रशिया-युक्रेन युद्धामुळं डिझेल-पेट्रोलच्यापलीकडे या गोष्टी आपल्या घरातलं बजेट बिघडवू शकतात

रशिया-युक्रेन युद्धाच्या नुसत्या शक्यतांनीच जगात खळबळ माजलेय. त्यात रशियाने  सैन्य माघारी घेण्याची घोषणा केलीय मात्र व्लादिमिर पुतीन यांच्यावर जग विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे जग युद्धाच्या सावटाखाली आहे. आता रशिया-युक्रेन तसे भारतापासून बरेच लांब आहेत आणि त्यातही भारताचा प्रत्यक्ष सहभाग असण्याची शक्यता धूसर असल्याने आपण निर्धास्त राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गंडताय.

 ‘दुनिया गोल है’ या न्यायाने या वादाचे चटके आपल्याला पण सहन करावे  लागणार आहेत.

नेहमीप्रमाणे पहिले गोष्ट वाढणार ती म्हणजे आपलं पेट्रोल डिझेल.

रशिया तिसरा सगळ्यात मोठा ऑइल उत्पादक देश आहे. त्यामुळं जर युद्ध पेटलं तर क्रूड ऑइलचा पुरवठा आपोआपच कमी होईल आणि इंधनांच्या दराचा भडका उडेल हे असं सरळ गाणी आहे. त्यातच जगातले सगळ्यात मोठे नॅचुरल गॅसचे साठे रशियात सापडतात आणि रशिया युक्रेन वादात जर नॉर्ड स्ट्रीम सारख्या पाइपलाइन बंद झाल्या तर गॅसचे भाव गगनाला भिडू शकतेत. रशिया-युक्रेनच्या प्रत्येक बातमीवर आज बाजरातल्या कच्या तेलाच्या किंमती कमी जास्त होत आहेत.

आता इलेक्शन चालू आहेत त्यामुळं सध्यातरी आपल्याला भारतात हे चढ उतार दिसत नाहीयेत मात्र एकदा का पाच राज्यातल्या निवडणुका आटोपल्या कि मग आपल्यालाही या युद्धाचे चटके जाणवू लागतील असं जाणकार सांगतात.

सोन्याचे दर 

जेव्हा युद्धांसारख्या घटनांमुळे आर्थिक उलथापालट होण्याची परिस्तिथी निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार सेफ असेट्समध्ये आपले पैसे वळवतात. त्यामुळं सोनं हा त्यांना एक गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित पर्याय वाटू लागतो. मग सोन्याची मागणी वाढते आणि परिणामी किंमतीपण. आताच्या परिस्थितीत सोन्याने गाठलेला १३ आठवड्यातील उच्चांक हेच दर्शवतो.

गहू आणि मका 

रशिया आणि युक्रेन हे गहू आणि मका उत्पादनात जगातले आघाडीचे देश आहेत. गहू एक्स्पोर्ट करण्यात रशिया जगात टॉप आहे तर युक्रेन चार नंबरला. त्यामुळं जर उद्या युद्ध पेटलं तर या दोन देशातून होणार पुरवठा खंडित होऊ शकतो आणि त्यामुळं या जीवनावश्यक वस्तूंच्या दारात वाढ पाहायला मिळू शकते. सध्यातरी भारतात अण्णा धान्यांचे साठे मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किंमती पाहून भारतातून अन्नधान्य निर्यात झाल्यास मात्र वेगळी परिस्तिथी असू शकते असं जाणकार सांगतात.

सूर्यफूल तेल 

भारताने एक्स्पोर्ट करून जरी परकीय चलन मिळवलं तरी खनिज तेलाने खाद्य तेल ही दोन तेलं आपल्या खिशाला कात्री लावतातच. आता ही तेच होताना दिसतंय. 

जगातील सूर्यफूल तेलाच्या निर्यातीत जवळजवळ ८०%  वाटा युक्रेन आणि रशियाचाआहे. भारताने ऑक्टोबरमध्ये संपलेल्या वर्षात १.८९दशलक्ष टन कच्च्या तेलाची खरेदी केली, त्यातला युक्रेनने जवळजवळ ७४% आणि अर्जेंटिना आणि रशिया प्रत्येकी १२% पुरवठा केला होता. 

खाद्य तेलाच्या किंमती मागच्या काही वर्षात झपाट्याने वाढत आहेत आणि त्यातच आता या नाविण संकटाची भर पडली आहे.

त्यामुळं युद्ध टळावं आणि करोनानंतर आता कुठे ताळ्यावर आलेलं घरच बजेट ठीकठाक राहवं अशीच अपेक्षा आपली असणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.