रबराच्या शोधापायी त्यानं आयुष्य घालवलं आणि जग आजही त्याच्या नावावर पैसा कमवतय
प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी नवीन करण्यात खुलं भरलेलं असतंच. बऱ्याच जणांचं ते खुलं काही काळापुरत असतं तर काहीजण मरोस्तोवर त्याचा पिछा काय सोडत नाही. यातीलच एक उदाहरण म्हणजे चार्ल्स गुडईयर. १८ वं शतक संपण्याच्या दोन दिवस आधी त्याच्या जन्म झाला. वडिलांचा हार्डवेअरचा उद्योग असल्यानं चार्ल्सन काही दिवस त्यांच्यासोबत काम केलं. पण १८३४ ला त्याच्या डोक्यात रबर नावाचं जे खूळ बसलं ते कायमचंच.
रबर म्हंटल की, त्याला गंमत वाटायची. ते चिवट होत, टिकाऊ होत, त्यातून पाणी झिरपत नसायचं, त्यामुळे हिवाळ्यात पण रबरी बूट एकदम झक्कास चालत. पण उन्हाळ्यात ते चटकन विटाळायचं आणि त्याचा घाण वास यायला सुरुवात व्हायची. गुडईयरन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा हे आपल्या आयुष्यच ध्येयचं ठेवलं.
आणि त्याने उन्हाळयात टिकणाऱ्या रबराच्या प्रयोगावर काम करायला सुरवात केली. पुढची नऊ वर्ष त्यानं आपला सगळं पैसा, वेळ, याच लाऱणी खर्ची घातला. रबराच्या नादाला लागून त्याच्या सगळ्या वस्तू गहाण पडल्या, त्यामुळं पदरी पडलं दारिंद्र. बऱ्याचदा तो लोकांकडं भिकपणं मागायचा.
त्यावेळी न्यूयॉर्कजवळच्या स्टॅनन आयलँडमध्ये एक बोट लोकांना एका तीरावरून दुसरीकडे काही क्षुल्लक पैशांत न्यायची. पण चार्ल्सकड त्या प्रवासासाठी तेव्हढंही पण पैसे नव्हते. मग तो त्या बोटीच्या कप्तानाला इकडून तिकडं जाण्यासाठी मस्का मारायचा, विनवणी करायचा.
१८२४ साली चार्ल्सनं बीचर नावाच्या मुलीशी लग्न केलं. त्यांना बरीच मुलंही झाली. पण खायला – प्यायला आणि औषधाला पैसे नसल्यानं त्यातली बरीच मेली. पण चार्ल्सच्या डोक्यातलं खुलं काही गेलं नाही. त्यानं किचनलाच आपली प्रयोगशाळा बनवली. जिथं तो वेगवेगळ्या तऱ्हेनं रबर आणून त्यावर चित्रविचित्र प्रयोग करायचा. ज्यामुळे खोलीतून वेगवेगळे धूर बाहेर पडायचे. त्याला त्या रबराचं एवढं खूळ भरलं होत कि, तो बऱ्याचदा त्या रबराचा सूट घालून हिंडायचा.
या सगळ्यात त्याला बायकोनं साथ तर दिलीच, पण मेहुण्यानं ४६०० डॉलर्स दिले पण चार्ल्सच्या विचित्र प्रयोगात त्या पैशांची राख झाली. तरी त्यानं हू कि चू केलं नाही. गुडईयर मित्रांकडून कर्ज घ्यायला लागला आणि कर्ज परत न दिल्यामुळं सगळं त्याच्या अंगलटी यायचं त्याच्यावर खटले झाले आणि तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला.
१८४० ला त्याच्या दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्याकड शवपेटी घ्यायला सुद्धा पैसे नव्हते.
त्यानं अमेरिकन पोस्ट ऑफिसला पत्र ठेवण्यासाठी आणि नेण्यासाठी रबरी बॅगा (मेल बॅग्स) बनवल्या. पण त्या उष्णतेनं वितळल्या, तेव्हा मात्र चार्ल्स खूपच खचून गेला. मेन म्हणजे त्यानं नायट्रिक अॅसिड वापरून एक नवीन प्रक्रिया काढली होती. ती वापरून रबर वितळणार नाही असा त्याचा दावा होता, पण तो प्रयोगही फसला.
