कोरोना आपत्तीमध्ये संघाने केलेले काम पाहून कौतुक करायला हवं.

सध्या देशभरासह राज्यात कोरोनाचं संकट आहे. अशा संकटाच्या काळात देखील राज्याच्या विविध भागातून संघ स्वयंसेवक निस्वार्थीमनाने कार्यरत आहेत.

राष्ट्रावर आलेले संकट हे आपल्या घरावर आलेले संकट आहे या विचाराने स्वयंसेवक प्रत्येक आपत्तीत कार्यरत राहतात.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली.

सर्व गोष्टी बंद झाल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांची उपासमार होवू लागली. आरोग्याच्या समस्यांनी गंभीर रुप धारण केले. अन्नधान्याच्या तुटवड्यापासून ते आरोग्याच्या सुविधा निर्माण करणे, लाॅकडाऊनच्या नियंमांचे कठोरपणे पालन करणे अशा विविध पातळ्यांवर प्रशासन काम करू लागले.

प्रशासन, वैद्यकिय कर्मचारी व समाजसेवक यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कोरोना युद्धात अग्रेसर राहिले ते स्वयंसेवक.

अन्न पोहचवण्याच्या बाबतीत राज्यभरातील स्वयंसेवकांनी आपआपल्या पातळ्यांवर यंत्रणा उभी केली.

ठाणे येथील तृतीयपंथीयांच्या वस्तीत जावून अन्नधान्य पुरवण्यात आले. दूसरीकडे प्रशासनास सहकार्य करण्याचा भूमिकेतून पुणे जिल्ह्यातील पिरंगुट येथे तलाठी कांमामध्ये स्वयंसेवक सहभागी झाले.

आरोग्य यंत्रणांवरील ताण लक्षात घेवून पुणे व ठाणे येथील रा. स्व. संघ जनकल्याणच्या माध्यमातून विविध वस्त्यामध्ये जावून वैद्यकिय तपासणी करण्याच्या कार्यात पुढाकार घेण्यात आला.

कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाला पोलीस दलातील बांधव बळी पडत आहेत याची माहिती मिळताच विविध ठिकाणी पोलीसांना संरक्षण साधनांचा पुरवठा करण्यासाठी स्वयंसेवक पुढे आले. उदाहरणार्थ कल्याण येथे स्वयंसेवकांकडून पोलिसांनी अत्यावश्यक साहित्य भेट देण्यात आले.

कुर्ला येथे भाभा रुग्णालयातील परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यासाठी निवास व जेवणाची सोय केली.

सुरक्षा व संरक्षणासोबच शेतकऱ्यांच्या समस्या ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आल्यानंतर कल्याण व टिटवाळ्याच्या आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे कीटकनाशकांची कमतरता होती.

ही कमतरता दूर करण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. स्वत: हून शेतकऱ्यांची भाजी खरेदी करून त्यांनी टिटवाळ्याच्या बाजारात ना नफा ना तोटा मार्गाने ही भाजी विकण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडली नाही.

मुंबई शहर व बोरिवली उपनगर येथील सुमारे १२०० पोलीस बांधवांसाठी स्वयंसेवकांनी चहा व नाष्टा व जेवणाची सोय केली. यासह बोरिवली येथे गरिब वस्त्यांमध्ये जेवणाची सुविधा करण्यात आली.

सिंधदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील स्वयंसेवकांनी मुष्टियोजना ही अभिनव संकल्पना साकारली होती.

तालुक्यातील आठ रेशनिंग दुकानांच्या बाहेर स्वयंसेवक उभा राहिले व शासकीय योजनेतून मिळालेल्या धान्यापैकी मुठभर धान्य स्वइच्छेने दान करण्यास सांगण्यात आले.

लोकांनी या योजनेस सकारात्मक प्रतिसाद दिला. जिथे लोकांना शासकीय योजनेतून धान्य मिळत नाही अशा गरजू ठिकाणी हे धान्य वाटण्यात आले.

अशा प्रकारे आजही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवक कार्यरत असून त्यांच्यामार्फत कोरोना लढा उभारला जात आहे. राजकिय द्वेष बाजूला सारून अशा कृतींच कौतुक मोकळ्या मनाने व्हावे.

माहिती संदर्भ : साप्ताहिक विवेक दिनांक १२ मे २०२०

– अजिंक्य काळे

हे ही वाच भिडू

1 Comment
  1. Atharva Wedhane says

    संघ शक्ती कलयुगे
    सेवा हैं यज्ञकुंड, समिधा सम हम जले।

Leave A Reply

Your email address will not be published.