काकांनी केलेल्या ५० रुपयांच्या मदतीमुळे डॉन ऑफ बोरिवली क्रिकेटचा हिटमॅन बनला…

इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये आज इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सीरिजची तिसरी वनडे मॅच. या मॅचमध्ये ओपनिंगला आले रोहित शर्मा आणि शुभमन गिल. आता गिल तर इन फॉर्मच आहे. २०० रन्स मारल्या नंतर मागच्या मॅचमध्ये त्याने फार नाही पण ४० रन्स तरी केल्या होत्या.

दुसरीकडे रोहित शर्मा, मागच्या ३ वर्षांत एकही शतक न केलेला… कधी थोड्या धावा करतोय तर, कधी थोड्या जास्त धावा पण कधी कधी तर अगदीच निराशाजनक कामगिरी करत होता. म्हणजे तो टीमचा कॅप्टन म्हणून खेळत असला तरी, रोहित शर्माचा वैयक्तिक खेळ मात्र पाहायला मिळाला नव्हता.

आजची मॅच मात्र जरा वेगळी ठरली, शुभमन गिल आणि रोहित शर्मा दोघांनीही शतक केलं. रोहितनं ८५ बॉल्समध्ये १०१ रन्स केल्या तर, शुभमनने ७८ चेंडूत ११२ धावा केल्या. रोहितने ६ सिक्स आणि ९ फोर मारले. आजच्या मॅचमध्ये रोहित शर्मा फॉर्ममध्ये आल्याचं दिसतंय.  जुना रोहित परत पाहायला मिळाला.

जुना म्हणजे कोणता रोहित? तर, वनडे क्रिकेटमध्ये ३ वेळा डबल सेंच्युरी लावण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे करणारा,  तसचं २०१९ च्या  आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाच सेंच्युरी लावून गोल्डन बॅटचा किताब आपल्या नावे केलेला भारतीय क्रिकेट संघाचा ओपनर  रोहित शर्मा. त्यानं आपल्या बॅटिंगच्या जोरावर अनेक बॉलर्सच येडं पळवलंय.

खरं तर, जगातल्या टॉप एक्सायटिंग बॅट्समनच्या यादीत नेहमीच रोहितचा नाव घेतलं जातं. त्यानं आतापर्यंत २९ शतक झळकावली आहेत. ज्यामुळे त्याला रो’हिट’ असं बोललं जात. पण फार क्वचित लोकांना माहित असेल कि, रोहितला ‘डॉन ऑफ बोरिवली’ असंही म्हंटल जात. रोहितचा पूल शॉट खरोखरचं पाहण्याजोगा असतो.

ऑफ स्पिनर म्हणून सुरुवात केली होती

संघातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या  खेळाडूंमध्ये रोहित शर्माचं सुद्धा नाव येत. खर तर, आपल्या विस्फोटक बॅटिंगनं सगळ्यांना चकित करणाऱ्या रोहितनं  आपल्या क्रिकेट करियरची सुरुवात एक ऑफ स्पिनर म्हणून केली होती.  रोहितचे वडील गुरुनाथ शर्मा एका ट्रान्सपोर्ट कंपनीत अटेंडंट म्ह्णून  काम करायचे. तर आई पौर्णिमा तेलगू बॅकग्राउंडची. घरात वडील एकटेच कमवते असल्याने  घरात मोजकेच  पैसे असायचे.

पण रोहितचं क्रिकेटबद्दलच खूळ पाहून त्याच्या काकांनी त्यावेळी ५० रुपयांची मदत केली. काकाची मदत आणि काही मित्रांनी मिळून जमा केलेल्या पैशांनी रोहितला एका क्रिकेट अकॅडमीत दाखल केलं गेलं.

१९९९ ची गोष्ट ज्यावेळी तो ऑफ स्पिनर म्ह्णून खेळायचा, त्यावेळी दिनेश लाड त्याचे कोच होते. लाड यांनी त्यावेळी  रोहितला प्रेरित केलं कि तू तुझी अकॅडमी चेंज कर. त्यांनतर रोहितने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुलमध्ये प्रवेश घेतला. पण तिथली फी जास्त होती, पण स्कॉलरशिपच्या मदतीनं ती अडचणही दूर झाली. यादरम्यान त्यानं ज्युनियर क्रिकेट टूर्नामेंटमध्ये चांगलं प्रदर्शन केलं. त्यानंतर मुंबईच्या अंडर १७ मध्ये त्याची निवड झाली.

दरम्यान, त्याच नशीब चमकल ते २००६ मध्ये. उदयपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या देवधर ट्रॉफीमध्ये १२३ बॉलवर १४२ नॉटआऊट धावा त्यानं केल्या. त्यावेळीच त्याच नाव समोर आलं. यांनतर २००७ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्यानं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला. महत्वाचं  म्हणजे त्यावेळी तो फक्त २० वर्षांचा होता. 

यानंतर रोहितनं २०१३ ला  टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केला. वेस्ट इंडिजच्य विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या समन्यातली खास गोष्ट म्हणजे रोहितची जी टेस्ट कॅप होती, ती सचिन तेंडुलकरनं त्याला दिली होती. तो प्रसंग फार सिम्बॉलिक होता, कारण त्यावेळी सचिनचं करियर संपत होत तर रोहितच करियर सुरु होत होतं. या मॅचमध्ये  त्यानं शतक झळकावत आपल्या टेस्ट क्रिकेटची जबरदस्त सुरुवात केली.  असा करणारा तो १४ वा बॅट्समन होता, ज्यान आपल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये शतकं मारलं  होत.

रोहितच्या बॅटिंगचे सर्वसाधारण क्रिकेटप्रेमीच नाही तर सचिनचं तेंडुलकर आणि भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीसुद्धा फॅन आहे. विराट आजही पॅव्हिलियॉन मध्ये बसून डोळ्यात तेल घालून रोहितची बॅटिंग पाहतो.

सचिन तेंडुलकरला त्याच्या निरोप समारंभा वेळी जेव्हा विचारलं गेलं कि, तुम्हाला काय वाटत कि तुमच्या नंतर तुमचा १०० सेंच्युरीचा रेकॉर्ड कोण मॉडेल? त्यावेळी सचिनने दोन जणांचं नाव घेतल एक होता विराट कोहली तर दुसर नाव रोहितचा होत, ज्याने  नुकताच आपल्या करियरची सुरुवात केली होती. 

रोहित आयपीएलच्या  टी २० सिरीजमध्ये मुंबईचा इंडियन्स कॅप्टन आहे. ज्यांनी सर्वाधिक ५ वेळा किताब आपल्या नावे केलाय. संघाच्या या विजयात रोहितचा फार मोठा वाटा मानला जातो.

आज रोहित शर्माला आयपीएलमध्ये १५ कोटी रुपये मिळतात. टीव्हीवरील जाहिरातीमधून देखील रोहित शर्मा कोट्यवधी कमावतो. मात्र काकांनी दिलेल्या फक्त ५० रुपयांमधून केलेली सुरवात तो कधीच विसरू शकत नाही.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.