त सर्वकाही चांगल होतं. लोकांच्या मदतीला प्रशासन धावून चाललेलं होतं.

पण झालं काय काही स्वयंसेवक जेवणाचे फुड पॅकेट घेवून सांगितलेल्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना वाईट वाटू लागलं, कारण गरिबांसाठी असणाऱ्या या योजनेचा फायदा श्रीमंत लोकं घेवू लागले. 

Screenshot 2020 04 09 at 10.32.27 AM

याबद्दल माहिती देताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की,

आम्ही जेव्हा अन्न घेवून दिलेल्या ठिकाणी गेलो तेव्हा तो एक सधन बंगला होता. बंगल्याच्या बाहेर उंची गाड्या होत्या. पहिल्यांदा आम्हाला लोकेशनबाबत शंका वाटली म्हणून आम्ही फोन केला तर बंगल्यामधून एक व्यक्ती आली व त्यांनी अन्न मागितल्याचं सांगितलं.

आम्ही त्यांना सांगितलं की हे अन्न गरिब व गरजू लोकांसाठी आहे. हे ठराविक संख्येत उपलब्ध आहे. तुम्ही अस कराल तर गरिबांच्या तोंडाचा घास घेतला जाईल. तरिही त्यांनी हे अन्न घेतलं. व आपल्या घरात कामवाली येत नसल्याने स्वयंपाक करायला वेळ नसल्याचं कारण सांगून आतमध्ये गेले.

याबाबत माहिती देताना रायपुरचे महाप्रबंधक जनसंपर्क अधिकारी आशिष मिश्रा सांगतात,

रोज किमान १० ते १५ व्यक्ती अशा असतात ज्या श्रीमंत घरातून आहेत. ज्यांच्या घरी स्वयपांक करण्याची अडचण नाही. मात्र मोफतमध्ये तयार अन्न मिळत आहे म्हणून ते या योजनेचा फायदा घेत आहेत. 

आत्ता सांगा अशा गोष्टींना तुम्ही काय म्हणाल.

याबद्दल मराठीत एक चांगली म्हण आहे. मढ्याच्या टाळूवरच लोणी खाणारी जमात. ही लोकं त्याचं कॅटेगरीत येतात.

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Vitthal says

    आमच्या येथील वस्तीत पण हेच होत आहे शिवसेना पक्षाकडून जी मदत येते ती फक्त पदाधिकारी गटप्रमुख यांना आणि यांच्या संपर्कात असलेल्या लोकांना फोन करून बोलावून दिली जाते नवाब मलिक यांच्या कडून येणारी मदत विशेष समाजाला दिली जाते ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना ती मिळत नाही ज्यांना घराचे भाडे भरण तर दुर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे अशांना मिळत नाही फार मोठी शोकांतिका आहे ‌‌‌या लोकांना कस कळत नाही की आपण खरंच ज्यांना गरज आहे त्यांचा हक्क मारतोय मरण दाराशी येऊन उभे आहे तरी कळत नाही ज्यांना त्यांना काय म्हणावे

Leave A Reply

Your email address will not be published.