मुंबईतली ७ सगळ्यात जास्त श्रीमंत ठिकाणं, इथली महिन्याची भाडी ऐकून तर फ्यूजा उडतीला…
जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान..
मुंबईला कोणी स्वप्ननगरी म्हणतं तर कोणी मायानगरी. असं म्हणतात मुंबई शहरात माणसं आपली स्वप्न पूर्ण करायलाच येत असतात. हे शहर सगळ्यांना सामावून घेतं, तुमची कष्ट करायची तयारी असली की झालं.
राहण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत तुमची सगळी व्यवस्था हळू हळू लागत जाते. दोन वेळेचं जेवण आणि हातात चार पैसे एवढं तर मिनीमम तुमच्याकडे असतच.
पण या शहराला दुसरीही बाजू आहे बरं.. आणि ही दुसरी बाजू म्हणजे मायानगरी मुंबई. या मायानगरीत कसं सगळं आलीशान असतं आणि ह्या मुंबईची शानही काही वेगळी असते.
विषय आहे मुंबईच्या श्रीमंतीचा. मुंबईच्या पॉश लाइफस्टाइलचा. जी आपल्याला फारशी फॅमिलियर नाहीये पण आपल्याला या लाइफ स्टाइलबद्दल फॅसिनेशन मात्र खूप आहे.
मुंबईतले ७ सगळ्यात पॉश आणि एक्सपेन्सिव्ह, थोडक्यात सगळ्यात जास्त श्रीमंत एरियाज, जे मुंबईला मायानगरीची ओळख देतात.
मलबार हिल
पहिला येतो मलबार हिल एरिया, म्हणजे साऊथ मुंबईचं एक टोक. आता तुमच्या झटकन लक्षात येईल असा लॅंडमार्क सांगायचा झाला, तर मलबार हिल एरियात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आहे. त्यामुळे एरिया तर महागच असणार यात काय दुमत नाही.
मलबार हिल हा मुंबईतला सगळ्यात एक्सक्लूझिव आणि एक्सपेन्सिव एरिया मानला जातो ते काय उगाच नाय. ह्या एरियात राहणारे जवळ जवळ सगळेच करोडपती आहेत. शिवाय बाणगंगा, बाबूलनाथसारख्या इतिहास लाभलेल्या वास्तू सुद्धा ह्याच परिसरात येतात.
मलबार हिलचा सरासरी प्रॉपर्टी प्राइज रेट, पर स्क्वेअर फुट ५० हजारांच्या आसपास आहे आणि इथल्या घरांचं महिन्याचं भाडं साधारण साडेचार लाखांच्या आसपास आहे.
कफ परेड
दूसरा श्रीमंत एरिया आहे कफ परेड. साऊथ मुंबईचं एक टोक जर मलबार हिल असेल तर दुसरं टोक म्हणजे कफ परेड हा एरिया. नरीमन पॉइंटला लागूनच हा एरिया आहे. कफ परेड ह्या परिसरात आपल्याला सगळ्यात जास्त फाइव्ह स्टार हॉटेल्स दिसतात आणि इथे घरं कमी आणि कमर्शियल ऑफिसेस आणि वर्कप्लेसेस जास्त आहेत.
कफ परेडचा सरासरी प्रॉपर्टी प्राइज रेट पर स्क्वेअर फुट ४८ हजारांच्या आसपास आहे आणि इथल्या घरांचं महिन्याचं भाडं साधारण तीन लाखांच्या आसपास आहे.
पेडर रोड, ताडदेव
तिसरा एरिया म्हणजे पेडर रोड आणि ताडदेवचा एरिया. आता ह्या एरियात भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस राहतो म्हटल्यावर विषय संपला.
पेडर रोडला लागून आणि ताडदेवजवळ असलेल्या अल्टामाऊंट रोडला मुकेश अंबानी यांचा अँटीलिया नावाचा टॉवर आहे. ताडदेव परिसरात बरेचसे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत शिवाय मोठ्या शैक्षणिक संस्था आणि हेल्थकेअर इंस्टीट्यूट्स आहेत.
ताडदेवचा सरासरी प्रॉपर्टी प्राइज रेट, पर स्क्वेअर फुट ४७ हजारांच्या आसपास आहे भाड्यानं घर घ्यायचं म्हणालात, तर साधारणपणे अडीच लाखांच्या आसपास जातं.