याचवेळी नॅथनिएल हेवर्ड हासुद्धा राबरावरच काम करत होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला म्हणे एक स्वप्न पडलं. ज्यात त्याला दिसलं कि, रबरात सल्फर मिसळला तर त्याचे गुणधर्म बरेच सुधारतात. गुडईयरला ही कल्पना पटली. पण यावर त्यानं प्रयोग केले नव्हते. मात्र, एकदा प्रयोग करत असताना चुकून रबर आणि सल्फर एक स्टोव्हवर एकत्र पडले आणि त्यातून ‘व्हल्कनायझेशन’ प्रक्रियेचा जन्म झाला. त्यामुळे तयार झालेल्या रबराला वास येत नव्हता. आणि ते पाण्यातसुद्धा चांगलं टिकायचं. मुख्य म्हणजे थंडी आणि उष्णता या दोन्ही टोकाच्या तापमानातही ते जसच्या तसंच राही. शिवाय खाली पडलं तरी ते तुटत नसे
आता व्हल्कनायझेशन’ हे नाव कास पडलं तर व्हल्कन म्हणजे रोमन अग्निदेवता. या अपघाती प्रयोग म्हणजे संपूर्ण जगातल्या रबर उद्योगाची पहाट होती. गुडईयरनं १८४४ साली त्या प्रक्रियाच पेटंट घेतलं.
१९५१ साली इंग्लंडला एक मोठं औद्योगिक प्रदर्शन भरलं होत. त्यात गुडईयरनं रबरापासून बनवलेल्या बऱ्याच वस्तू ठेवल्या. लोक या वस्तू बघून आश्चर्यचकित तर झालेच पण त्याविषयी बरेच लेख वर्तमानपत्रात झळकले. यासाठी त्याला एक पदकही बक्षीस मिळालं.पण अजूनसुद्धा पैसे काही मिळत नव्हते. कर्ज वाढतच होत. तेवढ्यात त्याच्या शोधाची चोरी करून कित्येकांनी उत्पादन करायला सुरुवात केली.
मध्यंतरी त्याची बायकोही मरण पावली. फ्रान्सनं त्याला या प्रक्रियेसाठी दिलेलं पेटंट काढून घेतलं. तेव्हा त्याच्याविरुद्ध भांडायला म्हणून तो फ्रान्सला गेला खरा पण तिथंसुद्धा कर्जबाजारी झाला आणि ते कर्ज परत न करता आल्याने तो पॅरिसच्या क्लीची या तुरुंगात जाऊन पडला. तो तुरुंगात जाऊन पडला असताना त्याच्या प्रक्रियेवर इतर अनेक मंडळींनी मोक्कार पैसा मिळवला.
त्यानं ‘गम इलॅस्टिक’ या शीर्षकच स्वतःच आत्मचरित्र लिहिलं, त्याचे त्याला थोडेपार पैसे मिळाले इतकंच. पण शेवटी तो कंगाल अवस्थेत मरण पावला. कुटुंबावर बराच कर्जाचा बोजा ठेवून तो गेला.
पण गंमत अशी होती कि, गुडईयर कंपनीचा तसा त्याचा काहीच संबंध नव्हता. साधारण ३८ वर्षानंतर १९९८ साली फ्रॅंक सीबरलिंग याने जेव्हा टायरची कंपनी काढली . तेव्हा त्याच नाव ‘गुडईयर’ असं नाव द्यायचं ठरवलं. ते गुडईयरविषयी वाटणाऱ्या आदर भावनेतूनच होत. आयुष्यात एखाद्या गोष्टीं झपाटून जाण्याला एक प्रकारे वाहिलेली ती आदरांजलीच होती!
हे ही वाच भिडू :
- ऑफिस स्टाफ कॅन्टीनमध्ये जास्त टाईमपास करतो म्हणून झोमॅटोचा शोध लागला.
- हॉटमेलच्या शोधामुळे ‘ सिलिकॉन व्हॅलीचा बादशहा ‘ म्हणून सबिर भाटिया ओळखला जाऊ लागला होता..
- आत्ता तर म्हणे एकाच डोसमध्ये काम भागवण्यासाठी संशोधन सुरूय…!