रॉबिन उथाप्पा हा एमएस धोनीचा लव्ह गुरू होता.

भारताचा आजवरचा सगळ्यात यशस्वी म्हणवला जाणारा कप्तान महेंद्रसिंग धोनी ची आणि त्याच्या बायकोची म्हणजेच साक्षीची लव्ह स्टोरी आपल्यापैकी अनेकांना माहीतच आहे. धोनीवर आलेला सिनेमा खूप जणांनी पहिला आहे

पण सिनेमात दाखवलं नाही ते सिक्रेट तुम्हाला सांगतो.

माही आणि साक्षी लहानपणापासूनचे फॅमिली फ्रेंड आहेत असं अनेकजण सांगतात. पण तसं काही नाही.

अगदी सुरवातीपासून धोनी अतिशय लाजाळू होता. क्रिकेट त्याच पहिलं प्रेम होतं. मुलींसाठी त्याला वेळच नव्हता.

माहीच्या आयुष्यातही बऱ्याच घटना घडून गेल्या. अगदी राज्यस्तरावर जरी खेळायला मिळेल का याच स्वप्न बघणारा धोनी टीम इंडिया मध्ये निवडला गेला.

ज्यांना फक्त फोटोत पाहिलं होतं अशा सचिन द्रविड गांगुली यांच्या बरोबर भारताला मॅच जिंकून देऊ लागला.

दरम्यान त्याच्या आयुष्यात प्रियांका झा नावाची एक मुलगी येऊन देखील गेली. पण दुर्दैवाने तिचा अपघातात मृत्यू झाला आणि धोनीला प्रचंड मोठा धक्का बसला.

यातून सावरायला त्याला बराच वेळ गेला. दरम्यानच्या काळात त्याच्यासाठी तहानभूक सर्व काही क्रिकेट होतं. त्यानं भारतीय क्रिकेट साठी स्वतःला वाहून घेतल.

त्याच आयुष्य बदलून टाकणारी घटना म्हणजे 2007 च्या टी20 वर्ल्ड कप

योगायोगाने त्याला कप्तानपद मिळालं आणि भारताला त्याने वर्ल्ड कप मिळवून दिला.

तेव्हा पासून अख्खा देश या नव्या कॅप्टन कुलच्या प्रेमात पडला. जिथे जाईल तिथे धोनीची हवा होती. अनेक मुली त्याच्यासाठी पागल झाल्या होत्या.

रोज एका फिल्मी हिरॉईनशी धोनीच लिंकअप झालंय अशा वावड्या फिरू लागल्या होत्या.

अशातच भारताच्या दौऱ्यावर पाकिस्तानी टीम आली. गुवाहाटीला पहिली वनडे खेळली जाणार होती. भारतीय टीम कोलकताच्या ताज हॉटेल मध्ये उतरली होती. कॅप्टन धोनीच होता.

धोनी जेव्हा रूम चेक इन करण्यासाठी गेला तेव्हा त्याला रिसेप्शनवरचा चेहरा ओळखीचा वाटला.

साक्षी त्याकाळात औरंगाबादच्या कॉलेज हॉटेल मॅनेजमेंट शिकत होती.

सुट्टीमध्ये इंटर्नशीप करण्यासाठी ती कोलकात्याला आली होती. इंटर्नशिपचे अगदी थोडेच दिवस उरले होते.

इतक्या दिवसांनी भेट झाली होती पण थेट जाऊन बोलण्याचा धोनीच धाडस झालं नाही. त्याने मॅनेजर युद्धजित दत्ता याच्या कडून साक्षीचा फोन नंबर घेतला आणि तिला एसएमएस पाठवला.

सुरवातीला साक्षीला हा कोणी तरी केलेला prank आहे असं वाटलं.

मग नंतर तिला कळाल की कॅप्टन कुल माही स्वतः तिला मेसेज करत आहे. दोघांची मैत्री सुरू झाली.

काही दिवसांनी धोनीने तिला प्रपोज केले. प्रत्येक मुलीप्रमाणे साक्षीने थोडे आढेवेढे घेतले. धोनीला बरच तंगवल.

धोनीने साक्षीला मनवण्यासाठी औरंगाबादला लपून छपून फेऱ्या मारल्या.

या दोघांना रिक्षामधून बिवी का मकबऱ्याला सोडलं असल्याच अनेकजण शपथपूर्वक सांगतात.

अनेकांचं म्हणणं असत की आमच्या मुळे धोनीची लव्हस्टोरी रुळावर आली. पण साक्षीनेच एकदा ट्विट करून आपल्या स्टोरी मागचा क्यूपिड कोण हे सांगितलं.

रॉबिन उथाप्पा.

हो रॉबिन उथाप्पा साक्षी आणि एमएस धोनीचा लव्ह गुरू होता.

जेव्हा साक्षी आणि धोनीची कोलकात्याला ताज हॉटेल मध्ये खूप वर्षांनी भेट झाली त्यादिवशी उथाप्पा धोनी बरोबरच होता. पण रॉबिनने नेमकं काय केलं हे सिक्रेट धोनीने बाहेर येऊ दिलेलं नाही.

 

पूढे धोनी आणि साक्षीने लग्न केलं. त्यांना झिव्हा नावाची एक गोड मुलगी आहे. रॉबिन उथाप्पा क्रिकेटमधून बाहेर पडून अनेक वर्षे झाली. त्याला अनेकजण विसरूनही गेलेत पण साक्षी आजही रॉबिनचे उपकार विसरत नाही. आजही तो धोनी कुटुंबाच्या बेस्ट फ्रेंड पैकी एक आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.