सचिनच्या फेरारी टॅक्स प्रकरणात प्रमोद महाजनांना शिव्या बसल्या होत्या….

सचिन तेंडुलकर फक्त नावच पुरेसं आहे. करोडो लोकांच्या खेळण्याची प्रेरणा आणि करोडो लोकांचा आवडता खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. तो चांगला खेळला, वाईट खेळला टीका कौतुक अशा अनेक प्रकारातून तो गेलाय. पण २००२-२००३ साली एक कॉंट्रोव्हर्सी झाली तीही सचिनच्याच बाबतीत पण शिव्या मात्र प्रमोद महाजनांना बसल्या होत्या. तर नक्की काय मॅटर होता जाणून घेऊया.

सचिनच्या १०० व्या कसोटीच्या पूर्वसंध्येला  प्रमोद महाजन यांनी तेव्हा एक पत्र व्हायरल केलं आणि त्यात लिहिलेलं होतं कि एक भेट म्हणून सरकार सचिनला मिळालेल्या फेरारी स्पोर्ट्स कार वरचा कर माफ करत आहे. तर तेव्हा एक महागडी फेरारी फॉर्म्युला वन कार सचिनला मायकल शूमाकूरकडून मिळाली होती. 

पण महाजनांच्या त्या पत्राने टीकेची झोड उठली आणि लोकं प्रमोद महाजनांना शिव्या घालायला लागली होती. सचिनला मिळालेल्या फेरारी कारची किंमत होती १.५ कोटी पण तिला भारतात आणण्यासाठी तिच्यावर कर होता २.५ कोटी. हे नाकापेक्षा मोती जड अशी बात झालेली. तेव्हा महाजनांनी त्याला टॅक्स माफ करायचं आश्वासन दिलं होतं.

हे प्रकरण जेव्हा तापलं तेव्हा महाजन आणि अर्थमंत्री जसवंत सिंह यांना पत्र लिहून करमाफी मागितली होती. पण  सचिनच्या माफी मागण्याच्या कारणावरूनसुद्धा मोठा गदारोळ झाला होता कि सचिनने करमाफी मागायची काय गरज आहे ? सचिनला ती गाडी स्पॉन्सर कंपनीकडून मिळाली आहे ती काय एखादा क्रिकेट पुरस्कार म्हणून मिळालेली नाही. जर फेरारी त्याने क्रिकेटमध्ये जिंकली असती तर त्याला करमाफ करणं न्याय्य गोष्ट ठरली असती.

क्रिकेटला आपल्या देशात अवास्तव महत्व देण्यात येतं, सरकार क्रिकेटर लोकांचा पाठीमागेच असतात आणि इतर खेळांकडे दुर्लक्ष करतात. जर भारत सरकार सचिनला अडीच कोटी करमाफ करत असतील तर तीच सुविधा इतर लोकांना देणार आहे का ? जर अमिताभ बच्चन यांना स्टार टीव्हीने फेरारी भेट दिली किंवा लता मंगेशकर यांना सोनीने भेट दिली असेल तर त्याना सरकार कर माफ करेल का ? 

हे सगळं प्रकरण इतकं पेटलं होतं कि प्रमोद महाजन यांच्या सरकारी पदांवर लोकं संशय घेऊ लागली होती. भेटवस्तू साठी इतक्या मोठ्या प्रमाणावर कर माफ करणारे महाजन कधी इतर खेळांकडे लक्ष देतात का ? सचिन क्रिकेट उत्तम खेळतो तो भारताचा आयकॉन आहे मान्य आहे पण भेट मिळालेल्या कारवर असलेला इतका मोठा कर माफ करण्यात भारत सरकार नक्की काय हाशील करू पाहतंय.

अनेक वृत्तपत्रांनी सांगितलं कि प्रमोद महाजन यांच्या पदावर शंका घेण्याजोगं हे काम आहे. लोकांच्या नकळत कुठला कट आखला जात आहे. फेरारी कार हि भेट म्हणून मिळाली आहे ती एखादा क्रिकेटमधला पुरस्कार नाही कि ज्यावर कर माफ केला जाऊ शकतो.

सचिन तेंडुलकरचे डायहार्ड फॅन तेव्हा म्हणायचे कि जर कर जास्त होत असेल तर आम्ही देशभरातले सचिन फॅन प्रत्येकी २-२ रुपये गोळा करू आणि त्या कारचा कर भरून तिला सचिनसाठी भारतात घेऊन येऊ.

अनेक पत्रकार म्हणायचे कि जर महाजन यांना ती कार भारतात आणायची असेल तर त्यांनी त्यांच्या वतीने ती भारतात आणावी आणि त्याचा कर स्वतः भरावा. हे प्रकरण उलट प्रमोद महाजनांच्या अंगलट आलं होतं. म्हणून सचिनच्या फेरारी टॅक्स प्रकरणात प्रमोद महाजनांना शिव्या बसल्या होत्या.

हे हि वाच भिडू :

 

1 Comment
  1. माहिती अपुरी आहे

Leave A Reply

Your email address will not be published.