कोका कोलाला कोट्यवधींना डबऱ्यात घालणारा रोनाल्डो एकदा याच कोकमुळे गोत्यात आला होता

फुटबॉल म्हणलं कि तुमच्या डोळ्यासमोर कोण येतंय हो ?

जर तुमचं उत्तर जर क्रिस्टियानो रोनाल्डो असेल तर भिडू तुमची माझी पसंद एकच आहे !

क्रिस्टियानो रोनाल्डोचं नाव घेतलं बस्स विषयच संपला…हो याच तुमच्या माझ्या आवडत्या रोनाल्डोने   कोको कोलाचाही विषय संपवता संपवता राहिला.

गेल्या दीड दशकापासून फुटबॉल च्या जगात आपले नाव कमवणारा रोनाल्डो ने फुटबॉल विश्वातले अनेक रेकॉर्ड्स मोडले असले तरीही आज त्याने एक रेकॉर्ड मोडला तो म्हणजे, त्याने कोका कोला कंपनीला एक मोठाच धक्का दिला.. तो असा कि,

१५ जून रोजी युरो चषकाच्या पहिल्या सामन्याच्या एक दिवस आधी, बुडापेस्टमधील स्टेडियमवर पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषद चालू झाली, रोनाल्डो येऊन खुर्चीवर बसला. परिषद चालू असतांना त्याने समोर ठेवलेल्या टेबलावरच्या सॉफ्ट ड्रिंक कोका-कोलाच्या दोन बाटल्या उचलून बाजूला ठेवल्या आणि मग त्याने आपल्याबरोबर आणलेली पाण्याची बाटली टेबलावर ठेवली.

त्याच्या कृत्याने तो कोणत्याही प्रकारच्या सॉफ्ट ड्रिंकचे समर्थन करत नाही, कारण ते आरोग्यासाठी चांगले नसते असे सूचित झाले तेही नकळत.

परंतु या नकळत झालेल्या कृतीमुळे कोका-कोलाच्या शेअर बाजारातील किंमतीवर परिणाम झाला आणि कंपनीच्या शेअर्सची किंमत १.६ टक्क्यांनी घसरली. आता तुम्ही म्हणाल, १.६ हे किती कमी आहे तर नाही, या छोट्या वाटणाऱ्या टक्केवारीची किंमत आहे  २,९३,१९,००,००,००० म्हणजेच २९३.४३  कोटी रुपये ..

बसला ना शॉक ? हो त्याने फक्त कोको कोलाच्या बाटल्या इकडच्या तिकडे ठेवल्या  आणि इतकं नुकसान झालं.

याबाबत आता सगळीकडेच चर्चा चालू असतील, परंतु आज आम्ही तुम्हाला रोनाल्डो आणि कोकोकोला चा च एक जुना किस्सा सांगणार आहोत…

तर हा किस्सा आहे खूप खूप वर्षांपूर्वीचा. रोनाल्डो इंग्लंडच्या मॅनचेस्टर युनायटेड नावाच्या क्लबमध्ये खेळायचा त्या दिवसातला. मँचेस्टर युनायटेड  सर्वात श्रीमंत क्लब. रोनाल्डो त्यांचा सगळ्यात महागडा खेळाडू. या किस्स्यात रेयान गिग्स आणि ओले गनर सोलशेयर यांचा मोठा रोल आहे. तेंव्हा तरुण क्रिस्टियानो रोनाल्डो या दोघांसोबत  ड्रेसिंग रूम शेअर करायचा.

सोलशेयरच्या नॉर्वे देशाकडून खेळलेला फुटबॉलर यान ओगे फियरटस याने सोलशेयरकडून ऐकलेला एक जुना किस्सा सांगितला होता.

एकदा सरावाच्या आधी रोनाल्डो नाश्त्याला कॅन्टीन मध्ये रमतगमत आला तर त्याच्या हातात कोक ची बॉटल होती. त्याच्या हातात हि बॉटल पाहून गिग्स प्रचंड संतापला. याच रागाच्या भारत रोनाल्डोला ढकलून भिंतीवर आपटले आणि जोरात ओरडला कि, हे असले कुटाणे नंतर नाही करायचे”

गिग्स चा उद्देश प्रामाणिक होता कि, तरुण आणि फिजिकली फिट असणाऱ्या रोनाल्डो ने असे कोल्ड ड्रिंक पिऊन स्वतःचे शरीर खराब करून घेऊ नये.

त्यानंतर आयुष्यभरासाठी डोळे उघडले म्हणतात असा प्रसंग रोनाल्डो च्या आयुष्यात घडला. त्याच्या जवळच्या लोक सांगतात कि, त्याने त्या प्रसंगानंतर कधीच कोक किंवा इतर कोणत्या कोल्ड ड्रिंक कडे वळूनही पाहिले नाही. काल त्याने पत्रकार परिषदेत कोकची बाटली काढून ठेवली यामागे देखील हाच प्रसंग आहे असं बोललं जात आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.