आज राहुल आणि रोहितने ८५ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला. पण त्यामागे देखील एक कहाणी आहे

भारतीय क्रिकेट टीम सध्या टेस्ट मॅचसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या ५ सामन्यांच्या टेस्ट सीरिजमधला दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जातोय. दरम्यान, या दौऱ्यावर भारतीय संघानं आपला कित्येक वर्ष जुना रेकॉर्ड ब्रेक केलाय.

भारतीय संघाच्या रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनी जबरदस्त खेळी करत कसोटीच्या पहिल्या डावात २१४ धावांची भागीदारी केली. केएल राहुलने सामन्याच्या पहिल्या डावात १२९ आणि दुसऱ्या डावात ५ धावा केल्या. तर रोहित शर्माने पहिल्या डावात ८३ धावा आणि दुसऱ्या डावात २१ धावा केल्या. अशा प्रकारे, राहुलने १३४ आणि रोहितने १०४ धाव करून भारताला चांगली सुरुवात करून दिली.

१९३६ नंतर पहिल्यांदाच भारताच्या ओपनिंग जोडीच्या दोन्ही फलंदाजांनी टेस्ट मॅचमध्ये स्वतंत्रपणे १०० धावा केल्यात. 

१९३६ साली विजय मर्चंट आणि सय्यद मुश्ताक अली यांच्या जोडीनं हा कारनामा केला होता.

तर १९३६ साली भारतीय संघ इंग्लडच्या दौऱ्यावर होता. इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानावर ही टेस्ट सिरीज सुरु होती.  त्यावेळी मुश्ताक अली आणि विजय मर्चंड या दोघांनी समनीला सुरुवात केली. या कसोटी सामन्यात मुश्ताक अलीने ११२ रन्सची इनिंग साकारत अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. विदेशी भूमीवर शतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

दरम्यान या सामन्यात आणखी एक रेकॉर्ड नोंदवला गेला होता. तो म्हणजे मुश्ताक अली  आणि विजय मर्चंड या दोन्ही खेळाडूंनी मिळून २०३ रन्सची भागीदारी केली होती.  ही भारतीय संघाकडून करण्यात आलेली पहिलीच द्विशतकी भागीदारी ठरली होती.

दरम्यान, हा रेकॉर्ड करण्यामागचा हेतू सुद्धा तेव्हाच्या भारतीय संघांच्या कॅप्टनचा चुकीचा हेतू यशस्वी न करण्याचा होता.

तर १९३६ मध्ये भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन विजयनगरमचे महाराज कुमार म्हणजे विज्जी होते. ते चांगले क्रिकेटपटू होते, पण नेहमीच स्वतः ला महान खेळाडू म्ह्णून घ्यायचे. आपल्या सत्ता आणि पैशाच्या जोरावर त्यानं हे कॅप्टनपद मिळवलं होत.  

या इंग्लंड दौऱ्यावर  सय्यद मुश्ताक अली, लाला अमरनाथ, विजय मर्चंट, मोहम्मद निसार आणि सी. नायडू असे दिग्गज खेळाडू होते. पण मुळात विज्जीचं आपलंच वेगळं म्हणणं असायचं. आपल्यापेक्षा कोणताच महान खेळाडू नाही, हे त्यांना सिद्ध करायचं होत. त्यांनी संघात – खेळाडूंमध्ये अनेक कुरघोड्या केल्या.

अशाच एक सामन्यात  स्वतःच अपयश लपवण्यासाठी विज्जीने टीम स्पिरिट नष्ट करण्याच्या प्लॅन आखला. यासाठी त्यांनी भारताचे सलामीवीर विजय मर्चंट आणि सय्यद मुश्ताक अली यांना टार्गेट केलं.

टेस्ट मॅचचा दुसरा डाव सुरू होण्याआधी त्याने मर्चंड आणि मुश्ताक या दोघांचे कान भरवायला सुरुवात केली. त्याने आधी मर्चंडला आत बोलवून सांगितले कि, ‘तू मुश्ताकवर विश्वास ठेवू नको. तो तुला रन आउट करण्याचा प्लॅन आखतोय.’

विज्जीचं हे बोलणं ऐकून मर्चंड थोड्या वेळ बुचकळ्यात पडला, त्याने विचारले, ‘तो असं का करेल? यावर विज्जी म्हणाले, कारण तो मुसलमान आहे.”

विज्जीनी हाच प्लॅन मुश्ताकवर सुद्धा लागू केला. त्यांनी मुश्ताकला संगितलं कि, “तू त्या गुज्जू बनियावर विश्वास ठेवू नका! तो बनिया तुला रन आउट करेल. “

विज्जीच्या या बोण्यावर मुश्ताक गोंधळून गेला.

विज्जीचं हे वागणं प्रत्येक खेळाडूला माहित होत. त्यामुळं मुश्ताक आणि मर्चंड यांनी एकमेकांशी बोलणं योग्य मानलं. आणि अश्याप्रकारे त्यांना विज्जीचा प्लॅन कळाला. या दोघांनीही ठरवलं कि, काहीही झालं तरी एकमेकांना रन आउट करायचं नाही.

आणि मग काय विजय मर्चंड आणि मुश्ताक अली या दोन्ही खेळाडूंनी २०३ धावांची जबरदस्त भागीदारी करत रेकॉर्ड केला आणि कॅप्टनचा डाव हाणून पडला. तेव्हा त्यांनी जिद्दीने केलेला रेकॉर्ड गेली ८५ वर्षे टिकला आणि आज तो रोहित शर्मा व के.एल राहुलने मोडला. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.