रिक्षावाले ओला, उबेर बाइकवाल्यांना विरोध का करतायेत ?

पुण्यात सद्या रिक्षावाल्यांचं आंदोलन सुरु आहे. ओला/उबेर बाइकवाल्यांना हे रिक्षावाले आंदोलन विरोध करत आहेत.

बेकायदा चालविण्यात येणाऱ्या बाइक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांनी ११ फेब्रुवारीपासून संप पुकारला. त्या वेळी शहराच्या विविध भागांत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना जबरदस्तीने वाहतूक थांबविण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिलांसह असंख्य प्रवाशांचे हाल होत आहेत.

शासकीय पातळीवर बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्यासाठी सरकार व परिवहन विभागाकडून काहीच ठोस पाउले न उचलल्यामुळे रिक्षाचालकांनी १० फेब्रुवारी रोजी पुणे RTO समोर रास्ता रोको आंदोलन केले. अंदाजे १० हजार रिक्षाचालकांनी रास्ता रोको मध्ये भाग घेतला होता असं तरी सांगण्यात येतंय.  याच आंदोलनात डॉ. केशव नाना क्षीरसागर हे दिं. १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसलेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. बेकायदा बाईक, टॅक्सी बंद होईपर्यंत डॉ. केशव नाना क्षीरसागर यांचे आमरण उपोषण व रिक्षा बंद आंदोलन असेच चालू राहील असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.

मागे जानेवारी महिन्यात देखील पुण्यातील ‘बघतोय रिक्षावाला संघटनेने एक अनोखं आंदोलन केलं होतं.  कोरोनाचे निर्बंध चालू असल्या कारणाने आंदोलन करायला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने रिक्षाचालक रिक्षावर ‘दादा मला वाचवा’ असे स्टिकर्स लावून सरकारचा निषेध नोंदवत होते..

दादा मला वाचवा, बघतोय रिक्षावाला संघटनेचं अनोखं आंदोलन; अजित पवार यांच्याकडे विशेष मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवारांना मदतीसाठी त्यांनी आवाहन केलं होतं. जर का अजित दादांनी निर्णय घेतल्यास १२ लाख रिक्षावाल्यांच्या हिताचा निर्णय होईल. अन्यथा अजित पवार यांनी सही न केल्यास १२ लाख रिक्षावाले आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय यांच्यावर अन्याय होईल, असं बघतोय रिक्षावाला संघटना महाराष्ट्र यांच्याकडून सांगण्यात आलं होतं.

महाराष्ट्र राज्य संघटनेनं ओला उबर दुचाकी वाहतूक सुरु केलीय आणि याच निर्णयाला रिक्षा संघटना विरोध करत आहेत.

पण विरोध का होतोय ??

रिक्षावाला संघटनेचं म्हणणं आहे कि, बेकायदा बाईक टॅक्सी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवतात. काळा पैसा तयार करतात. महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणतात. तसेच राज्यातील १२ लाख रिक्षाचालकांच्या पोटावर पाय देतात. बेरोजगार तरुणांना बेकायदा व्यवसायत आणून गुन्हा करण्यास भाग पाडतात. पण सरकारचे भ्रष्ट अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असं ‘बघतोय रिक्षावाला महाराष्ट्र राज्य संघटनेकडून यांच्याकडून सांगण्यात आलं होतं .

उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी ४ जानेवारी रोजी, आठ दिवसात बाईक टॅक्सी बंद करण्याचे आश्वासन दिले होते. याला आता जवळपास सव्वा महिना उलटून गेला तरीही बाईक टॅक्सी सर्रास चालू आहे, याचा निषेध म्हणून बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन सुरु झालं आहे.

त्यानंतर आत्ता परत आंदोलन करण्याचं कारण म्हणजे, राज्य सरकारसरकार आणि प्रशासन यांनी बाईक टॅक्सी बेकायदा आहे. हे त्यांनी प्रेस नोट देऊन मान्य केलेले असून सुद्धा प्रत्यक्षात प्रशासन ओला/ उबेर / रॅपीडो सारख्या कॅब ऍग्रीगेटर कंपन्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास धजावत नाही. ते फक्त जे युवक बाईक टॅक्सी व्यवसाय करत आहेत, त्यांनाच वेठीस धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. 

