तेजस्वीची खुली ऑफर, चाचा-भतीजा पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत असल्याचं सांगतायत

लालूप्रसाद यांच्यानंतर त्यांचे धाकटे सुपुत्र तेजस्वी यादव सध्यातरी राष्ट्रीय जनता दलाचा गाडा नीट हाकतायत असं दिसतंय. २०१५ मध्ये लालूप्रसाद यांच्या अनुपस्थित लढल्या गेलेल्या निवूडणुकीत  तेजस्वी यादव नितीश कुमारांबरोबर सत्ता स्थापन करण्यास यशस्वी झाले होते.

२०१५ मध्ये RJD आणि JD(U) यांनी यांनी युती करून अनुक्रमे ८० आणि ७१ जागा जिंकल्या होत्या.

जागा जास्त येऊनही राष्ट्रीय जनता दलानं निवडणूकी आधी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार नितीश कुमार मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असं  सरकार स्थापन केलं.

मात्र २०१७ मध्ये, RJD ने आपला जुना मित्र भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केले. राजदला पुन्हा सत्त्तेबाहेर जावं लागलं.

बिहारमधील २०२० च्या विधानसभा निवडणुकीत, RJD ७५ जागांसह २४३ सदस्यांच्या सभागृहात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.

भाजपने ७४ तर जेडीयूने ४५ जागा जिंकल्या. मात्र तरीही अजून तरी सत्तेत जाऊ शकला नाहीये.

मधल्या काळात भतीजा तेजस्वी आणि चाचा नितीशकुमार यांच्यात वितुष्ट आलं होतं मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. त्याचबरोबर जरी नितीशकुमार आणि भाजप हे जरी जुने मित्र असले तरी जयप्रकाश यांच्या आंदोलनाचा वारसा सांगणाऱ्या  RJD आणि JD(U) यांच्यातही वैचारिक दृष्ट्या बरीच समानता असल्याचं जाणकार सांगतात. 

आता असाच एक मुद्दा आलाय की ज्यामुळे हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात असं बोललं जातंय. तर मुद्दा आहे जातीनिहाय जणगणनेचा. भाजपाचा जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात आहे तर काँग्रेस, आरजेडी आणि नितीश कुमारांचा जनता दल हे पक्ष मात्र या जणगणनेसाठी आग्रही आहेत. 

आता याच मुद्यावरून सत्ताधारी नितीशकुमार आणि बीजेपीमध्ये चांगलंच वाजल्याचं सांगण्यात येतंय. आणि याच वादाला खतपाणी घातलेय सत्तेबाहेर असणाऱ्या राष्ट्रीय जनता दलानं. जर भाजपनं नितीश कुमारांचा जातीनिहाय जनगणनेवरून पाठिंबा काढला तर आपण नितीश सरकारला पाठिंबा देऊ असं तेजस्विनीच्या पक्षानं म्हटलंय. 

“जे भाजप मंत्री सरकारला विरोध करत आहेत त्यांना काढून टाका. नितीश कुमारांनी भाजपपुढे झुकू नये. विशेष दर्जा आणि जातीय जनगणनेच्या मुद्द्यांचा नितीश सरकारवर काही राजकीय परिणाम होत असेल, तर विरोधकांची महाआघाडी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आहे. तुम्ही स्वतःला एकटे पाहणार नाही,” असे आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.

“ही ऑफर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्याकडून आली आहे.” असं म्हणत त्यांनी भाजपच्या गोटात एकंच खळबळ माजवून दिलेय.

तसेच राष्ट्रीय जनता दलाच्या या ऑफरनं नितीशकुमारांनाही भाजपच्या रेट्यापुढं तग धरण्यासाठी नवीन बळ मिळालंय.

राजदची नितीश कुमारांना आमिष देण्याची ही पहिलीच वेळ नाही. डिसेंबर २०२० मध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये JD(U) च्या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, RJD ने कुमार यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रक्षेपित करण्याची ऑफर देऊन दोन मित्रपक्षांमधील भांडणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. सध्या नितीश कुमार यांच्यानंतर कोण प्रश्नाचं उत्तर जनता दल (युनाइटेड )कडं नाहीये त्यामुळं नितीशकुमार यांच्या पक्षाचं भविष्य अधांतरी आहे. त्यामुळं लॉन्ग टर्म विचार करून मागंचं सगळं झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत तेजस्वी पुन्हा नितीश यांच्याकडे चाललेत असं सांगण्यात येतंय.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.