पोरं म्हणतायत OYO बुडणाराय, पण मालकाची सक्सेस स्टोरी वाचून पटत नाय राव…

आज तुम्ही कुठल्याही शहरात मुक्कामाला जाता तेव्हा सर्वात पहिला राहण्याची सोय करायला लागते.

काही वर्षांपुर्वीचा काळ आठवला तर तुमच्या लक्षात येईल पुणे, मुंबईच नव्हे तर गपणतीपुळे, शिर्डी, कोल्हापूर अशा ठिकाणी सणाच्या आणि सुट्टीच्या दिवसात मारामार असणाची. सहज कुठेच राहण्याची व्यवस्था होत नव्हती. आत्ता मात्र तुम्हाला OYO हॉटेलिंगचा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे आत्ता काय होतं तर OYO मधून तुम्ही अगोदरच हॉटेल बुक करु शकता. ठरलेल्या वेळेत निवांत तिथे जावू शकता.

आत्ता झालेलं अस की असाच एक मुलगा 19 व्या वर्षांचा असताना आईवडिलांसोबत देवदर्शनासाठी गेला होता. तिथे त्यांची राहण्याची सोय झाली नाही, तेव्हा तो मुलगा मागे फिरला तो ऑनलाईन हॉटेलची संकल्पना घेवून.

अवघ्या २५ व्या वर्षी कोट्याधीश झालेल्या रितेश अग्रवालची ही गोष्ट. 

रितेश अग्रवाल ओडिशा राज्यातील कटक जिल्ह्यातील बिसम या छोट्याशा गावचा. 16 नोव्हेंबर 1993 ला त्याचा जन्म मारवाडी कुटुंबात झाला.

आता मारवाडी म्हणल्य़ावर धंदा हा मारवाड्याच्या रक्तातच असतो, असं आपण बिनबोभाटपणं नेहमी बोबलतच असतो. मात्र धंदा करण्याचा वारसा घरून लाभला असला तरी नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी हिंमत लागते. मेहनत घ्यावी लागते, परिस्थितीशी दोन हात करावे लागतात. ती हिंमत रितेश अग्रवालमध्ये होती.

12 वी पर्यंत रितेशनं ओडिशामधील Scared Heart School मध्ये शिक्षण घेतलं. रितेशला आयआयटीला ॲडमिशन घ्यायचं होतं. त्यासाठी त्यानं राजस्थानमधील कोटामध्ये क्लास लावले आणि आय़आयटीची तयारी सुरू केली. तेव्हा त्यानं Indian Engineering Collages: A complete Encyclopedia of Top 100 Engineering Collages नावाचं एक पुस्तकही लिहिलं होतं. त्या पुस्तकामुळे त्याची भरपूर कौतुक देखील झालं होतं. 16 व्या वर्षीच मुंबईमधील Tata Institute of Fundamental Research (TIRF) मध्ये आयोजित Asian Science Camp साठी रितेशची निवड देखील करण्यात आली होती.

याच काळात घरी आला की,

रितेश घरातल्यांसोबत देवदर्शनासाठी जात असे. मुलांसोबत बाहेरगावी देखील त्याचं फिरण व्हायचं. त्यावेळी देखील गरजेच्या वेळी हॉटेल मिळत नाहीत हे त्याच्या लक्षात येत होतं पण घरातल्यांसोबत बाहेर गेल्यानंतर किती मोठी अडचण निर्माण होते हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यातूनच त्याच्या मनात आयडिया आली ती ऑनलाईन रुम बुकींगची.

ते सालं होतं 2012. रितेशचं वय होतं अवघं 19 वर्ष.

त्यानं यावर्षीच Oravel Stays नावाच्या कंपनीची स्थापना केली. या कंपनीचा उद्देश होता की, प्रवाशांना कमी किंमतीमध्ये आँनलाईन रूम मिळवून देणं.

कंपनी सुरू झाल्यानंतर सहा महिन्यात त्यांना 30 लाखांचा फंड मिळाला. त्यानंतर पेपल कंपनी चे सह-संस्थापक – पीटर थेल यांची “थेल फाऊडेशन” च्या वतीने दिली जाणारी 1 लाख डाॅलरची Theil Fellowship रितेशला मिळाली.

कमी कालावधीमध्येच रितेशच्या कंपनीनं मोठी मजल मारली होती. त्यामुळे रितेश सेट झाला होता. मात्र अचानक ही

कंपनी तोट्यात गेली. रितेशला मोठं नुकसान सहन करायला लागलं आणि एका वर्षातच Oravel Stays नावाची कंपनी अखेर बंद करायला लागली.