जुहू
मुंबईतला चौथा सगळ्यात श्रीमंत एरिया म्हणजे जुहू. जुहू हा भाग मुंबईच्या वेस्टर्न सबर्ब मध्ये येतो. याच भागात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार अशा मोठ मोठ्या सेलेब्रिटीजची मोठ मोठी घरं आहेत. सेलेब्रिटीजमुळे आणि इथं असणाऱ्या जुहू बीचमुळे, परिसरातल्या घरांच्या किमती जास्त आहेत.
जुहू जवळचा सरासरी प्रॉपर्टी प्राइज रेट, पर स्क्वेअर फूट ४४ हजारांच्या आसपास आहे, महिन्याचं भाडं साधारण पावणे दोन लाख धरुन चला.
बांद्रा
नंतर पाचवा येतो मुंबईतला बांद्रा एरिया. बांद्रा म्हटलं की आपल्या सगळ्यांना पहिले आठवतात ते तिथे असलेले सलमान शाहरुखचे बंगले. बांद्र्याच्या पश्चिम भागात बरेच नाइट क्लब्स, डिस्को बार्स, बरेच मोठ मोठे रेस्टॉरंट्स आणि कॅफेज आहेत. शिवाय सलमान शाहरुखची घरं आहेत म्हटल्यावर लोकाना आधीच ह्या एरिया विषयी फॅसिनेशन असतं.
बांद्र्याच्या पश्चिम भागातला सरासरी प्रॉपर्टी प्राइज रेट, पर स्क्वेअर फूट ४२ हजारांच्या जवळपास आहे. आणि इथल्या घरांचं महिन्याचं भाडं सुमारे ९५ हजारांपर्यंत जातं.
वरळी
सहावा श्रीमंत एरिया येतो वरळीचा. वरळी भागात राहण्याचं मोठं आकर्षण आहे बांद्रा वरळी सी लिंक. अनुष्का शर्मा विराट कोहली, दीपिका पदूकोण, अभिषेक बच्चन या सेलेब्रिटीजची इथं घरं आहेत.
वरळीजवळ नेहरू सायन्स सेंटर आहे, वरळी सीफेस आहे, वरळी फोर्ट आहे आणि हाजी अलीचा दर्गा सुद्धा आहे शिवाय वरळी जवळच्या भागात अनेक मॉल्स आणि लोकांना राहण्यासाठी सुखसोयी सुद्धा उपलब्ध आहेत.
वरळी भागातला सरासरी प्रॉपर्टी प्राइज रेट, पर स्क्वेअर फूट ३७ हजारांच्या घरात आहे, भाडं जरा (बाकीच्यांपेक्षा) कमीये, म्हणजे ८० हजार.
महालक्ष्मी
सातवा श्रीमंत एरिया म्हणजे महालक्ष्मी. इथलं महालक्ष्मी मंदिर आणि महालक्ष्मी रेसकोर्स ही मुंबईतली दोन महत्वाची आकर्षणं. महालक्ष्मी मंदिराचा परिसर हा सुद्धा पेडर रोडला लागूनच असल्यामुळे हा एरिया सुद्धा सगळ्यात श्रीमंत एरियांमध्ये गणला जातो. शिवाय या एरियाजवळच जसलोक हॉस्पिटल सुद्धा आहे.
या भागातला सरासरी प्रॉपर्टी प्राइज रेट, पर स्क्वेअर फूट ४० हजारांच्या घरात आहे आणि इथलं महिन्याचं भाडं ५० हजाररुपये फक्त.
आता ह्या सगळ्या एरियांच्या किमती थोड्या फार प्रमाणात वर खाली होत असतात आणि कायम बदलतच असतात. पण साधारण अंदाज घेतला तर हे सात मुंबईतले सगळ्यात श्रीमंत एरियाज आहेत असं आपण नक्की म्हणू शकतो.
त्यामुळं स्वप्न बघायची, तर इथं राहायची बघा भिडू, त्यात खरी मजाय.
हे ही वाच भिडू:
- बाहेरून झोपडपट्टी दिसत असली तरी ‘धारावी’ म्हणजे अनेक इंडस्ट्रीजचं एक भलं मोठं जाळं आहे.
- साऊथ मुंबईत रिक्षाला बंदी का आहे माहिताय का..? ही आहेत कारणं…
- मुंबई पोलीस ग्रेट का आहेत, एका छोट्या पुराव्यावरून असा शोधलेला खूनी..