ऋषी कपुरच्या सुप्रसिद्ध रोमॅन्टिक स्वेटरने त्या दोघांना जवळ आणलं.

“अय ऋषी पकुर” दुनियादारी मध्ये जित्या स्वप्नील जोशीला चिडवण्यासाठी ऋषी पकुर म्हणून हाक मारत असतो.

का माहितीये का? स्वप्नील जोशी घालत असलेल्या रंगेबेरंगी स्वेटरमुळे. 

होय नव्वदच्या दशकात स्वेटरला समानार्थी दुसरा शब्द ऋषी कपूर होता. ऋषी कपूरला वाटायचं तो स्वेटर घातल्यावर सेक्सी दिसतो. आपल्याला पण वाटायचं व्ह्य व्ह्य रुष्याला स्वेटर चांगला दिसतोय. खर तर त्याचं स्वेटर त्याचं वयोमानाप्रमाण वाढलेलं पोट लपवण्यासाठी डायरेक्टरनी त्याला घातलं होत.

साधारण चांदणीपासून ऋषीचा आणि स्वेटरची लव्ह स्टोरी सुरु झाली. (काही पिक्चर पुढे मागे असू शकते चूकभूल द्यावी घ्यावी). स्वित्झर्लंडच्या रंगीन पहाडात शिफोणच्या साडीमध्ये हॉट दिसणारी श्रीदेवी आणि तिच्यासोबत “रंग भरे बादलसे” गाणारा गोल गुब्ब्या ऋष्या स्वेटरमध्ये कुल दिसत होता. आम्ही नाही म्हणणार नाही. पण म्हणून काय प्रत्येक पिक्चर मध्ये स्वेटरच घालायचं?

ऊन नाही पाउस नाही दिवस नाही रात्र नाही ऋषी पकुर प्रत्येक सिझन मध्ये स्वेटर घालून हजर.

ऋषी कपूरच्या भिडू स्वेटरने कधी कधी दुसऱ्या हिरोबरोबर कॅमियो देखील केला आहे. 

कुठला पिक्चर माहित आहे का? DDLJ. सुपरडुपर हिट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मध्ये ऋषी कपूरचा स्वेटर आहे पण तो नाही.

त्याच झालं असं ddlj च्या सेटवर करण जोहर आणि उदय चोप्रा आदित्य चोप्राचे असिस्टंट डायरेक्टर होते. यश चोप्रा म्हणजे करण जोहरच्या मावशीचे मिस्टर म्हणून त्याला हा असिस्टंटचा जॉब मिळाला होता पण त्याला त्यातलं काहीच कळत नव्हत.(घराणेशाही ओ)

अनेकदा चुका केल्यामुळे कॅमेरामन करण जोहरला रागवायचा. अखेर वैतागून त्यानं पिक्चरचं खूळ मनातून काढून पुढच्या शिक्षणासाठी पॅरीसला जायचं ठरवलं. (हार्दिक पांड्याचं पण करीयर वाचलं असत)

दुसऱ्या दिवशी तो हे सांगण्यासाठी आदित्य चोप्रा कडे गेला. आदित्य चोप्रा तेव्हा आधीच शाहरुखच्या कॉस्चूमडिझायनरमुळे वैतागला होता. त्यान करणचं काही ऐकून घेतलं नाही. तो त्याला म्हणाला,

“तू आधी धावत जा आणि यशराजच्या जुन्या कपड्यांमधून शाहरुखसाठी एक स्वेटर घेऊन ये.”

करण जोहर ला तिथे चांदणीमध्ये ऋषी कपूरने वापरलेला लाल पांढरा स्वेटर आवडला मात्र त्याला उंदरान मोठ छिद्र पाडलं होत. करणने त्याला एक एम्बेलम शिवून छिद्र झाकून टाकल. शाहरुखला तो स्वेटर खूप आवडला. शाहरुख आदित्य चोप्राला बोलला “लडका स्मार्ट है.”

शाहरुखचे कपडे डिझाईन करायची जबाबदारी करणला मिळाली. शाहरुखचा अख्खा लूक करण जोहरने बदलला आणि तिथूनच त्या दोघांची “दोस्ती” सुरु झाली.

बघा ऋषी पकुरचा स्वेटरने कुठे कुठे दुनियादारी केली ते.

त्याच्या स्वेटरचा DDLJ हा शेवटचा सुपरहिट पिक्चर ठरला. शाहरुखच्या करियरला करण जोहरसोबतचा स्वेटरमुळे सुरु दोस्ताना खूप कामी आला. पण बिचारा आमचा ऋषी पकुरचं स्वेटर तूतू तारा फस गया दिल बेचारा म्हणत म्हणत हळूहळू पडद्याआड गेलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.