आपला नवीन उभारता व्यवसाय तोट्यात गेल्यामुळे रितेश खचला नाही. तो या संकटांशी दोन हात करत राहिला. नक्की व्यवसायामध्ये कुठं चुकलोत हे शोधत गेला. त्यावर विचार करत राहिला.

तेव्हा त्याला समजलं की,

भारतातमध्ये कमी पैशात कुठंल्याही हाँटेलमध्ये आँनलाईन रूम बुक करता येते. मात्र कमी पैशात कोणत्याही हाॅटेलमध्य़े चांगली सुविधा दिली जात नाही. यात सुधारणा करायला हवी, असं त्यानं ठरवलं.

2013 साली पुन्हा रितेशनं पुन्हा नवीन नाव आणि उद्देशासोबत कंपनी सुरू केली. Oravel Stays च्या ऐवजी रितेशनं कंपनीचं नाव OYO ROOM ठेवलं. याचा अर्थ होता. Own Your Own म्हणजेच तुमची स्वत:ची रूम.

परत नव्यानं सुरूवात केल्यानंतर रितेशनं झालेल्या चुका लक्षात ठेवत अनेक सुधारणा केल्या. कंपनीचा उद्देश फक्त प्रवाशांना रूम उपलब्ध न करून देता त्यांना तिथं सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हा होता. त्य़ासाठी रितेशनं एक गाईडलाईन तयार केली.

त्या गाईडलाईननुसार जी हाँटेल OYO कंपनीसी जोडलं जाणार आहे. त्या हाँटेलमधील रूम कंपनीच्या माणसांमार्फत चेक करण्यात येऊ लागली. जर ती रूम कंपनीच्या गाईडलाईनमध्ये बसत असेल तरच OYO आपली सेवा त्या हाँटेलला देऊ लागली.

अनेक प्रवाशांचा विश्वास कंपनीवर पुन्हा बसला. अनेक ग्राहक कंपनीशी जोडले गेले. त्यामुळे कंपनीनं सुद्धा अनेक हाॅटेलसोबत आपला समझोता केला. मात्र यावेळेस रितेशची मेहनत ग्राहकांच्या पसंतीला उतरली होती. 

त्यानंतर पुन्हा मोठमोठ्या कंपनीनं रितेशवर भरोसा टाकला. 2014 मध्ये Lightspeed Venture Partners (LSVP) आणि DSG Consumer Partners ने Oyo Rooms में 4 करोड़ रूपयांची गुंतवणुक केली. त्यानंतर 2016 मध्ये जपानच्या Softbank कंपनीनं सु्द्धा 7 अरब रूपयांची गुंतवणुक केली. त्यानंतर रितेशनं कधी मागे वळून पाहिलंच नाही.

कंपनीचा भार वाढत गेला तसे कंपनीत काम करणाऱ्या लोकांची संख्याही वाढली. सध्या OYO कंपनीत 1500 कर्मचारी काम करत आहेत.

2016 मध्ये आंतरराष्ट्रीय मँगझीन Gentlemen’s Quarterly ने रितेश अग्रवालला 50 Most Influential Young Indians: Innovators च्या यादीत समाविष्ट केलं आहे.

सध्या रितेशचं वय अवघं 25 वर्ष आहे. त्यांच्या कंपनीकडं सध्या 15 लाखापेक्षा  जास्त हाँटेल जोडले गेलेले असून तब्बल 10,00,000 रूम त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. हाँटेल व्यवसायामध्ये देशातील सगळ्यात मोठी कंपनी सध्या रितेशची आहे.

तसंच ही कंपनी,

चीन, नेपाल, अमेरिका, दुबई, इंडोनेशिया या देशातही सेवा देत आहे.

कंपनीच्या आकडेवरीनुसार चीनमधील 280 शहरात 5,000 हजार OYO रूम उपलब्ध आहेत.

कधीकाळी सिमकार्ड विकणारा हा पोरगा आज कोट्याधीश झालेला आहे. त्यामुळे नवीन क्षेत्रात काहीतरी वेगळं करणाऱ्या भिडू कार्यकर्त्यांसाठी रितेश अग्रवाल नक्कीच आदर्श ठरणार आहे.

हे ही वाच भिडू. 

4 Comments
 1. आनंद श्यामकांत आंबर्डेकर says

  Content उत्तम आहेच आणि खरा आहे पण मराठी व्याकरण सुधारले तर लेखन वाचायला अधिक चांगला वाटेल.

 2. Kunal says

  काहींच्या काही आकडेवारी छापु नका

 3. Sanjay says

  अंदमान निकोबार बेटांवर या ओयो स्वीकारत नाहीत. फसवणूक होती.

 4. Hemant Gawande says

  Oyo is good but some hotels was provide very bad service like “Hotel Rahul, duty wadi Nagpur

Leave A Reply

Your email address will not be published.