अंबानी इतकाच पैसा पण हे सहाजण अती कंजूस माणसं..

जॉन कॅडवेल

ब्रिटनमधील ख्यातनाम उद्योगपती असणारे जॉन कॅडवेल आजदेखील आपल्या ऑफिसला सायकलवरून जातात. त्यांनी ठरवलं तर ते जगभरातील कुठलीही महागडी गाडी स्वतःसाठी खरेदी करू शकतात. मात्र गाडीवरचा खर्च त्यांना निरर्थक वाटतो. त्यांच्या बाबतीत असं देखील सांगितलं जातं की दाढी तर सोडून द्या ते स्वतःचे केस कापण्यासाठी सुद्धा ते सलूनवर जात नाहीत. स्वतःची कटिंग ते स्वतःच करतात. कपड्यांची खरेदी देखील ते फक्त त्याचवेळी करतात ज्यावेळी बाजारात कुठलातरी सेल लागलेला असतो.

जीन पॉल गेटी

जीन पॉल गेटी हे अमेरिकेतील उद्योजक होते. होते अशा साठी कारण ते सध्या हयात नाहीत. त्यांच्याविषयी असं सांगितलं जातं की एकवेळा काही लोकांनी त्यांच्या नातवाचं अपहरण केलं होतं. अपहरणकर्त्यांनी ज्यावेळी खंडणीसाठी फोन केलं त्यावेळी त्यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. एक किस्सा असा देखील आहे की त्यांच्या घरात तो फोन होता तो त्यांच्याशिवाय कुटुंबातील इतर कुठल्याही सदस्याने वापरला तर गेटी त्याबदल्यात त्याच्याकडून पैसे वसूल करत असत.

वारेन बफेट

जगप्रसिद्ध गुंतवणुकदार असणारे वारेन बफेट १९५८ सालापासून एकाच घरात वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे एक स्वस्तातली गाडी आहे, जी ते स्वतःच चालवतात. गाडी चालविण्यासाठी कुठलाही ड्रायव्हर त्यांनी ठेवलेला नाही. आपल्या दैनंदिन खर्चासाठी त्यांनी साधारणतः २५० रुपये ही मर्यादा ठरवून घेतलेली आहे. त्याशिवाय अधिक खर्च ते दिवसभरात करत नाहीत. ते मोबाईल आणि लॅपटॉप देखील वापरत नाहीत.

मार्क झुकरबर्ग

फेसबुकचा संस्थापक असणारा मार्क झुकरबर्ग आपल्याला अनेक कार्यक्रमामध्ये एका करड्या रंगाच्या टी-शर्ट मध्ये दिसतो, कारण त्याच्याकडे या रंगाचे काही टी-शर्ट आहेत तेच तो वापरतो. याव्यतिरिक्त कपड्यांवर फारसे पैसे खर्च करणं त्याला आवडत नाही. याव्यतिरिक्त फिरण्यासाठी महागड्या कारऐवजी स्वस्तातली कार वापरणं झुकरबर्गला आवडतं.

अझीम प्रेमजी

विप्रोचे अझीम प्रेमजी यांच्या साधेपणाचे किस्से देखील प्रसिद्ध आहेत. ते अजूनही एक जुनी गाडी वापरतात आणि शक्य असेल तर छोट्या अंतरावरील प्रवासासाठी ते टॅक्सीचा वापर देखील करतात. आपल्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांना देखील ते नेहमी बचत करण्याचा सल्ला देत असतात.

चार्ली इर्गेन

डिश नेटवर्कचे प्रमुख असणारे चार्ली इर्गेन हे साध्या राहणीमानासाठी आणि बचतीवर भर देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. स्वतःची बहुतेक कामं ते स्वतःच करतात, त्यासाठी दुसरी व्यक्ती ठेऊन ते आपला खर्च वाढवणं त्यांना आवडत नाही. जेव्हा कधी कामानिमित्त बाहेर असताना बाहेर हॉटेलवर राहण्याची वेळ येते त्यावेळी ते शेअर रूममध्ये राहायला प्राधान्य देतात.

अर्थात आता या सर्वांनाच कंजूष म्हणायचं की त्यांच्या साध्या राहानीमानाचं कौतुक करायचा हा निर्णय तुमचा तुम्ही घ्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.