रशियातल्या या एका माणसामुळं जगात सगळ्यात जास्त प्रदूषण वाढतंय…

जगात जर पर्यावरणावर काही बोललं जात असेल तर ते फक्त आणि फक्त हवामान बदल म्हणजेच ग्लोबल वार्मिंगविषयी असत. आता याच्यावर उपाय म्हणून वेळोवेळी जगातल्या प्रमुख देशांच्या बैठका घेतल्या जातात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी आवश्यक व्यवस्थादेखील केली जात आहे.

ग्लोबल वार्मिंगच्या धोक्यांबाबत नुकत्याच जाहीर झालेल्या क्लायमेट ट्रेंड्सच्या अहवालानुसार लवकरच याच्यावर काही उपाय केला नाही तर जगातील परिस्थिती अत्यंत गंभीर होईल.

पण त्याचबरोबर जर आपण जगात प्रदूषण पसरवणाऱ्या लोकांविषयी बोललो तर रशियातल्या एका अब्जाधीशांचा त्यात मोठा हात आहे. दुर्दैव म्हणजे त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. या अब्जाधीशांच्या लक्झरी लाईफमुळ बरंच प्रदूषण होत.

त्यातलेच हे महाशय 

रोमन अब्रामोविच असं या रशियन व्यावसायिकाचे नाव आहे. यावेळी हा सर्वात प्रदूषण करणारी व्यक्ती असल्याचे सांगितलं जातंय. या रशियन व्यावसायिकानं आता आपला व्यवसाय इस्रायलमध्ये वाढवायला सुरवात केली आहे. या रोमनचा व्यवसाय १९ बिलियन डॉलर्स आहे.

आता हा उद्योगपती प्रदूषणासाठी कसा जबाबदार आहे हे बघायच्या आधी कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय असतंय ते बघूया. 

एखादी व्यक्ती, संस्था किंवा कोणतीही गोष्ट जी पर्यावरणास धोकादायक असते, कोणतीही गोष्ट जी  ग्रीनहाऊस उत्सर्जित होते त्याला कार्बन फूटप्रिंट म्हणतात. ग्रीनहाऊस वायू ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलांचा धोका वाढवतात.

हा कार्बन फूटप्रिंट आपल्याला लोकांच्या जीवनशैलीचा पर्यावरणावर कसा आणि किती गंभीर परिणाम होतो हे सांगते.

विचार करा की जर तुम्ही तुमच्या खासगी वाहनात ऑफिसला जात असाल तर सार्वजनिक वाहन वापरणाऱ्या व्यक्तीपेक्षा तुमचा कार्बन फूटप्रिंट जास्त असेल.

तुम्ही काय खाता यापासून ते तुम्ही आपण रोजच्या जीवनात कोणत्या गोष्टी वापरता, या सर्व गोष्टींमधून कार्बन फूटप्रिंट मोजता येतं. कार्बन फूटप्रिंट मोजण्याचे एकक म्हणजे CO2e. म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचे गुणोत्तर तुमच्या कार्बन उत्सर्जनाच्या बरोबर किती आहे.

एखाद्या व्यावसायिकाची जीवनशैली समजण्यासाठी हाच कार्बन फूटप्रिंट काढला जातो. त्याचे परिणाम भयानक आहेत. जगातील बहुतेक श्रीमंत उद्योजकांची जीवनशैली सुखसोयींनी परिपूर्ण आहे. त्यांच्याकडे जितक्या अधिक सुविधा आहेत तितकंच त्याच कार्बन फूटप्रिंट जास्त आहे.

कोणता बडा उद्योजक किती प्रदूषण पसरवित आहेत, यासाठी अनेक अभ्यास केले गेले. पण , त्याचे परिणाम इतके पटले नव्हते की बऱ्याच श्रीमंत व्यावसायिकाचे वैयक्तिक जीवन आणि सुविधा सार्वजनिक क्षेत्रात नसतात. पण यानंतर काही गोष्टी अगदी स्पष्टपणे समोर आल्या.

जगातील सर्वात मोठ्या प्रदूषकांपैकी एक नाव आहे रोमन अब्रामोविच. रशियाच्या या अब्जाधीशाने  इस्त्राईलमध्ये राहण्यास व व्यवसाय करण्यास सुरवात केली. याचा व्यवसाय $ 19 बिलियन डॉलर्सचा  असल्याच सांगितलं जात.

लंडनचा अतिशय आलिशान चेल्सी फुटबॉल क्लब या व्यावसायिकाचा आहे. रोमन अब्रामोविचने आपली सगळीच्या सगळी संपत्ती तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनाच्या व्यवसायातून मिळविली. हा सर्वात प्रदूषण करणार्‍या व्यवसायांपैकी एक आहे. आणि रोमन अब्रामोविच हा जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रदूषण करणारा व्यवसायकर्ता मानला जातो.

त्याच्याकडं एक मोठं खासगी जहाजही आहे. एक्लिप्स नावाच हे जहाज १६२.५ मीटर लांब आणि रुंद आहे. रोमनकडे एक बोईंग देखील आहे, ज्यात ३० जणांना बसण्यासाठी आणि खाण्यासाठी एक खास रूम तयार केली गेली आहे.

याशिवाय त्याच्याकडे एक जेट आणि दोन हेलिकॉप्टर आहेत. आणि जे तो सतत वापरतो. २०१८  मध्ये, या व्यावसायिकाने एकट्याने आपल्या वैयक्तिक जीवनात लक्झरी आयुष्य जगण्याच्या नादात ३३,८५९ मेट्रिक टन कार्बन उत्सर्जित केले.आता तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस नाही. त्याच्या सारखे बरेच अरबपती, खरबपती आहेत. हे लोक आपल्या लक्झरी लाईफच्या नादात हवामानात कार्बन वाढवतायत.

आत्ता पर्यंत तरी याचंच नाव आलंय, आपले अंबानी बंधू या यादीत कुठं आहेत ते आता शोधायला लागेल. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.