हा “रिक्षावाला अण्णा” संपुर्ण भारतात यासाठी फेमस आहे की,

आपल्या अवतीभवती अनेक ट्रव्हेल एजन्सी आहेत, ज्या वेगवेगळ्या सुविधा देऊन ग्राहकांना खुश करायचा प्रयत्न करत असतात. कधी सूट तर कधी कॅश ‍बॅक किंवा आपण जी गाडी वापरणार आहोत त्यात टीव्ही, वायफाय अशा सुविधा देऊन ह्या कंपन्या ग्राहकांना खुश करत राहतात. सध्या आपल्याकडे शहरातील प्रवसासाठी कॅबचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. नेहमीच्या “रिक्षा” ही आपली हाक आता बदलत आहे निदान मोठ्या शहरात तरी.

रिक्षावाले काका “कस्टमर फ्रेंडली” नसतात हेच रिक्षाचा वापर कमी झाल्याचे कारण सांगितले जाते. पण एक रिक्षावाले काका असे आहेत जे या बड्या कंपन्यांना देखील लाजवतील इतक्या सर्विस आपल्या ग्राहकांना देतात. या रिक्षावाल्याचे नाव आहे “अण्णा दुराई”.

त्यांच्या “कस्टमर फ्रेंडली” रिक्षामुळे ते नेहमीच वर्तमानपत्रात आणि सोशल मिडियावर चर्चेत राहतात. ते नेमक्या इतक्या काय सुविधा देतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

यांचे नाव अण्णा दुराई असे असले तर यांना लोक ऑटो अण्णा या नावानेच जास्त ओळखतात. ते ३० वर्षांचे आहेत आणि ते चन्नईमध्ये रिक्षा चालवतात. अण्णा मुळचे थांजावूर जिल्ह्यातले आहेत. जे फक्त चार वर्षाचे असतांना आपल्या भावाबहिणीं सोबत अनेक वर्ष रिक्षा चालवत आहेत. ते तसा पारंपारिक रिक्षा चालवण्याचा धंदा चन्नई येथील आयटी क्षेत्राच्या भागात करत होते. ग्राहकांना सुखं सुविधा द्यायला हव्यात अशी कल्पना त्यांच्या डोक्यात होती. नुसतीच कल्पना करून गप्प बसणाऱ्यातले ते नसल्यामुळे त्यांनी विविध प्रयोग करून “कस्टमर फ्रेंडली” होण्यासाठी प्रयत्न सुरु केले. 

सुरवातीला त्यांनी आपल्या रिक्षा मध्ये २० वेगवेगळ्या प्रकारचे पेपर आणि मक्झीन ठेवायला सुरवात केली. त्यातच “कस्टमर फ्रेंडली” होण्याच्या नादात महिन्याकाठी कमवलेल्या १५ हजार रुपयांनी पैकी ते ८ हजार रुपये यावर खर्च करत होते. पण याची त्यांना फिकीर नव्हती, पेपर आणि मक्झीन नंतर त्यांनी आपल्या रिक्षाला हायटेक करत वायफाय देखील बसवून घेतले. पण आपल्या ज्या ग्राहकांकडे इंटरनेट वापरासाठी स्मार्टफोन नसतील त्यांनी काय करायचे असा प्रश्न अण्णांच्या मनात होता म्हणून त्यांनी ७ हजार रुपयांचा एक टॅब्लेट आपल्या रिक्षात बसवला. आयटी कंपनीच्या क्षेत्रात रिक्षा चालवत असल्याने, लहान टॅब्लेट ग्राहकांना समाधान देऊ शकणार नाही असे त्यांना वाटू लागले. म्हणून काहीच महिन्यात पैसे गोळा करून त्याने अखेरीस मोठा टॅब बसवला. 

नंतर त्याने आपल्या रिक्षा मध्ये टीव्ही देखील बसवला. इतकचं नव्हे, तुम्ही जर अण्णांच्या रिक्षातून जात असाल आणि तुमच्या मोबाईलचा रीचारच संपला असेत तर तुम्हाला कुठे ही थांबायची गरज नाही तुम्ही सरळ रिक्षा मध्ये रीचारच करू शकता ही सुविधा देखील या रिक्षामध्ये उपलब्ध आहे. 

अशाच अनेक सेवा देत. चौथी शिकलेले अण्णा शाळेच्या मुलांसाठी आणि हॉस्पिटल मधल्या नर्स साठी फुकट सेवा देतात. अण्णांनी आपल्या रिक्षा मध्ये स्वायपिंग मशीन देखील ठेवले आणि ते ग्राहकांना कॅशबक देखील देतात. त्यांची अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ते आपल्या ग्राहकांची स्पर्धा देखील घेतात. ते ग्राहकांना पाच प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे उत्तर देणाऱ्यास ते १००० रुपयांचे बक्षीस देतात. त्याच बरोबर ते ग्राहकांना टोकन देतात जसे कि २५ टोकन म्हणजे २५० रुपये या पद्धतीने ग्राहक ते वापरू शकतात. 

अण्णाच्या या उपक्रमांमुळे तो आता एक सेलिब्रेटी ऑटो ड्रायव्हर झाला आहे. त्यांचे रॉयल इंफिल्ड, वोडाफोन, टेड टोक सारख्या ठिकाणी त्यांनी  भाषण देखील झाली आहेत. त्यांचे स्वताची वेबसाईट देखील आहे. असे “कस्टमर फ्रेंडली” अण्णा अर्थात अण्णा दुराई देशभरात प्रसिद्ध आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.