वास्तवचा तो सिन ज्याने बॉलीवूडला दुसरी मदर इंडिया दिली.

बॉलिवूडमध्ये आई हा फॅक्टर लईच महत्वाचा मानला जातो. आयकॉनिक पात्र म्हणून काही अभिनेत्र्या आई या भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे रिमा लागू. पडद्यावर रिमा लागू या सलमान खानच्या खऱ्या आई आहेत इतकं त्यांचं चांगलं नातं तयार झालं होतं. रिमा लागू यांच्याबद्दल विशेष सांगायचं झालं तर त्यांना बॉलिवूडमधील मॉडर्न आई म्हणून ओळखलं जातं.

२१ जून १९५८ रोजी त्यांचा जन्म झाला. आई मंदाकिनी या नाटक क्षेत्राशी निगडित असल्याने त्यांना घरातूनच प्रोत्साहन मिळालं होतं. सुरवातीला त्या अनेक सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून काम करत होत्या. पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या आई या भूमिकेतून. 

भारतातल्या मोजक्याच ज्या हिरोइन्स आहेत त्यांनी आईचं साकारलं त्यात रिमा लागू या टॉपला आहेत. लोकांकडून त्यांच्या अशा प्रकारच्या भूमिकांना भरपूर सन्मान आणि कौतुक मिळालं. हिंदी आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीत रिमा लागू यांनी काम केल. त्यांच्याबद्दलचा आजचा किस्सा वास्तव या चित्रपटातला.

वास्तव सिनेमा हा संजय दत्तचा बॉलिवूडमधील कमबॅक सिनेमा म्हणून ओळखला जातो.  सिनेमाची विशेष गोष्ट म्हणजे संजय दत्तची आई साकारणाऱ्या लागू या संजूबाबापेक्षा फक्त १ वर्षाने मोठ्या होत्या. यात संजय दत्त जरी संपुर्ण पिच्चरभर दिसत असला तरी एंडला सगळ्या सिनेमाचा क्लायमॅक्स रिमा लागू आपल्या अभिनयाच्या जोरावर अक्षरशः टिपेला पोहचवतात.

महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव सिनेमा हा त्याकाळचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. या सीनच्या एंडचा हा किस्सा जो रिमा लागू यांना मदर इंडिया २ चा ‘किताब देऊन गेला.

वास्तवाचा शेवटचा सीन ज्यावेळी शूट करायचा होता तेव्हा महेश मांजरेकर रिमा लागुवर जरा चिडले होते कारण सिन रेडी होता, शूट करायच्या वेळी रिमा लागू या कामामुळे थकून गेल्याने थोडावेळ झोपून परत शूटिंगला येणार होत्या. मांजरेकरांनी बघितलं कि रिमा लागू या झोपलेल्या आहेत तेव्हा ते नाराज झाले. पण जेव्हा सिन शूट झाला तेव्हा रिमा लागू यांनी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर पोहचवलं. 

सिनेमात रघु भाई पोलिसांच्या तावडीतून धावत पळत घरी येतो, त्याला काहीच कळत नसतं तो पुरता भेभान झालेला असतो. आपल्या आईला म्हणतो कि वाचव मला, दरवाजा बंद कर…. त्यावेळी रघूची आई बंदूक उचलून रघु भाईला कायमची मुक्ती देते.

हा सीन शूट झाल्यावर महेश मांजरेकरांना आपलली चूक लक्षात आली कि आपण उगाच रिमा लागुंवर नाराज झालो. कारण या सीनला जी एनर्जी, ज्या भावना हव्या होत्या त्यासाठी डोकं एकदम शांत असावं लागतं, त्यासाठी रिमा लागू विशेष तयारी करत होत्या पण महेश मांजरेकरांना वाटलं कि त्या झोपल्या आहेत कि काय. 

रिमा लागू यांचा अभिनय केवळ वास्तव चित्रपटापुरता मर्यादित नव्हता तर तो त्यांनी याआधी नाटकांमधूनही दाखवला होता. पुरुष या नाटकात त्यांनी नाना पाटेकरांच्या पात्राचंही मार्केट खाऊन टाकलं होतं. या नाटकाचे ७००-८०० प्रयोग झाले मात्र दर वेळी रिमा लागू या आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकून घेत असत.

हम आपके है कौन, हम साथ साथ है, साजन, रंगीला, कुछ कुछ होता है, दिलवाले, कल हो ना हो या सिनेमांमधून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर झाल्या. हे सगळेच सिनेमे बॉक्सऑफिसवर प्रचंड हिट आले होते.

या सिनेमांमध्ये त्यांच्या आईच्या पात्रांनी बराच भाव खाल्ला. सलमान खानही रिमा लागू यांना आपल्या आईचाच दर्जा देत असे.

मराठी सिनेमामध्ये ‘ सिंहासन ‘ हा चित्रपट कोण विसरू शकतो आणि सिंहासन सिनेमातलं रिमा लागू यांचं कराऱ्या सुनेचं त्यांनी साकारलेलं पात्र सिनेरसिकांना चांगलचं ठाऊक आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट गिरीश कुलकर्णी यांचा ‘ जाऊंद्याना बाळासाहेब.’ या सिनेमातही त्यांनी गिरीश कुलकर्णी यांच्या आईचंच पात्र साकारलं होतं.

१८ मे २०१७ रोजी रिमा लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पण आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी लोकांच्या मनात आपली छाप सोडलेली आहे. वास्तव मध्ये त्यांनी शेवटचा सांगितलेला डायलॉग हा कायम लक्षात राहतो.

तेरे पापा को ये कहने का हक़ था कि उस पर ज़ुल्म हुए, इसलिए उसने बुरा रास्ता अपनाया. मगर इस तरह के ज़ुल्म तो हज़ारों लोगों पर होते हैं. वो सब लोग बुराई का रास्ता तो नहीं अपनाते. ज़्यादा पढ़ी-लिखी नहीं हूं. पर इतना जानती हूं. वास्तव में किसी भी इंसान को ये हक़ नहीं है कि वो दूसरे इंसान की जान ले. मां हूं इसलिए अपने बेटे से प्यार करती हूं, लेकिन उसके गुनाहों को माफ़ नहीं कर सकती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.