परंतु ज्या मोठमोठ्या कंपन्या या युवकांना फसवून,या बेकायदा व्यवसायामध्ये आणत आहेत. त्यांच्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाने केलेली नसून, त्यांच्यावर साधा एक रुपयाचा दंड सुद्धा लावलेला नाही. परंतु बेकायदा बाईक टॅक्सी चालवणाऱ्या गरीब युवकांना हजारो रुपये दंड हे सरकार आणि प्रशासन लावत असल्याचा आरोप बघतोय रिक्षावाला यांनी सरकरावर केला आहे.

इतकंच नाही तर आंदोलक संतप्त होत, राज्य सरकारवर आरोप करत आहेत कि, हे सरकारची आणि  या बेकायदा बाईक टॅक्सीच्या कंपन्यांची मिलीभगत असून गोरगरीब रिक्षाचालक आणि बेकायदा बाईक टॅक्सीच्या जाहिरातींना बळी पडणाऱ्या युवकांच्या आयुष्याशी खेळत असल्याचे आंदोलक रिक्षाचालकांचं म्हणणं आहे.

हि ओला बाईक वाली कन्सेप्ट आहे तरी काय ?

आजकाल लोकं कुठं जायचं म्हणलं कि चौकात जाऊन रिक्षाला हात दाखवत बसत नाहीत तर घरूनच ओला-उबेर बुक करतात. पण अलीकडील ट्रेंड म्हणजे लोकं ओला-उबेर कारऐवजी बाईकचा जास्त वापर करतात. म्हणजेच, बाइक्स बुक करत आहेत. यात आणखी एक म्हणजे ज्या तरूणांकडे बाईक आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार देखील मिळत आहे. यामुळे ते दररोज चांगले पैसे कमवू शकतात आणि त्याची मागणीही सातत्याने वाढत आहे. 

 

पण मुद्दा असाय कि, रिक्षाचालक अनेकदा ओला /उबेरच्या विरोधात अशी आंदोलन करतात पण त्यांना सामान्य जनतेची सहानुभूती मिळत नाही. जेंव्हा बोल भिडूने कॉलेज, नोकरी करणाऱ्या नागरिकांना याबाबत विचारलं असता ते असं सांगतात कि,

( या सगळ्या प्रतिक्रिया नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगण्यात आलेल्या आहेत )

एका विध्यार्थीनीने याचं कारण सांगितलं कि, रिक्षावाले अनेकदा नियमानुसार रिक्षा चालवत नाहीत. काही जण तर साधं सौजन्याने वागायचं कष्ट घेत नाहीत. 

तर हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्या एका मुलीने प्रतिक्रिया दिली कि, रिक्षावाले रात्रीचे १० वाजले कि, मनाला येईल ते भाडं सांगतात. मिटरप्रमाणे भाडं न आकारता आगाऊ भाडे आकारतात. त्यात त्यांना बार्गेनिंग करायला लागते. तेंव्हा पैसे कमीजास्त करण्याच्या मुद्द्यावरून ते पॅसेंजरशी वाद घालतात. आगाऊ भाडं देण्यावरून रिक्षावाल्याशी हुज्जत घालण्यापेक्षा ओला-उबेर बुक केली कि आधीच भाड्याचे रेट्स ठरलेले असतात त्यामुळे वाद घालायचं टेन्शन नसतं. 

तर प्रसाद नावाच्या भिडूने सांगितलं, त्याला कायम एक अनुभव येत असतो तो म्हणजे, गांजवे चौक पासून नळ स्टॉप पर्यंत मीटरने तो रिक्षा करून आला तर त्याचे नियमित भाडे (आता मीटरवाढल्यानुसार ) २१ किंव्हा कधीकधी २२-२३ रुपये होतात. जेंव्हा तो रिक्षावाल्याला २० रुपयाची नोट आणि ५ रुपयांचा कॉइन देतो तेंव्हा त्याला उरलेल्या २-३ रुपयाच्या सुट्ट्यांसाठी रिक्षावाला वाद घालतो. कित्येकदा असं होतं कि, अनेक रिक्षावाले त्याला वरचे १-२ रुपये सुट्टे पैसे नाहीत म्हणून निघून जातात.

