राजेश पायलट देखील काँग्रेसवर नाराज होते पण पक्ष कधी सोडला नाही..

गेहलोत-पायलट वाद सोडवण्यात काँग्रेस नेतृत्वाला यश आलेलं दिसत नाही कारण आता बातम्या सुरु झाल्यात त्या म्हणजे राजस्थानमध्ये सचिन पायलट नवीन पक्ष काढणार आहेत.  कदाचित त्यांच्या ‘प्रोग्रेसिव्ह काँग्रेस’ पक्षाची घोषणा ११ जून ला घोषणा होऊ शकते.

अर्थातच सचिन पायलट यांनी नवीन पक्ष काढला तर काँग्रेस पक्षाला येत्या निवडणुकीत मोठं नुकसान होऊ शकते.

असो सचिन पायलट पक्ष त्यागतात कि नुसत्या सोडून जाण्याच्या धमक्या देतात ह्याविषयी तर्क लावले जाताय. हे तर्क खरे कि खोटे हे त्यांच्या नव्या पक्षाची अधिकृत जाहीररीत्या जोपर्यंत घोषणा करत नाहीत तोपर्यंत स्पष्ट होणार नाही.

यानिमित्ताने आठवण काढली जाते ते त्यांच्या वडिलांची म्हणजेच राजेश पायलट यांची,

सचिन पायलट यांचे वडील मात्र काँग्रेस पक्षात मनाविरुद्ध काम झालं तर काँग्रेसची गोची करायचे मात्र कधी पक्ष सोडून गेले नाहीत.

प्रसंगी पक्षाला धारेवर धरलं पण पक्ष त्यागण्याच्या गोष्टी केल्या नाहीत याबाबतीत त्यांचा एक प्रसिद्ध किस्सा आहे जो आपण आज जाणून घेणार आहोत.

सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट हे पूर्णवेळ काँग्रेसमध्ये राहिले आणि पक्षातल्या वरिष्ठ लोकांच्या हेव्यादाव्यांना वैतागून त्यांनी आपली जादूही दाखवली. ज्यामुळे काँग्रेस त्यांच्या अशा प्रकरणांमुळे गोत्यात सापडलं होतं. सत्तेसाठी चालणाऱ्या खेळात लोक जनसेवा विसरुंज गेले आहेत असं त्यांना कायम वाटायचं.

१९९७ साली काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. राजेश पायलट यांनी सीताराम केसरी यांच्या विरोधात हि निवडणूक लढवली होती, काँग्रेस पक्षाचा हा सगळ्यात वाईट काळ होता. गांधी परिवार हळूहळू खुर्चीपासून दूर चालला होता आणि इतर लोकांची खुर्चीवर नजर वाढत चालली होती. त्यावेळी पार्टीच्या अध्यक्ष पदासाठी राजेश पायलट, सीताराम केसरी आणि शरद पवार यांच्यात हि निवडणूक झाली होती.

सीताराम केसरी यांनी राजेश पायलट आणि शरद पवार या दोघांना मात देत अध्यक्षपद पटकावलं. पायलट हे मिळालेल्या पराभवामुळे नाराज झाले आणि पुन्हा पक्षात अंतर वाढू लागलं. आता या सगळ्यांचं संगनमत करण्यासाठी पुन्हा गांधी परिवारचं पुढे आला. सोनिया गांधी १९९८ साली काँग्रेस पक्षात आल्या आणि अध्यक्ष झाल्या. 

सोनिया गांधी अध्यक्ष झाल्याने पुन्हा त्या विदेशी असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. या मुद्द्यामुळे शरद पवार, पीए संगमा आणि तारिक अनवर अशा मोठ्या नेत्यांनी काँग्रेसला जबर धक्का देत पार्टी सोडून दिली. हा काँग्रेसला खूप मोठा धक्का होता.

पण या सगळ्यांपेक्षा वेगळे राजेश पायलट होते. ते पक्ष सोडून जाणार असल्याचं वातावरण जरी निर्माण झालं होतं तरी ते पक्ष सोडून गेले नाही.

मात्र राजेश पायलट यांच्या दहशतीमुळे ते खरंच काँग्रेस सोडून गेले तर पक्षावर काय वेळ येईल अशा चर्चा झडत होत्या.

पण राजेश पायलट यांनी आपली ताकद दाखवली खरी पण ते पक्ष सोडून काय गेले नाही. त्यांनी ना गांधी परिवाराला सोडलं आणि ना काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात गेले.

राजस्थानच्या राजकारणात राजेश पायलट हे खूप महत्वाचं नाव होतं. केंद्रीय मंत्री पदही त्यांनी भूषविलं होतं. राजीव गांधींसोबत त्यांचे अगदी घनिष्ठ संबंध होते. ज्यावेळी ते भेटत तेव्हा वायू सेनेवर कायम चर्चा करत असत.  पुढे सचिन पायलट आणि राहुल गांधी यांचेही मैत्रीपूर्ण संबंध वाढले.

पण आताची परिस्थिती बघता सचिन पायलट यांचं हे बंड राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला भूमिगत करतं कि नुसती हूल देतं हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.