राज कपूरने मृत्यूपूर्वी लिहिलेलं,” ते गाणं भारताचे साबरी ब्रदर्सचं गातील.”

कव्वाली आणि सुफी गायनाची जी परंपरा भारताला लाभली आहे ती इतर कुणालाही लाभली नसेल. कव्वाली गाणारी मंडळी यांचा एक वेगळाच झोन असतो, दररोजच्या ऐकिवात असणाऱ्या गाण्यांपेक्षा वेगळं काहीतरी, एक वेगळीच अनुभूती देणारं संगीत म्हणजे कव्वाली. पाकिस्तानात सुद्धा अनेक कव्वाल होते आणि अजूनही आहेत.

भारतात कव्वाली प्रकारचं बोलायचं झाल्यास आघाडीवर असतात ते साबरी ब्रदर्स. साबरी ब्रदर्स या जोडीच्या कव्वालीने भारतभ्रतल्या संगीत जाणकारांच्या मनावर जे गरुड घातलं ते आजवर तसंच चिरतरुण आहे. त्याची एक झिंग, नशा आहे आणि ती निर्माण केलीय साबरी ब्रदर्सने. आजचा किस्सा साबरी ब्रदर्स यांच्या मैफिलीचा आणि त्यांच्या दूरवर पसरलेल्या कीर्तीचा. 

साबरी ब्रदर्स यांच्या सगळ्याच कव्वाल्या आणि गाणी भरपूर गाजली. सईद साबरी यांच्यापासून हि कव्वाली आणि संगीत परंपरा त्यांच्या घरात सुरु झाली ती पुढे फरीद आणि अमीन यांनी चालू ठेवली.

संगीतात देव असतो अशी सईद साबरी यांची धारणा होती. संगीत क्षेत्रातील एक महत्वाचं नाव म्हणून त्यांच्याकडे आदराने बघितलं जातं. आता बॉलिवूड आणि साबरी ब्रदर्स यांचा संबंध बघू. १९८७ साली राज कपूर त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट बनवण्यात व्यस्त होते. बऱ्याच काळापासून त्यांच्या डोक्यात तो चित्रपट चालू होता, तो चित्रपट होता हिना.

हिना चित्रपटातील गाणी त्यावेळी चांगली चालली होती. यामागची सुद्धा एक स्टोरी आहे. राज कपूर या चित्रपटातील

देर न हो जाये कही देर न हो जाय……

या गाण्यासाठी प्रसिद्ध गायक गुलाम फरीद साबरी आणि नुसरत फतेह अली खान यांना घेऊ इच्छित होते मात्र दोघांपैकी कुणीही त्याला उत्तर दिलं नाही, त्यामुळे राज कपूर चिडले आणि म्हणाले कि या गाण्यासाठी हिंदुस्थानी गायक मी स्वतः शोधून आणेल.

यातच त्यांना साबरी ब्रदर्स हे नाव कळलं. संगीतकार रवींद्र जैन यांना राज कपूरने विचारलं तेव्हा त्यांनीही साबरी ब्रदर्स हेच नाव सुचवलं. राज कपूर खुश झाले. पण चित्रपट सुरु होण्याच्या आधीच राज कपूर यांचं निधन झालं. पण त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं कि

देर ना हो जाये हे गाणं साबरी ब्रदर्सचं म्हणतील, इतर कोणीही नाही.

साबरी ब्रदर्सला सुपरहिट गाणी देऊनही एकदाही अवॉर्ड मिळाला नव्हता. एक मुलाकात जरुरी हे सनम , नहीं हो ना था अशा अनेक सुपरहिट कव्वाल्या त्यांनी बॉलीवूडला दिल्या. चित्रपट गितांपेक्षा साबरी ब्रदर्सने भरपूर शो केले. पूर्ण इमानदारीने गाणे आणि लोकांना मंत्रमुग्ध करणे इतकंच त्यांना माहिती होतं. देव आनंद, शत्रुघ्न सिन्हा आणि आमिर खान साबरी ब्रदर्सच्या गाण्यांचे खूप मोठे चाहते. घरी बोलावून ते मेहफिल भरवत आणि गाण्यांचा आनंद लुटत.

एका मुलाखतीत साबरी ब्रदर्स म्हणतात ,

हमें गाना आता हे लेकिन हमें ये नहीं पता कि अपना टॅलेंट कैसे बेचा जाता हे …..!

एकदा युरपातल्या एका प्रसिद्ध चर्चमध्ये साबरी ब्रदर्सचा गाण्यांचा कार्यक्रम होता. समोर सगळी इंग्रजी लोकं. साबरी ब्रदर्स पेचात पडले कि यांना काय कळणार आहे गाण्यातलं. पण गायन सुरु झालं,एक हजार वर्षांपूर्वीच्या मौखिक कव्वाल्या ते गाऊ लागले. ब्रिटिश लोकांना त्यांच्या कव्वालीची नशा झाली होती आणि त्या कव्वाली मेहफिलीत ते अगदी रंगून गेले होते.

पण या साबरी ब्रदर्सच्या ताफ्यातील त्यांचा म्होरक्या असलेले सईद साबरी यांचं ६ जून २०२१ रोजी निधन झालं आणि याच वर्षी २१ एप्रिलला फरीद साबरी यांचंही निधन झालं. पण आपल्या संगीतरूपी आवाजाने ते कायम लोकांच्या मनावर राज्य करत राहतील यात शंका नाही.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.