भारतातील या नदीतून सोनं वाहतं !

झारखंडमधील स्वर्णरेखा नदी.

नदीचं वैशिट्ये असं की ही नदी देशातील ‘सोनेरी नदी’ नदी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या पाण्यासोबत सोनं देखील वाहत. अगदी अस्सल सोनं. वाचायला थोडसं आश्चर्यकारक वाटत असलं तरी ही गोष्ट अगदी खरी आहे.

नदीतून वाहणाऱ्या सोन्यामुळेच नदीला ‘स्वर्णरेखा’ हे नांव मिळालं आहे.

झारखंडची राजधानी रांची पासून जवळपास १६ किलोमीटरच्या अंतरावर उगम पावणाऱ्या या नदीची लांबी जवळपास ४७४ किलोमीटर इतकी आहे. अनेक ठिकाणी ही नदी ‘सुबर्ण रेखा’ या नावाने देखील ओळखली जाते. स्थानिक आदिवासी नदीला ‘नंदा’ नावाने ओळखतात.

झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागातून वाहणाऱ्या या नदीच्या पात्रातून वाळूसोबतच सोन्याचे कण देखील सापडतात. हजारो वर्षांपासून या नदीतून हे सोन्याचे कण मिळताहेत. साधारणतः तांदळाच्या शिताएवढ्या आकाराचे हे कण असतात.

swarnrekha3
गळामधील सोन्याचे कण

नदीपात्रातील वाळूमध्ये हे सोन्याचे कण नेमके येतात कुठून, हे मात्र एक गूढच आहे. भूगर्भशास्त्रज्ञांनी यावर बरंच संशोधन केलंय, मात्र त्यांना देखील या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर शोधता आलेलं नाही.

शास्त्रज्ञांच्या मते नदी बऱ्याच खडकांमधून वाहते. त्यामुळे या खडकांशी होणाऱ्या घर्षणातून नदीच्या पाण्यात वाळूसोबत सोन्याचे कण येत असावेत. पण खडकांमधून वाहणाऱ्या इतर अनेक नद्या आहेत, त्यांच्या बाबतीत तर असं काही होत नाही. त्यामुळे हा दावा परिपूर्ण मानता येत नाही.

गेल्या कित्येक वर्षांपासून झारखंडमधील तमाड आणि सारंडा भागातील स्थानिक आदिवासी लोक वाळूच्या कणातून सोन्याचे कण वेगळे करण्याचे काम करतात. वाळूच्या कणातून सोन्याचे कण वेगळे करण्याचे हे काम अतिशय चिकाटीने करावे लागते. कारण सोन्याचे कण मिळत असले तरी, ते शोधण ही सोपी गोष्ट नाही. खूप प्रयत्नांनंतर दिवसाकाठी २-३ कण या वाळूतून मिळतात.

swarnrekha2
नदीतून सोन्याचे कण गोळा कराणारी महिला

अतिशय संयमाने आणि मेहनतीने वाळूपासून वेगळे केलेले सोन्याचे कण विकून आदिवासी समुदायातील लोकांना प्रतिकण जवळपास ८० ते १०० रुपये मिळतात. यावरच या लोकांची उपजीविका चालते. या कणांची बाजारातील किंमत जवळपास प्रतिकण २५० ते ३०० रुपये इतकी असते.

स्वर्णरेखा व्यतिरिक्त तीची उपनदी असणाऱ्या करकरी नदीच्या पात्रातून देखील असे सोन्याचे कण मिळतात. अनेकांचं असं मत आहे की करकरी नदीच्या पाण्यातील सोन्याचे कणच पुढे जाऊन स्वर्णरेखा नदीच्या पात्रात येतात.

नदीच्या आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या ‘मोरंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल मातीमध्ये देखील सोन्याचे कण आढळतात.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.