द गार्डियन,वॉशिंग्टन पोस्ट,अल-जझिरा रशिया-युक्रेन युद्धावर आज काय म्हणतायेत?

रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला चार दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी पुतीन सेनेला म्हणावं तसं यश आलेलं नाहीये. युक्रेनच्या जवळपास सर्व प्रमुख शहरांमधून रशियन आक्रमणाला तोडीस तोड उत्तर मिळत आहे. युक्रेनच्या या अनपेक्षित प्रतिकाराने रशियन सैन्यही गोंधळून गेले आहे. त्यात रशियावर जगभरातून निर्बंधांचा जोरदार वर्षाव होत आहे. आणि त्यातच पुतीन यांनी रशियन नुक्लिअर फोर्सला हाय अलर्टवर ठेवल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे जगभरातील मीडियात युद्धाबाबतीत कोणते उपडेट आले आहेत त्याचा एकदा आढावा घेऊ.

द वॉशिंग्टन पोस्ट 

WhatsApp Image 2022 02 28 at 11.49.09 AM

वॉशिंग्टन पोस्टने बेलारूस लवकरच रशियाच्या बाजूने युद्धात उतरेल अशी हेडलाइन दिले आहे. याधीही बेलारूस रशियाला या युद्धात पूर्णपणे सहकार्य करत असल्याचा बातम्या आल्या होत्या.

तसेच रशियावर जे मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यात येत आहेत त्यात युक्रेनच्या अध्यक्षांनी व्हिडिओच्या माध्यमातून घातलेल्या इमोशनल हाकेचा मोठा वाट असल्याचं म्हटलं आहे.

तसेच सोशल मीडियावर युक्रेनियन IT आर्मी रशियाच्या प्रोपोगंडाला खोदून काढत असल्याने जगभर युक्रेनबद्दल सहनभुतीची लाट असल्याचं पोस्टने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

 द वॉशिंग्टन पोस्टने छापलेले प्रमुख अपडेट्स 

  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी सांगितले की त्यांनी आपल्या अण्वस्त्र  शक्तींना सतर्क केले आहे, पश्चिमेकडील देशांनी केलेल्या “आक्रमक विधाने”यामागील कारणं असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. व्हाईट हाऊसने या ऑर्डरला “अस्तित्वात नसलेल्या  धोक्यांची निर्मिती करण्याचा प्रयत्नाचे ” उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
  • युरोपियन युनियनने जाहीर केले की ते रशियन विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करेल आणि युक्रेनला शस्त्रास्त्र खरेदीसाठी वित्तपुरवठा करेल. तसेच रशियन बँकांना SWIFT वरून बेदखल करण्याच्या प्रयत्नांनी ही जोर धरला आहे.

अल जझीरा 

WhatsApp Image 2022 02 28 at 1.08.00 PM

 

अल जझिरा ने छापलेली आजची इंटरेस्टिंग बातमी म्हणजे 

जसजसे रशियाचे वेगळेपण वाढत आहे, तसतसे चीनने मैत्री लिमिटेड ठेवण्याचे संकेत दिले आहेत. चीनच्या सरकारी मालकीच्या वित्तीय संस्था शांतपणे रशियाच्या संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेपासून स्वतःला दूर करत आहेत. 

द वॉशिंग्टन पोस्टने छापलेले प्रमुख अपडेट्स 

  • युक्रेन आणि रशिया यांच्यातील बोलणी सोमवारी सकाळी बेलारूस सीमेजवळ सुरू होणार आहेत, असे TASS वृत्तसंस्थेचे वृत्त आहे.
  • युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पुढील २४ तास “महत्त्वाचे” असल्याचे सांगितले.
  • युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे की रविवार हा त्यांच्या सैन्यासाठी “कठीण काळ” होता आणि रशियन सैन्याने “जवळजवळ सर्व दिशांनी गोळीबार सुरू ठेवला”.
  • युक्रेनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की रशियाच्या आक्रमणाच्या सुरुवातीपासून १४ मुलांसह ३५२ नागरिक मारले गेले आहेतद ग्लोबल टाइम्स
    WhatsApp Image 2022 02 28 at 1.10.34 PM
    चीनच्या या न्यूज एजन्सीने युक्रेनमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर जपानने अमेरिकेसोबत अण्वस्त्र सामायिकरण कराराचा विचार करावा, असे मत जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी रविवारी व्यक्त केले होते हे धोक्याची घटना असल्याचं म्हटलं आहे.
    भारतासारखी चीनचीही बरीच लोकं युक्रेनमध्ये अडकली आहेत.युक्रेनमध्ये सुमारे 6,000 चीनी नागरिक आहेत आणि त्यांना बाहेर चीनचे राजदूत अजून युक्रेनमध्येच असल्याचं म्हटलं आहे.

    द गार्डियन 

  • ब्रिटनच्या या वृत्तपत्रानं वाढत्या बॅकक्लॅशमुळे रशियानं त्याच्या नुक्लिअर फोर्सला हाय अलर्टवर ठेवलं आहे ही बातमी गार्डियन नं फ्रंट पेजवर अख्या पानभर छापली आहे. तसेच बंकर मध्ये लपलेल्या युक्रेनियन नागरिक आणि लहान मुले यांना सहन करावा लागणाऱ्या ट्रॉमावर हि गार्डियन ने डिटेल रिपोर्ट छापला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.