या आमदार, खासदारांना विकत घेता येणार नाही, इतके ते श्रीमंत आहेत.

 

सगळ्यात जास्त पैसा कोणत्या राजकारण्याकडे आहे. ? दिवसातून दहा वेळा चर्चेत येणारा प्रश्न. कर्नाटकतल्या आमदारांना शंभर कोटी ऑफर केल्यानंतर तर हा प्रश्न चर्चेच्या मुख्य अजेंड्यावरच आला आहे. कोण किती श्रीमंत आहे.नको नको ती नाव घेवून डोक्याला ताप वाढवायचे हे उद्योग बंद व्हावेत म्हणून याहू फायनान्सने भारतातील दहा श्रीमंत राजकारण्याची लिस्ट जाहिर केलेय. बघा कोण कोण आहे यादीत. आणि सेव्ह पण करुन ठेवा. पुढं मागं आरोप झाले की एकमेकांच्या कार्यकर्त्यांच्या तोंडावर फेकून मारायला उपयोगी येईल…

१) जया बच्चन.

तब्बल १००० रुपये मालमत्ता गोळा करुन जया बच्चन एक नंबरच्या स्थानावर विराजमान झाल्या आहेत. राज्यसभेची उमेदवारी अर्ज दाखल करताना एक हजार कोटींची मालमत्ता असल्याचं दाखवलं आहे याचा दाखला टाईम्स ऑफ इंडियाने देखील दिला होता. जया बच्चन समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत.

 

२) अभिषेक सिंघवी.

राजस्थान मधून प्रतिनिधित्व करणारे कॉंग्रेसचे खासदार म्हणून अभिषेक सिंघवी यांना ओळखलं जातं. ८६० कोटी रुपयांच्या संपत्तीचा हिशोब देवून त्यांनी दूसरा नंबर पटकावला आहे.

३) जयदेव गल्ला.

६८३ कोटी रुपयांची मालमत्ता दाखवत जयदेव यांनी सर्वात श्रीमंत राजकारण्यांच्या यादीत तीसरा नंबर पटकावला आहे. जयदेव गल्ला हे तेलगु देसम पार्टीचे खासदार आहेत. अमर राजा ग्रुप या संस्थेचे ते मॅनेंजिंग डायरेक्टर आहेत.

४) जगमोहन रेड्डी.

वाय.एस. आर. रेड्डी माहित आहेत न. त्यांचेच हे सुपुत्र. तब्बल ४१६ कोटी रुपये हिशोबात दाखवून त्यांनी चौथा नंबर पटकावला आहे. जगमोहन रेड्डी यांची जोरदार हवा असून त्याचे निम्मे पैसे फेसबुकवर त्यांच पेज बुस्ट करण्यात जातात असा अंदाज तज्ञ वर्तवतात.

५) सावित्री जिंदाल.

४३६ कोटी रुपये फक्त. हरयाणाच्या हिस्सार विधानसभा मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या आमदार ते जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन अशी त्यांची दुहेरी ओळख आहे. कॉंग्रेस पक्षातर्फे त्या निवडून येत असतात व त्यांचे पती ओ.पी.जिंदाल यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

६) नविन जिंदाल.

माजी खासदार आणि चौथ्या नंबरवर असणाऱ्या सावित्री जिंदाल यांचे सुपुत्र नविन जिंदाल. ३०८ कोटी रुपयांच्या संपत्तीचा हिशोब दाखवून नविन जिंदाल सहाव्या नंबरवर आले आहेत. नविन जिंदाल हे २००४ व २००९ साली कुरक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मोदि लाटेल वाहून गेलेल श्रीमंत राजकारणी म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला जावू शकतो. ते कॉंग्रेसचे एकनिष्ठ आहेत.

७) अनिल लाड.

चुकून सुद्धा महाराष्ट्रातला माणूस आहे अस समजू नका. हे कर्नाटकचे आमदार आहेत किंवा होते किंवा पुन्हा होतील. यांची एकुण संपत्ती २८९ कोटी रुपयांची असून ते आमदारकीच्या अगोदर राज्यसभेचे खासदार देखील राहिले आहे. हे सुद्धा कॉंग्रेसचेच आहेत.

८) राजकुमार धूत.

आत्ता आलं महाराष्ट्राच नाव. त्यातही हे व्यक्ती सेनेचे खासदार म्हणजे दुग्घशर्करा योगच म्हणायला हवां. राजकुमार धूत हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती आहे २८० कोटी रुपये फक्त.

९) TAKAM TAGAR

काही नावं मराठीत लिहता येत नाही. अरुणाचल प्रदेशाच्या राजकारणात असणार हे नावं देखील असच आहे. हे मराठीत लिहण्यासाठी जेवढे कष्ट लागतात तेवढ्या कष्टात यांची असणारी २०९ कोटींची मालमत्ता एखादा गरिब कमावू शकतो. सध्या ते खासदार असून अरूणाचल प्रदेशचे संभाव्य मुख्यमंत्री म्हणून त्यांच नाव अधून मधून चर्चेत असतं.

१०) नामा नागेश्वर राव.

पैशासारखं नावात दम असणारे हे तेलगु देसम पार्टीचे माजी खासदार. त्यांची संपत्ती आहे १७४ कोटी.

एवढ सगळ वाचून महाराष्ट्रातलं एकही नाव नाही म्हणून वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही आपण खास बोलभिडूची लिस्ट काढू. महाराष्ट्रातलां कुठला राजकरणी या यादित हवां होतं ते कमेंट मध्ये लिहा आणि आनंद घ्या. टेन्शन नाय.

2 Comments
  1. Ram Marshivane says

    श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल पण लेख लिहा ना

  2. Hemant Naresh Bagal says

    Rustom baddal information havi hoti

Leave A Reply

Your email address will not be published.