म्हणून ऑलिम्पिकमध्ये रशियन खेळाडू देशाच्या झेंड्याखाली नाही तर नवीन नावाने खेळतायत..

२०१९ मध्ये रशियावरअँटी डोपिंगच्या मुद्द्यावर बॅन घातल्यानंतर आता रशियन खेळाडू दुसऱ्या बॅनर अंडर खेळणार आहेत. आता रशियावर बॅन घातला हा मुद्दा तर समजला पण त्याच देशाच्या खेळाडूंना दुसऱ्या बॅनर अंडर खेळता येत हा काय प्रकार आहे?

याला एका सरळ लाईन मध्ये बोलायचं झालं तर, Olympic Athletes from Russia (OAR) म्हणून ओळखला जात होता आणि आता २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये या रशियन खेळाडूंना ROC म्हणून ओळखल जातंय.

रशियाला त्यांच्या स्वतःच्या देशाचे नाव आणि देशाचा ध्वजाखाली ऑलिम्पिक खेळण्याची परवानगी का नाही ? काय आहे हे प्रकरण ?

तर रशियावर हि वेळ त्यांनी केलेल्या डोपिंग घोटाळ्यामुळे, परिणामी २०१५ पासून रशियावर ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्यावर बंदी आणली. मात्र बंदी आणून ही रशियन खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची  परवानगी का दिली जाते ? तर यासाठी आधी ROC म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे.

ROC म्हणजे काय?

ROC म्हणजे “रशियन ऑलिम्पिक समिती.” २०२१ टोकियो ऑलिम्पिक आणि २०२२ बीजिंग ऑलिम्पिक दरम्यान रशियन खेळाडू या ROC नावाखाली ऑलिम्पिक खेळतायत.

रशियन ध्वजाखाली खेळाडू ऑलिम्पिक का खेळत नाहीत?

जागतिक अँटी डोपिंग एजन्सीने (WADA) दिलेल्या शिक्षेमुळे खेळाडू रशियन ध्वजाखाली स्पर्धा करू  शकत नाहीत. मुळात रशियाला ऑलिम्पिक स्पर्धेतून चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. परंतु २०२० च्या अखेरीस ही शिक्षा कमी करून दोन वर्षे करण्यात आली.

मात्र या दोन वर्षांच्या कालावधीत, रशियन डोपिंग घोटाळ्यात सहभागी नसलेले खेळाडू अजूनही ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्यास सक्षम आहेत. असे ३३५ रशियन स्पर्धक २०२१ च्या ऑलिम्पिकमध्ये  सहभागी आहेत. मात्र ते त्यांच्या ध्वजाखाली स्पर्धा करत नाहीत आणि त्यांना ऑलिम्पिकमध्ये रशियन राष्ट्रगीत वाजविण्याची परवानगी देखील नाहीये.

पर्याय म्हणून ते खेळाडू त्यांच्या देशाच्या ध्वजाचे रंग असणारे गणवेश परिधान करत आहेत. त्यांच्यावरचे प्रतिबंध कमी करत त्यांना चार वर्षांवरून दोन वर्षांचीच बंदी आणली आहे.

रशियाचा डोपिंग घोटाळा काय आहे ?

रशियावर असा आरोप होता कि, त्यांच्या खेळाडूंना उत्तेजित करणारे पदार्थ, अंमली पदार्थ देण्यात येत होते ज्यामुळे त्यांची खेळांमधील कामगिरी चांगली होत होती. आणि अंमली पदार्थांचे सेवन केलेले प्रकरण जेव्हा खेळाडू समितीच्या तपासणी मध्ये समोर आले तेंव्हा २०१५ मध्ये स्वतंत्र आयोगाकरवी  रशियन खेळाडूंवर बंदी आणली गेली. हा आयोग म्हणजे World Anti-Doping Agency (WADA).

रशियाने २०१४ मध्ये हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन केले होते. परंतु आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला रशियन खेळाडूंनी अंमली औषधांचे सेवन केलेले आढळले. WADA ने जुलै २०१६ च्या तपासणीनंतर हे सर्व प्रकरण सर्वांसमोर आणले. समितीने सबंधित रशियन खेळाडूंना आणि रशिया देशाला ऑलिम्पिक समितीची फसवणुक केल्याबद्दल २०१८ च्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या गेम्समध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यास बंदी घातली आहे.

एजन्सीचे माजी अध्यक्ष डिक पाउंड यांनी रशिया डोपिंग कार्यक्रम चालवत आहे असे  उघड झाले.

२०१६ मध्ये व्हिसलब्लोअर डॉ. ग्रिगोरी रॉडचेन्कोव्ह यांनी न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, रशियाच्या काही स्टेट लेवलवर चालवलेल्या डोपिंगमुळे त्यांना २०१४ सोची ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मदत झाली.

रशियाच्या क्रीडा मंत्रालयाला देशातील डोपिंग घोटाळ्यातील सर्वात मोठे गुन्हेगार मानले गेले आहे. परंतु राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन किंवा विटाली मुट्को यांना या घोटाळ्याशी थेट जोडण्याचा कुठलाही पुरावा मात्र मिळाला नाही.

पुतीन यांच्यावर आरोप झाले होते कि या घोटाळ्यात ते सामील आहेत.

मात्र पुतीन यांनी ऑलिम्पिकमध्ये रशियावरील बंदी हि एक राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हणत या  बंदीचा निषेध केला होता. सोबतच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या खेळाडूंच्या मार्गात कसलाही अडथळा येणार नसल्याचे म्हंटले होते.

WADA ने रशियाला २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकवर बंदी घालण्याची शिफारस केली होती, परंतु आयओसीने ही शिफारस नाकारली. त्याऐवजी, CAS ने निर्णय घेतला की दोषी खेळाडू खेळांमध्ये सहभागी होणार नाहीत आणि निर्दोष खेळाडू स्पर्धेत सहभागी होतील. पण लागू करण्यात आलेल्या निर्बंधासहित. परिणामी, २७८ रशियन निर्दोष निघाले तर १११ खेळाडूंना ऑलिम्पिक मध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली.

२०१७ च्या डिसेंबरमध्ये, IOC ने जाहीर केल्याप्रमाणे रशियावर २०१८च्या प्योंगचांग ऑलिम्पिकवर बंदी घालण्यात आली आहे. तथापि, २०१८ च्या हिवाळी ऑलिम्पिक दरम्यान त्यांच्या खेळाडूंना Olympic Athlete from Russia (OAR)म्हणून खेळण्याची परवानगी देण्यात आली.

रशियाने निलंबनाविरुद्ध अपील केले आणि त्यांच्यावरची बंदी ४ वर्षांवरून दोन वर्षांवर आणली गेली.  त्यामुळे २०२१ आणि २०२४ च्या ऑलिम्पिक मध्ये रशिया बंदीमुळे ROC झेंड्याखालीच खेळणार हे निश्चित आहे.  

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.