जगातला सर्वात क्रूर प्रयोग रशियाने केलाय कि नाही याच्या चर्चा आजही सुरु असतात..
झोप आपल्याला किती प्रिय आहे हे काय सांगायलाच नको, म्हणजे आजच्या पिढीचा प्रॉब्लेमच हा आहे कि रात्रभर डोळा लागत नाही आणीन सकाळी डोळा उघडत नाही. एखादा दोन दिवस जगतो आणि तिसऱ्या दिवशी दोन्ही दिवसांची झोप भरून काढून बराच वेळ झोपतो. एखादा बसल्या बसल्या सुद्धा झोपतो. पण आजचा किस्सा हा इतका डेंजर आहे कि झोप उडेल.
माणसांवर प्रयोग करून अनेक गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला. काही काही प्रयोगांमध्ये लोकांचे जीवही गेले. पण आजच्या घटनेत माणसांवर जो प्रयोग केला गेला तो भयंकर तर होताच शिवाय त्यात जीव गेलेले लोकं दुर्दैवी होते.
रशियन स्लिप एक्स्पेरिमेंट
हा प्रयोग जगातला सगळ्यात खतरनाक प्रयोग मानला जातो. रशियावर आरोप लावण्यात आले होते कि त्यांनी हा प्रयोग केला पण याला त्यांनी नकार दिला होता.
१९४० ला दुसऱ्या विश्वयुद्धाचं बिगुल वाजलं होतं. तेव्हा सोव्हिएत रशियाने शत्रू सैन्याचे पाच सैनिक बंदी बनवले. त्यावेळी तिथल्या सायण्टिस्ट लोकांनी एक प्रयोग करण्याचं ठरवलं कि, एक माणूस झोपेशिवाय जगू शकतो का ? पकडलेल्या कैद्यांना त्यांनी एका चेम्बरमध्ये भरती केलं आणि त्यांना सांगितलं कि ३० दिवस जर तुम्ही न झोपता राहिले तर ३१ व्या दिवशी तुम्हाला सोडण्यात येईल.
पाचही कैदी तयार झाले कारण त्यांना जेलमध्ये होणारे अत्याचार माहिती होते. त्यामुळे त्यांनी संमती दर्शवली. पण त्यांना हे सुटका करण्याचं खोटं सांगण्यात आलं होतं. मग रशियन स्लिप एक्स्पेरिमेंट सुरु झाला. त्या पाचही कैद्यांना त्या चेम्बरमध्ये ठेवण्यात आलं तिथे जेवणखाण, टॉयलेट वैगरे अशा सगळ्या सोयी करण्यात आल्या. त्या चेम्बरला असा आरसा बसवला होता ज्यातून बाहेरच काहीच दिसत नसायचं पण बाहेरच्या लोकांना आतलं सगळं दिसायचं. त्यांना माईकसुद्धा पुरवण्यात आले होते.
त्या चेम्बरमध्ये ऑक्सिजन सोबत एक गॅस सोडला जातो ज्यामुळे कैद्यांना झोप येणार नाही. बाहेर सायंटिस्ट लोकं या कैद्यांचं निरीक्षण करणार होते. पहिल्या तीन दिवसात विशेष काही घडलं नाही. ते कैदी आपापसात बोलत असत आणि फिरत असे. चौथ्या दिवशी आवाजात थोडी कमजोरी आली पण फरक काही पडला नाही.
पाचव्या दिवशी सायंटिस्ट लोकांच्या लक्षात आलं कि हे कैदी एकमेकांसोबत बोलत तर आहेच पण काय बोलताय हे त्यांचं त्यानाही कळत नाहीए, सगळे एकाच वेळी बोलताय आणि सोबतच शांत होताय. ७-८ व्या दिवशी त्यांच्या वागण्यात बदल दिसून येतो. झोपेविना त्यांना बोलूही वाटत नाही. पुढच्या दिवशी एक कैदी अचानक ओरडायला लागतो. शरीरात जितकी ताकद असेल सगळी तो ओरडून ओरडून वाया घालवतो कारण तो भयंकर वैतागलेला असतो.
त्याच्या ओरडण्याने इतर ४ जणांना काहीही फरक पडत नाही. १२-१३ व्या दिवशी बाहेर बसलेल्या सायंटिस्ट लोकांना वाटत कि आत काहीतरी गडबड आहे. त्यांनी हा प्रयोग थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिथला कमांडर हा हट्टी होता त्याने हा प्रयोग सुरु ठेवला. आतमध्ये सगळे भयानक बनलेले असतात. विचित्र चाळे करत असतात.
१५ व्या दिवशी सायंटिस्ट लोकं चेम्बरमध्ये जातात तेव्हा त्यांना सगळीकडे रक्त दिसून येतं. त्या कैद्यांनी स्वतःच शरीर ओरबाडून खायला सुरवात केलेली असते. सायंटिस्ट लोकं त्यातल्या ओरडणाऱ्या कैद्याला बाहेर इलाजासाठी आणतात पण तो मरतो. सायण्टिस्ट घाबरतात आणि प्रयोग बंद करायला लागतात पण कमांडर नाही म्हणतो आणि तो म्हणतो कि तुमच्या सायण्टिस्ट पैकी एकजण आतमध्ये जाऊन रहा.
सायण्टिस्ट ऐकत नव्हते आणि कमांडर सांगत होता कि तुमच्यापैकी कोणीतरी आत जा. तेव्हा त्या सायण्टिस्टने कमांडरलाच गोळी मारली. उरलेल्या चार लोकांना बाहेर इलाजासाठी काढलं तर जर्जर झालेले त्यातले तिघे मेले होते. उरलेला एकजण पुन्हा आतमध्ये टाकण्यात आला.
एका सायंटिस्टने त्याला १६ व्या दिवशी विचारलं कि आता तुला आम्ही सोडत आहोत तुला कसं वाटतंय तेव्हा तो कैदी काहीही बोल्ट होता, जे समजत नव्हतं. मग सायण्टिस्टने विचार केला कि हा आता खूप खतरनाक झाला आहे. याला बाहेर सोडलं तर हा भलतंच काहीतरी करेल. मग त्या सायंटीस्टने त्या शेवटच्या कैद्याला गोळी घातली.
हा रशियन स्लिप एक्स्पेरिमेंट भरपूर चर्चेत होता. लोकांनी भरपूर टीका केल्या. पण रशियाने याविषयी हात वर केले आणि आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही असं दर्शवले. यावर पुढे सिनेमाही आला होता.
आजही हा एक्स्पेरिमेंट झाला कि नाही याबद्दल इंटरनेटवर अनेक उलटसुलट चर्चा होत असतात. काही जण म्हणतात की हि अमेरिकेने रशिया बद्दल पसरवलेली अफवा आहे तर कित्येकजण छातीठोकपणे हा प्रयोग झालाच आहे असं सांगत असतात. रशियन स्लिप एक्स्पेरिमेंटचे पुरावे कधी समोर आलेच नाहीत पण त्याच्या चर्चा कधी थांबल्याच नाहीत.
हे हि वाच भिडू :
- खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर नवज्योतसिंग सिद्धू देखील ५ दिवस गायब झाले होते….
- भारतातल्या गुटखा किंगचं भांडण सोडवता सोडवता दाऊद पाकिस्तानचा गुटखा किंग बनला
- मुख्यमंत्र्यांना ५ कोटीची लाच ऑफर झालेली, तरी दाऊदचा बंगला हातोड्याने पाडला..
- ठाण्याच्या विनाश पथकाची दहशत एवढी होती कि खुद्द दाऊदसुद्धा त्यांच्यासमोर टरकायचा….