भारताने सगळ्यात बाप एअर डिफेंस सिस्टम आपल्या सीमेवर उभा केलंय अन अमेरिकेची जळतीय

रशिया भारताचा सगळ्यात जुना आणि भरवशाचा मित्र.  मात्र मधल्या काळात इंडिया अमेरिकेच्या जवळ गेला आणि त्यामुळं रशिया दुखावला अश्या वावड्या उठल्या. त्यात अमेरिकेचं हेकेखोर धोरण एक तर तुम्ही आमच्या बरोबर आहेत नाहीतर मग आमच्या विरोधात (you are either with us, or against us). मात्र भारतानं अमेरिकेच्या या धोरणाला भीक ना घालता रशियासोबत संबंध चालूच ठेवले. आजही भारत शास्त्रात्रांची मोठ्या प्रमाणात खरेदी करते आणि रशिया पण ती पूर्ण करतं. आता अशीच एअर डिफेंस सिस्टम एस ४०० ही जगातली सगळ्यात भारी एअर डिफेंस सिस्टम भारतानं रशियाकडून घेतलीय.

अमेरिकेच्या नाकावर ठासून भारतानं हा सौदा रशियाबरोबर केलाय.

अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला, युक्रेनमध्ये सैन्य घुसवलं यांसारखे मॅटर केले म्हणून अमेरिकेनं रशियावर निर्बंध टाकलेत. २०१७च्या प्रतिबंध कायद्याद्वारे (CAATSA) अमेरिकेनं रशियाशी  मोठा व्यवहार करण्यास बंधनं घातली आहेत. जर रशियाशी कोणी व्यवहार केला तर अमेरिका त्या देशावर पण बंधनं टाकते.

मागे तुर्कीने रशिया कडून भारतासारखीच एस ४०० एअर डिफेंस सिस्टम घेतली होती तर लगेच अमेरिकेनं तुर्कीवर सॅंक्शन लादले होते. 

भारताला पण अमेरिका अशीच धमकी देत आहे. मात्र भारतानं या धमकीला फाट्यावर मारत रशिया सोबतची ही डील पुढं नेलीच.भारतानं रशियाबरोबर केलेली ही एस ४०० एअर डिफेंस सिस्टमची डील तब्बल ३९०००करोड रुपयांची असल्याचं सांगितलं जातंय. यानुसार रशिया भारताला पाच एअर डिफेंस सिस्टम देणार आहे. 

कशी आहे ही एस ४०० एअर डिफेंस सिस्टम?

एस ४०० ही जगातील सगळ्यात  प्रगत आणि शक्तिशाली एअर डिफेंस सिस्टम म्हणजेच हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक आहे .  एस ४०० मध्ये ड्रोन, क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि अगदी लढाऊ विमानांसह जवळपास सर्व प्रकारच्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्याची क्षमता आहे. एका अभ्यासानुसार ही  एकाच वेळी 600 किमीच्या रेंजमध्ये 160 वस्तूंना टिपू शकते आणि 400 किमीच्या रेंजमध्ये 72 वस्तूंना लक्ष्य करू शकते. 

हि सिस्टिम काम कशी करते?

आता ही एअर डिफेंस सिस्टम काम जिथं तैनात केली आहे तिथं एक अदृश्य ढाल किंवा बबल निर्माण करतं असं समजा. मग ही सिस्टिम संरक्षण बबल ( संरक्षण करण्यासाठी असलेले क्षेत्र) जवळ येणारा हवाई धोका ओळखतं आणि क्षेपणास्त्र फायर करून तो धोका बरोबर टिपतं.  सोप्या शब्दात शत्रूचं ड्रोन असू  दे नाहीतर फायटर जेट जर का ते या रेंजमध्ये आलं तर त्याचा हवेतच खेळ खत्म.

अमेरिकेच्या THAAD (Terminal High Altitude Area Defense) पेक्षा पण हि सिस्टिम बाप असल्याचं सांगितलं जातंय.

दुसरा गोष्ट म्हणजे ही सिस्टिम एका जागेवरून दुसऱ्या जागेला आरामात नेता येते. त्यामुळं भारताच्या पाकिस्तान आणि चिनच्या मोठ्या बॉर्डरवर ही सिस्टिम फिरवता येणार आहे.

रशियामध्ये बनवलेल्या या सर्वात शक्तिशाली हवाई संरक्षण प्रणालीची पहिली खेप भारतात आता  पोहोचली आहे. भारतीय लष्कराने पंजाब सेक्टरमध्ये ते तैनात केले आहे. येथून ते पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या धोक्यांना तोंड देता येणार आहे. इथून पुढं आता पाकिस्तानच्या हद्दीतून ड्रोन जरी आला तरी त्याचा हवेतच खत्मा होणार आहे.

बाकी अमेरिकेचा विरोध डावलून ही डील पुढं नेल्यानं अंकल सॅम (अमेरिकेचं टोपण नाव) कसे  रिऍक्ट होतात हे येणाऱ्या काळात बघण्यासारखं असणार आहे.

 

Web title :S400 missile deal India-Russia : India completed S400 air defense system deal despite opposition by America

 

Leave A Reply

Your email address will not be published.