तर पूजा नावाची भिडू सांगते कि, जेंव्हा १९ रुपये रिक्षाचं भाडं होतं तेंव्हा जवळच जायचं असेल तर भाडं १९ रू च व्हायचं. २० रुपयाची नोट रिक्षावाल्याचा हातात ठेवली तर ते वरचा १ रुपया परत देत नाहीत, पॅसेंजरला गृहीतच धरतात कि ते १ रु मागणार नाहीत अन किक मारून निघून जातात. उलट जेंव्हा १ रुपया जरी पॅसेंजरकडून यायचा असेल तर तो घेण्यासाठी ते आवर्जून थांबतात..हा कोणता न्याय आहे ?

आता जो मुद्दा आहे तो म्हणजे ओला-उबेर बाईकचा ..याबाबत आम्ही जेंव्हा काही भिडूंना विचारलं तर  असेही अनुभव सांगितलेत कि, आम्ही रिक्षा घेण्यापेक्षा ओला/उबेर बाईक प्रेफर करतो कारण त्याच भाडं परवडतं. यात जास्त करून तरुणांचा ओला -उबेर बाईक बुक करण्याकडे कल असतो. त्यांचं म्हणणं असतं कि हे परवडतं देखील आणि एवढ्या मोठ्या रिक्षाचं भाडं कशाला भरत बसायचं.

यांच्या सर्वांच्या प्रतिक्रिया आणि रिक्षाचालकांच्या मागण्यांवरून तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अनुभव आम्हाला कमेंटबॉक्स मध्ये नक्कीच कळवा…

हे हि वाच भिडू :

 

 

 

11 Comments
  1. Rupesh Mhatre says

    रिक्षाचालकांना दर दोन वर्षांत रिक्षा पासिंग करावी लागते.त्याच तत्वावर
    बाईक चालकांना सुधा पासिंग करावी नाहीतर हा चालकांवर अन्याय होईल..

  2. Ashraf sayyed says

    Mi suddha rapido bike chalaoto pan Amala app wale mhantat ki hi app legal ahe.tv vaar pan Allu Arjun ani Ranveer Singh advertise bagitli mhanun ame app download Keli Karan mi berojgar hoto sagdi kad job shodla kam bhetat na hota.pan RTO ni Amala kidnap kela sarkha amchya war karvai Keli ani RTO sangtat ki hi app illegal ahe . Illegal ahe tar app war karwai na karta amchya war karwai ke pune madhi app chalkanchy office chalo ahe mahit asun tyancha war karwai nahi Keli ami berojgar war direct 20000 hazar dand lawla ami yewde paise kuton annar amchya kade aste tar he Kam kela asto ka .cyber crime wale message Karo shaktana ki hi app wapro nahi.amcha hatawar pot ahe Amala RTO ne ka phasawla 1 da dharun samaj pan dili nahi ki hi app wapro naka.tyana hi mahit ahena app mude amchi phasaunuk zhali ahe ….. Krupa karun amchya doon chaki Amala parat karawa heja nantar Ami asle app waparnar nahi…bol bhido la namrr winanti amchi pan madad kara

