हे रोड मराठा आहेत तरी कोण ?

हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातल्या एका छोटाश्या गावात २३ वर्षांपूर्वी जन्मलेला पोरगा आज सगळ्या जगाला माहिती झाला..त्याच्या कर्तुत्वामुळे, त्याच्या कष्टामुळे, त्याच्या जिद्दीमुळे !

नीरज चोप्रा ! हे नाव आता येणारी प्रत्येक पिढी लक्षात ठेवेल हे मात्र नक्की. भारताला प्रथम वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवून देणारा ठरला.

नीरज या खेळात आला मात्र त्याला किंव्हा त्याच्या आजूबाजूला  भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी  नव्हती. त्याला या खेळाची प्रशिक्षण परवडणारं नाही म्हणून युट्यूब वरून पाहत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने ट्रेनिंग घेतली.

मात्र त्याच्या या कर्तुत्वाचे कौतुक करीत आणखी एक विषय मात्र कालपासून चांगलाच चर्चेत आला आहे तो म्हणजे तो रोड मराठा समाजातून आलाय. त्याने स्वतः २०१६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. २०१६ मध्ये भारतात झालेल्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावलं तेंव्हा त्याने एका इंग्रंजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं,

“मला मी रोड मराठा असल्याचा अभिमान आहे”.

आणि म्हणूनच सगळीकडे आता एकच चर्चा चालूये कि, नीरजचं कनेक्शन महाराष्ट्राच्या मातीशी आहे. 

बरेच वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या विविध माध्यमांवर नीरजच्या समाजावर, त्याच्या जातीवर उलटसुलट चर्चा चालू आहे. तो अमुक जातीचा म्हणून त्या तमुक जातीच्या लोकांनी, रोड मराठा असणाऱ्या नीरजच्या रक्तातच मराठ्यांची ताकद आहे इत्यादी स्टेट्स ठेवले. सद्या हा ट्रेंड च बनलाय कि, कुण्याही व्यक्तीने कशात यश कमावले, अमुक कारणामुळे तो व्यक्ती चर्चेत आला कि लगेच त्याची जात शोधली जाते.

त्याच ‘शोधा’ला नीरज देखील कारणीभूत ठरला आहे.

तो मराठी संस्कृतीच्या मातीतला आहे, किंव्हा त्याची नाळ महाराष्ट्राशी जुळली आहे किंव्हा त्याचे पूर्वज मूळचे महाराष्ट्राचे म्हणणे रास्त ठरेल. तसेच तो एका विशिष्ठ जातीचा म्हणून अभिमान मानण्यापेक्षा तो एक भारतीय म्हणून बजावलेल्या कामगिरीचा अभिमान बाळगावा हेच योग्य ठरेल !

असो याचनिमित्ताने आपण यावर बोलणं जास्त महत्वाचं आहे कि, चर्चेत आलेली, हि रोड मराठा संकल्पना काय आहे ?

फक्त मराठ्यांचं नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं आणि महत्वाचं युद्ध म्हणून पानिपत युद्ध ओळखलं जातं. जे १७६१ मध्ये झालं होतं, या युद्धाचे नेतृत्व करत असणारे सदाशिव राव भाऊ पेशवा हे अफगानिस्तानच्या अहमद शहा अब्दालीविरुद्ध पराभूत झाले. या युद्धात माहितीच्या आकड्यानुसार ४०,००० ते ५०,००० मराठा सैनिक मारले गेलेत असं म्हणलं जातं.

मात्र रोड मराठा कम्युनिटी ची खरा प्रवास येथून चालू होतो.

या पानिपतच्या युद्धात जखमी झालेले सैनिक आपला जीव वाचवत महाराष्ट्रात परतू लागले तर काही युद्ध मैदानाच्या आजूबाजूला सुरक्षित वाटेल तिकडे पळून गेले. तर काही सैनिकांनी आजूबाजूच्या परिसरात काही काळासाठी म्हणून आश्रय घेतला आणि कायमचे तिथेच स्थायिक झाले.

पण स्थानिक लोकांपासून कसलाही धोका होऊ नये, कोणत्या अडचणी येऊ नये म्हणून त्यांनी आपली मराठा ओळख लपवली आणि ‘आम्ही एका राजा रोडच्या समाजाचे आहोत असे सांगायला लागले. स्वतःच्या ‘मराठी’ नावानं कुणी ओळख करून दिली तर कुणी तेथील लोकांची नावे लावून घ्यायला सुरुवात केली. तेथे पानिपत, सोनिपत, करनाल, कैथल, रोहतक या जिल्ह्यांमध्ये रोड मराठा समजाची बरीच मोठी संख्या आहे.

तसेच भारताचा उत्तर प्रांत, हरियाणा, उत्तर प्रदेश मध्ये जिथे जिथे पेशव्यांच्या फौजा गेल्या होत्या तिथे तिथे त्या मराठ्यांचे वंशज आजही वास्तव्यास असल्याची माहिती मिळते. पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे देखील काही मराठ्यांचे वास्तव्य आहे, असे संदर्भ इतिहास संशोधकांनी शोधले आहेत.

कालांतराने स्थायिक झाल्यावर मग हळूहळू त्या लोकांनी स्वतःची ओळख उघड उघड   तेही मोठ्या गर्वाने ‘रोड मराठा’ अशी करून देणे सुरु केले. अशाप्रकारे नीरज देखील पानिपत जिल्ह्यात स्थायिक झालेल्या मराठ्यांपैकी एक आहे.

जे पानीपतच्या युद्धानंतर परतीचे मार्ग बंद झाल्यामुळे तेथील आसपासच्या गावांमध्ये स्थायिक झाले होते. मात्र काळानुसार, येणाऱ्या पिढीनुसार त्यांची ओळख धूसर होत गेली आणि ते तिथल्या संस्कृतीसोबत मिसळून गेले. मात्र तरीही महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या खुणा आजही तिथे दिसून येतात असं म्हणलं जातं.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.