भारताचा स्पेस प्रोग्रॅम बनवणाऱ्या रॉकेट बॉईजची फ्रेंडशिप पण तेवढीच डिप होती

साल होत १९४४ चं. भारत देश इंग्रजांच्या पारतंत्र्यात जखडलेला. जग महायुद्धाच्या खाईत होरपळत होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत  जनसामान्यांपासून दूर असणाऱ्या गर्भश्रीमंत घराण्यातील ३५ वर्षांच्या तरुणानं देशाच्या उज्ज्वल भवितव्याचं महान स्वप्न पाहिलं होतं. त्यांचं नाव होमी जहांगीर भाभा.

१९६५ साली ऑल इंडिया रेडियोला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होत की भारत सरकारची जर परवानगी मिळाली तर केवळ १८ महिन्यात आपण अणुबॉम्ब तयार करु शकतो. त्यांच्या या वक्तव्यान् जगभर खळबळ माजली होती. खासकरुन अमेरिकेच्या पायाखालची वाळू सरकली होती.

तर दुसरीकडे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ची मुहूर्तमेढ रचणारे डॉ. विक्रम साराभाई होते. त्यांना भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार ही म्हटलं जातं. भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात विपुल संशोधन केलेल्या डॉ. विक्रम साराभाई आणि खमक्या होमी भाभांची फ्रेंडशिप लैच भारी होती.

भाभांचे वडील हे टाटा समुहाचे सल्लागार होते. लहानपणापासूनच त्यांना विज्ञानावरील पुस्तकांच्या वाचयला आवडायची. त्यामुळे सहाजिकच त्यांचा विज्ञान शाखेकडे कल वाढला. १९३० साली त्यांनी केंब्रीज विद्यापीठातून इंजिनीअरची पदवी घेतली. १९३३ साली त्यांचे ‘अॅबसॉर्बशन ऑफ कॉस्मिक रेडीएशन’ हे पहिले संशोधन प्रसिध्द झाले आणि पुढे त्यांच्या संशोधन कार्याला वेग आला. १९४० साली डॉ. भाभा भारतात परतले आणि बेंगलोर इथं भारतीय विज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केली.

त्याच संस्थेत गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र यांमध्ये विशेष आवड असणारे डॉ. विक्रम साराभाई संशोधन करत होते. इथे त्यांना  मार्गदर्शक लाभले नोबेल पुरस्कार विजेते सी. व्ही. रमन. सर रमण हे डॉ. भाभा यांना सुद्धा ओळखायचे. कला, संगीत क्षेत्रात आवड असणाऱ्या भाभांना सर रमण ‘भारताचा लियोनार्डो द विन्सी’ म्हणायचे.

या संस्थेतच भाभांची आणि साराभाईंची सुध्दा ओळख झाली. दोघांची जुगलबंदी रंगली ती संशोधनाच्या क्षेत्रात. आणि विशेष म्हणजे भाभांमुळेच मृणालिनी स्वामीनाथन आणि विक्रम साराभाई यांची ओळख झाली. ओळखीच रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झालं. 

होमी भाभा कलेचे उपासक तर होतेच पण कलेचे पारखी सुध्दा होते. संशोधन क्षेत्र सोडून चित्रकला, नृत्य, संगीत यांची त्यांना विशेष आवड होती. या आवडीनिवडीचा परिणाम कलेच्या क्षेत्रातले दिग्गज त्यांचे मित्र मैत्रिण होते. यातल्याच एक होत्या, मृणालिनी स्वामिनाथन.

मृणालिनी या अत्यंत पारंगत नृत्यांगना होत्या. त्यांच्या नृत्याचे चाहते पंडित नेहरूंपासून ते होमी भाभांपर्यंत सर्वच क्षेत्रातली मान्यवर मंडळी होती. मृणालिनी यांनी मनोमन ठरवलं होतं की आता लग्न करायच नाही, आपलं संपूर्ण आयुष्य आपण आपल्या नृत्याला वाहून घ्यायचं. या मृणालिनी बॅडमिंटन सुद्धा खेळायच्या. त्या भाभांच्या बॅडमिंटन पार्टनर होत्या.

एकदा बॅडमिंटनच्या कोर्टवर मृणालिनी यांची भेट विक्रम साराभाई यांच्याशी झाली. खर तर विक्रम साराभाई भाभांना भेटायला आले होते. तिथं मृणालिनी यांना बघून मनाशीच म्हंटले, की हे कसले कपडे घातलेत या मुलीने. पण तिथं भाभांनीच साराभाईंच्या कपड्यांची टर उडवली.

झालं, मुलीसमोर झालेली चेष्टा विक्रम साराभाई यांना काय खपली नाही. ते तिथून निघून गेले. पुढं बऱ्याच दिवसांनी भाभा साराभाईंकडे आले आणि म्हणाले विक्रम चल एका कार्यक्रमाला जाऊ, तो कार्यक्रम होता मृणालिनी यांचा.

कार्यक्रमात गेल्यावर विक्रम साराभाई पाहतात तर काय, अत्यंत सूंदर नृत्यांगना.

मृणालिनी यांचा नृत्याविष्कार साराभाई पडले ना प्रेमात. माहीत नाही, पण या गोष्टीसाठी विक्रम साराभाईंनी नक्कीच आपल्या भाभा नावाच्या दोस्ताचे आभार मानले असतील. पुढं मृणालिनी स्वामिनाथन, मिसेस साराभाई झाल्या. 

हा किस्सा किती लोकांना महिताय, हे माहीत नाही मात्र हा किस्सा वाचल्यावर आपल्याला पण पोरगी पटवून देणारा होमी भाभांसारखा एक दोस्त असावा असं पोरांना मनोमन वाटल्याशिवाय राहणार नाही. आता तर साराभाई आणि भाभा या दोघांच्या दोस्तीवर रॉकेटबॉईज हे नवी वेबसिरीज येतेय. त्यातून तर अजूनच किस्से कळतील.

हे ही वाच भिडू.

web title : Rocket Boys : Friendship between Vikram Sarabhai and Homi bhabha

Leave A Reply

Your email address will not be published.