  3. Harshavardhan jadhav says

    सत्यपरिस्थिती अशी आहे की ola असो की uber यांची सेवा लोकल रिक्षाचालकापेक्षा हजार पट पुढे आहे.रात्री 10च्या पुढे पुणे रेल्वे स्टेशन वरून अलका चौकात येण्यासाठी हे रिक्षाचालक जेव्हा आम्हाला 100 ते 150 रुपये होतील असे बोलतात तेव्हा ola आणि uber रिक्षाचालक फक्त 45 ते 55 रुपये घेतात आणि uber bike तर केवळ 25 ते 30 रुपये. वरून ऑनलाईन payment ची सुविधा. हुज्जत नाही.आणि हो विषय राहिला महिलांच्या सुरक्षेचा तर हे ola आणि uber वाले gps location on ठेऊन च रिक्षा चालवतात त्यामुळे तुमची रिक्षा कुठे गेली कुठे चाललीय याची सर्वतोपरी माहिती सुरक्षित आणि save राहते. ही सुविधा बाकीचे local driver नाहीत देऊ शकत. मुळात त्यांच्यात असेल ना हिम्मत तर त्यांनी पण एवढ्या माफक दरात प्रवाशांची सोय करून दाखवावी. उलट सर्वसामान्य जनता ola uber मुळे अत्यानंदी आणि सुरक्षित आहे.कृपया पुण्यात तरी ola uber ला बंद करू नका.नाहीतर स्थानिक रिक्षाचालक मंडळींची अरेरावी फोफावली म्हणूनच समजा….

  4. Sushant says

    Rikshyavalanchi nautanki band Kara kayamachi .

  5. Madan says

    I always prefer bike over auto because it is cheap and time saving. Auto driver can’t decide who gives such services. Anyone can prefer what they want. And by the way rapidp ola and uber pays bike ride taxes to the government. So auto driver lying

  6. Vishal gaikwad says

    Pan jar 2 wheller wala chukun truck kiva motya gaadi khali gela accident zala pasinger ane driver mela tar tyache jababdari konache karan auto rekshala driver + pasinnger saglyancha insurance asto tar 2 wheler he white plate ahe ane tela kontya pasinger cha insurance nasto tari ya sarkarla jar 2 wheler ligal vatat asel tar ashe jimedari ghya ki mag

  7. Vishal says

    I hate rickshawalaa they always demand more than usual

  8. MANOJ Lohar says

    मी हे सगळ वाचलं . तर सांगू सगळेच ऑटो वाले सारखे नसतात,मी कधीच कस्टमरशी एक दोन रुपयाची हुज्जत घालत नाही. आणि रात्री जर तुम्हाला वाटत की ऑटो वाले जास्त भाड आकारता तर ऑटो ऑनलाईन बुक करा .थोडा वेळ लागेल पण ऑटो बुक होईल.मी तर कित्येक वेळेस म्हाताऱ्या माणसांना पैसे न घेता सोडलं आहे.

  9. Rajesh Kulkarni says

    सध्या बेरोजगारीचा प्रश्न तरुण वर्गाला भेडसावतोय. तरुणांना रोजगारीची चांगली संधी आहे जर सर्व नियमांचे पालन करुन हा व्यवसाय तरुण करत असतील तर निश्चितच बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. राहीली गोष्ट रिक्षा चालकांची तर त्यांनी पण त्यांच्या व्यवसायात नाविन्य पुर्ण बदल केल्यास त्याच्या व्यवसायात पण निश्चित वृध्दी होण्यास मदत होईल.

  10. Arun says

    Please don’t ban ola and bike taxy.
    Alike Rikshawalas Bikewala also has their bread and butter to manage. They are more in need.
    Rikshawalas has lost publics trust as they trap you in a situation and literally wants to loot you.

    For customers bike option is cheaper and rikshas are beyond their budget.

    Rikshaw charge tripal rate if you are in need.

    One day I wanted to travel from wakadewadi to Sangavi,
    A rikshawala told that he will charge 200 for a ride. It was early morning so I agreed. When we reached the location he started demanding another 200 rupees as a return charge.

    So they play with your mind. When I asked him, why didn’t he give clarity that this ride will coat me 400 rupees. Instead he smartly told 200.

    Let alone bikewalas, these rikshawala didn’t even want ola taxi’s and cabs coz they want to do their manmani when customers are in bechara situation

  11. मनोज says

    बाइक टॅक्सीला सुद्धा परमिट घ्या, टॅक्स, इन्शुरन्स, पासिंग बॅज हा सर्व नियमानंतर टुरिस्ट पासिंग बाइक विकत घेऊन खुशाल धंधा करावा. अर्ध्या हळकुडांने पिवळे होण्याचा विचार न करणे हेच योग्य होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.