सुरमा भोपाली ही भूमिका करायची नाही म्हणून ते ठाम होते पण तीच आयुष्याची ओळख ठरली

अभिनेते जगदीप याचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. अभिनेते जगदीप म्हणल्यानंतर कोणाच्या सहसा लक्षात येत नाही, पण सूरमा भोपाली म्हणलं की अरे ते शोलेतले काय? असा प्रश्न येणं साहजिक आहे.

“मर जा” अस एक वाक्य गझलांच्या कार्यक्रमात दूसऱ्यांना दाद देत असताना म्हणतात. हे ‘मर जा’ म्हणजे काय तर आत्ता तू मेलास तरी चालेल अस काम तू करून ठेवलस. सुरमा भोपाली यांच्या शोलेतील भूमिकेला हीच दाद द्यावी लागेल. कारण जयदीप यांनी कित्येक भूमिका केल्या असतील पण आज ते गेले तेव्हा त्यांची ओळख सुरमा भोपाली म्हणूनच करून द्यावी लागते. लोकांनाही ते फक्त याच एका भूमिकेमुळे चिरंतर लक्षात राहतात.

पण गंम्मत अशी की शोले सिनेमातील सूरमा भोपाली ही भूमिका त्यांनी नाकारली होती,

ती नाकारण्याच्या मागचं कारण देखील तितकच गंमतीशीर होतं. जर तस झालं असतं तर आजची ही बातमी जावेद जाभ्रीच्या वडिलांच निधन अशी करावी लागली असती. पण एक गोष्ट असते ती म्हणजे नशीब.

त्यांच्या नशीबातच सुरमा भोपाली म्हणून जगणं लिहलेलं असावं.

झालं अस की,

‘शोले’ सिनेमाचं बरंचसं शुटींग पूर्ण झालं होतं. अचानक एके दिवशी जगदीप यांना बंगलोरला बोलावण्यात आलं. जगदीप बंगलोरला पोहोचुन ‘शोले’ च्या सेटवर गेले. त्या दिवशी दिग्दर्शक रमेश सिप्पी इतर कलाकारांसोबत शुटींग करत होते. जगदीप असेच बसुन होते. त्यांना कंटाळा आला होता. त्यामुळे जगदीप यांनी, असंच बसण्यापेक्षा बंगलोरमध्ये जरा भटकण्याचा विचार केला. 

बंगलोरच्या एका आलिशान रेसकोर्सबद्दल जगदीप ऐकुन होते. तिथे रेस खेळायला जाऊन रिकामा वेळ तरी जाईल या हेतुने जगदीप निघाले. निघताना त्यांनी रेस खेळण्यासाठी ‘शोले’च्या प्राॅडक्शन मॅनेजरकडे १००० रुपये मागितले. मॅनेजरने जगदीप यांना पैसे देण्यास नकार दिला. 

मॅनेजरच्या या नकाराचा जगदीप यांना राग आला. ‘सिप्पींसारखी बडी कंपनी एखाद्या भुमिकेसाठी बोलावून असा अपमान करणार असेल, तर मला या सिनेमात काम करण्यात अजिबात रस नाही. सूरमाचा रोल दुसरा कोणीतरी करेल. मी पुन्हा मुंबईला चाललो’, असा ठाम पवित्रा जगदीप यांनी घेतला.

हि गोष्ट ‘शोले’चे सिनेमेटोग्राफर द्वारका द्विवेचा यांच्या कानावर आली. त्यांनी त्वरीत प्राॅडक्शन मॅनेजरला बोलावुन जगदीप यांना पैसे दिले. स्वतःकडचे सुद्धा काही पैसे त्यांनी जगदीप यांच्या हातावर ठेवले. यानंतर जगदीपजींचा राग शांत झाला आणि त्यांनी ‘शोले’ सोडुन मुंबईला जायचा बेत रद्द केला. 

Screenshot 2020 07 09 at 8.29.55 AM

जगदीप यांनी ‘शोले’ मध्ये थापा मारणारा आणि एका विशिष्ट आवाजात बोलणा-या सूरमा भोपालीची व्यक्तिरेखा इतकी कमाल रंगवली की हिच त्यांची ओळख झाली. ‘सूरमा भोपाली’ या पात्राचा एक योगायोग असा की भोपाल येथे सूरमा नावाचे एक वनाधिकारी होते.

त्यांची आणि जगदीप यांची ओळख होती. भोपालमधल्या सूरमावर ‘सूरमा भोपाली’ हे पात्र लिहिले गेले. आणि जगदीप यांनी हि भुमिका साकारली. ‘शोले’ नंतर १९८८ साली जगदीप यांनी स्वतः ‘सूरमा भोपाली’ हा सिनेमा बनवला. पण हा सिनेमा तितकासा चालला नाही. 

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.