अर्ध-नग्न मॉडेल्सने मंगळसूत्र घालून जाहिरात केली म्हणून, सब्यासाचीचा बाजार उठलाय.

बॉलिवूड स्टार्सच्या हक्काच्या आणि फेव्हरेट फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांना कोण ओळखत नाही. बरं फक्त बॉलीवूडच्या हक्काचा सब्यसाची फेव्हरेट नसून प्रत्येक नवरीला तिच्या लग्नाच्या दिवशी सब्यसाचीने डिझाइन केलेला लेहेंगा घालावा असं स्वप्न असतं.  बरं याच जाऊ द्यात तो आपल्या कामामुळे तो जितका चर्चेत राहतो तितकाच तो आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असतो.

 नुकतेच त्यांनी पुन्हा एकदा असे काही बोलले ज्यामुळे त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

आताही असंच काहीसं घडलं, त्याने अलीकडेच लाँच केलेला ‘इंटिमेट फाईन ज्वेलरी कलेक्शन’ हे वादाचं कारण ठरलं होतं.  

सब्यसाचीच्या नवीन ‘इंटिमेट फाईन ज्वेलरी’ कलेक्शनला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता कारण, त्यामध्ये स्ट्रेट आणि समलिंगी जोडप्यांचे रॉयल बंगालचे मंगळसूत्र परिधान केलेल्या जाहिराती होत्या. हळूहळू ह्या जाहिराती व्हायरल झाल्या आणि या मुद्द्याने एक वेगळेच वळण घेतले. आणि शेवटी हा वाद इतक्या टोकाला गेला कि सब्यसाचीला आपली वादग्रस्त जाहिरात मागे घ्यावी लागली.

२४ तासांत जाहिरात मागे घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी इशारा दिल्यानंतर सब्यसाचीने हे पाऊल उचलले आहे. 

कोणत्या जाहिरातीमुळे वाद झाला? असं काय होतं या जाहिरातीमध्ये ?  

फॅशन डिझायनर सब्यसाचीने २७ ऑक्टोबर रोजी ज्वेलरी कलेक्शन लाँच केले. ‘द रॉयल बंगाल टायगर आयकॉन’ असे या कलेक्शनचे नाव आहे. यात अंतर्वस्त्रामध्ये असणाऱ्या मॉडेलच्या गळ्यात ‘मंगळसूत्र’ परिधान केलेल्या मॉडेलच्या जाहिरातीची सिरीजच पोस्ट केली.  मंगळसूत्र हा एक पारंपारिक दागिना आहे जो भारतातील स्त्रिया त्यांच्या लग्नानंतर घालतात. 

मग काय झाला दंगा सुरु…सोशल मिडिया युजर्सने टीका केली कि, इनर्स मध्ये अर्ध-नग्न मॉडेल्स शूट केलेले हे फोटो अश्लीलतेला प्रोत्साहन देणारे आहेत. भारतच्या पारंपारिक मंगळसूत्राच्या दागिन्याच्या  जाहिरातीसाठी अर्ध-नग्न मॉडेल वापरल्याबद्दल या जाहिरातीवर टीका केली.

कंपनीने या मंगळसूत्राला ‘द रॉयल बंगाल मंगळसूत्र १.२’ असे नाव दिले आहे. अंतरंग दागिने म्हणून त्याची जाहिरात केली जात आहे. जाहिरातीत एक महिला तिच्या पतीसोबत दिसत आहे. तिने काळी ब्रा आणि काळी बिंदी लावली आहे. ही जाहिरात येताच सोशल मीडियावर त्याचा निषेध सुरू झाला. लोकं विचारू लागले, सब्यसाची कपड्यांचे प्रमोशन करत आहे की काही वेगळेच प्रदर्शन करत आहेत ? इतके शरीर प्रदर्शन जिव्हाळ्याच्या दागिन्यांना न्याय देते का? हे योग्य दिसत नाही.

Sabyasachi Mukhejee

वाद वाढतच होता, त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने त्याची दखल घेतली. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सब्यसाचीच्या मंगळसूत्राच्या जाहिरातीवर आक्षेप घेत कंपनीला कडक ताकीद दिली. नरोत्तम मिश्रा यांनी या जाहिरातीवर केवळ आक्षेप घेतला नव्हता तर २४ तासांत ती काढून टाका असं  अल्टिमेटमही दिला होता. 

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले कि, 

“मी डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांची मंगळसूत्राची जाहिरात पाहिली, जी अतिशय आक्षेपार्ह आहे. हिंदू धर्मात मंगळसूत्र हे इतर सर्व दागिन्यांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि मानाचा दागिना मनाला जातो. मंगळसूत्राचा पिवळा भाग देवी पार्वती आणि काळा भाग भगवान शिव आहे असे आपण मानतो. भगवान शंकराच्या कृपेने स्त्री आणि तिचा पती सुरक्षित आहे. माँ पार्वतीच्या कृपेने वैवाहिक जीवन सुखी राहते. सर्व इशाऱ्यांना न जुमानता हिंदू धर्म आणि त्याच्या प्रतीकांशी छेडछाड करण्याची पद्धतशीर प्रक्रिया सुरू आहे, याला माझा तीव्र आक्षेप आहे. मी व्यक्तिशः सब्यसाचीला चेतावणी देत ​​आहे आणि २४ तासांच्या आत जाहिरात काढून टाकण्याचा अल्टिमेटम देतोय, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. कायदेशीर कारवाई केली जाईल आणि स्वतंत्र फोर्स पाठवला जातील.”

नरोत्तम मिश्रा यांनी या मुद्द्यालाच नाही तर ‘आश्रम’ या वेबसीरिजच्या वेळेस देखील विरोध दर्शवला होता. आश्रम नावाच्या वेबसिरीजच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सेटवर झालेल्या गोंधळानंतर अलीकडेच त्यांची प्रतिक्रिया आली. सेटची प्रचंड तोडफोड करून प्रकाश झा यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. असं म्हणलं जातं कि, हा सगळा विरोध नरोत्तम मिश्रा यांच्या सांगण्यावरून झाली.

फक्त नरोत्तम मिश्रा यांनीच वोरोध नाही तर सोशल मिडियावर देखील मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता,

शेवटी सब्यसाचीने इंस्टाग्राम स्टोरी लिहून जाहिरात मागे घेतली..

मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या मुदतीच्या २४ तासांच्या आत सब्यसाचीने मंगळसूत्राची जाहिरात मागे घेतली. सब्यसाचीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर तशी स्टोरी पोस्ट केली, त्यात असं लिहिले होते,

“वारसा आणि संस्कृतीला संवादाचा एक भाग बनवण्याच्या संदर्भात, मंगळसूत्र मोहिमेचा उद्देश सर्वांना एकत्र आणणे आणि सशक्त करणे आहे. या मोहिमेचा उद्देश एक सण साजरा करणे हा होता पण त्यामुळे आपल्या समाजातील एक वर्ग दुखावला गेला याचे आम्हाला खूप दुःख आहे. त्यामुळेच सब्यसाचीने ही जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आता या मोहिमेशी संबंधित छायाचित्रेही सब्यसाचीच्या सोशल मीडिया पेजवर दिसत नाहीत.

यापूर्वी, डाबरने करवा चौथ साजरी करताना समलिंगी जोडपे दाखवणारी वादग्रस्त जाहिरात मागे घ्यावी लागली होती. त्या जाहिरातीबाबत सोशल मीडियावर मोठा गोंधळ झाला होता. तेंव्हा सुद्धा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या कंपनीवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.