भावाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला म्हणून या भिडूने रस्ता सुरक्षा मोहीम उभारली…

आपल्या देशात रस्ते इंजिनिअर लोकं बनवत नाही तर आपल्या देशात रस्ते हे राजकारणी लोकं तयार करतात. आता हे एकदम ठोक मत आहे आणि ते सत्यही तितकंच आहे. भारतात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रस्ते अपघात हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे असाच एक अपघात एका तरुणाच्या भावासोबत झाला आणि त्यातून एक समाजोपयोगी काम त्यांनी सुरू केलं त्याबद्दलची ही प्रेरणादायी गोष्ट.

पीयूष तिवारी 2007 पर्यंत लॉस एंजेलिसच्या एका कंपनीत मोठ्या पदावर होते, त्यांच्या भावाच्या एका रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने त्यांचेही आयुष्य बदलले. याआधी त्यांच्या मामाचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. भावाच्या अंत्यसंस्कारानंतर ते अपघाताच्या ठिकाणी गेले असता त्यांना ऑटोचालकाने दुचाकीवरून जाणाऱ्या भावाला धडक दिल्याचे समजले. लोक जमायला लागल्यावर त्याने पळून जाण्यासाठी पुन्हा टेम्पो भावाच्या अंगावर घातला. यादरम्यान ते ४५ मिनिटे तडफडत राहिले. कोणीही रुग्णवाहिका बोलावली नाही आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

इतक्या विचित्र अपघाताने पवन तिवारी खूप अस्वस्थ होऊ लागले आणि त्यानंतर त्यांनी हैदराबादच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे प्रमुख अधिकारी डॉ. महेश जोशी यांची भेट घेतली. तिथे त्यांना समजले की भारतात अपघात झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नाहीत. पोलीस केसेस, कोर्ट-कचेर्‍या, वाद ही या सगळ्याची मोठी भीती असते. 50% लोकांचा मृत्यू होतो कारण ते वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत. यावर काहीतरी उपाय शोधणं गरजेचं झालं होतं.

यानंतर, त्यांनी ठरवले की आपण असे काहीतरी करू ज्याने अपघात झालेल्या लोकांना त्वरित मदत होईल. 2008 मध्ये, पवन तिवारी यांनी सेव्ह लाइफ फाउंडेशनची स्थापना केली गेली आणि रस्ता सुरक्षा मोहिमेत ते सहभागी झाले. अडीच वर्षे काम करताना त्यांनी संस्था चालवली. यानंतर पूर्णवेळ काम करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले. 2012 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि 30 मार्च 2016 रोजी निर्णय आला की, कोणत्याही प्रकारच्या चौकशीची, रुग्णालयात थांबण्याची किंवा न्यायालयात जाण्याची गरज नाही, सन 2019 मध्ये, याबाबत कायदाही आला.

यानंतर पवन तिवारी यांनी खराब रस्त्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. मुंबई-पुन द्रुतगती मार्ग त्यांनी स्वीकारला. यानंतर, तेथे झालेल्या अपघातानंतर 52% लोकांचे प्राण त्यांनी वाचवले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग-48 स्वीकारला थोडक्यात तिथं त्यांनी उत्तमप्रकारे लक्ष देण्यास सुरुवात केली. दिल्लीत भालस्वामध्ये. आता भारत सरकारने हे मॉडेल स्वीकारले आहे. राज्यातील 15 धोकादायक महामार्ग दत्तक घेतले जात आहेत तेही पवन तिवारी यांनी उभारलेल्या फाउंडेशनमुळे.

आज पवन तिवारी यांच्या भावाच्या बाबतीत घडलेली घटना इतर कोणासोबत व्हायला नको म्हणून ते प्रयत्नशील आहेत. उलट लोकं त्यांचं कौतुक करतात आणि सांगतात की जे काम सरकारला करायला हवे ते काम एक उमदा तरुण करतोय हीच गोष्ट विशेष आहे.

हे ही वाच भिडू :

English Summary :Piyush Tiwari is an Indian social entrepreneur, focused on improving road safety, access to emergency medical care and urban governance across India. He is the Founder and CEO of save life foundation,and best known for his work to pass a Good Samaritan Law in India. In 2016, GQ Magazine named him as one of the most influential young Indians. In 2014, Tiwari was featured as an expert on Satyamev Jayate, a popular TV show on social issues, hosted by actor Amir Khan. The episode Tiwari was featured in was focused on the epidemic of road accidents in India.

Webtitle :  Road safety campaign : man started road safety campaign after his brother died in road accident

Leave A Reply

Your email address will not be published.