जवागल श्रीनाथचं टेन्शन कमी करण्यासाठी सचिनने एक प्रॅन्क केला होता..

भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूमचे अनेक किस्से क्रिकेटर लोकांनी वेगवेगळ्या शोमध्ये सांगितलेले असतात. त्यापैकीच आजचा किस्सा. भारताचा माजी क्रिकेटर हेमांगी बदानीने हा किस्सा त्याच्या ट्विटर अकाउंटवर सांगितला होता. लोकांकडून त्याला भरपूर दाद मिळाली होती. नक्की काय होता हा किस्सा जाणून घेऊया.

सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव म्हणून सगळं जग त्याला ओळखतं. त्याच्या बॅटिंगचे अनेक जण चाहते आहेत. अनेक जणांनी त्याची एकही मॅच पाहायची सोडलेली नाही. भारतच नाही तर सगळ्या जगाकडून त्याला प्रेम मिळत गेलं. मैदानावर गंभीर दिसणारा सचिन हा मुळातच खोड्या काढणारा आहे. ड्रेसिंग रूममध्ये त्याने केलेला प्रॅन्क हा खतरनाक होता. 

सचिन तेंडुलकरने केलेली चेष्टा भारताचा माजी वेगवान बॉलर जवागल श्रीनाथला चांगलीच महागात पडली होती. इंग्लंडविरुद्धच्या एका मॅचमध्ये जवागल श्रीनाथ सचिनची पॅन्ट घालून मैदानात उतरला होता. बॉलिंगसुद्धा त्याने त्याच पॅन्टवर केली.

२००२ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. ७ सामन्यांच्या वनडे मालिकेपैकी २ रा सामना हा कटक मध्ये खेळवला जात होता. हि तीच सिरीज होती ज्यावरून असा अंदाज लावला जात होता कि हि सिरीज जवागल श्रीनाथची शेवटची सिरीज आहे म्हणून. 

अशा वेळी सचिनने जवागल श्रीनाथची फजिती करायची म्हणून एक आयडिया केली. जवागल श्रीनाथय हा असा खेळाडू होता जो कायम ड्रेसिंग रूममध्ये आत्मविश्वासाने पुरेपूर असायचा. पण दुसऱ्या वनडे सामन्यावेळी श्रीनाथ चिंतेत होता. तो सारखा इकडे तिकडे फिरत होता. त्याच्या मनात एक वेगळीच बॉलिंग सुरु होती.

सचिनने त्यावेळी हेमांग बदानीला सांगितलं कि,

एक काम कर हे माझी ट्राऊजर घेऊन जा आणि ते जवागल श्रीनाथच्या किट बॅगमध्ये टाकून ये, आणि त्याची ट्राऊजर कुठेतरी लपवून ठेव.

आता सचिन तेंडुलकरची उंची ५ फूट ४ इंच आणि श्रीनाथची उंची ६ फूट २ इंच होती. मग जवागल श्रीनाथ प्रॅक्टिस वरून आला आणि त्याने त्याच्या किट बॅगमधून ते ट्राऊजर काढली आणि घातली, श्रीनाथने जराही लक्ष दिल नाही कि ती ट्राऊजर नक्की कोणाचं आहे.

मैदानात आल्यावर गांगुलीने श्रीनाथला पहिली ओव्हर दिली आणि श्रीनाथने ती ओव्हर यशस्वीपणे पूर्ण केली. पण ओव्हर झाल्यावर त्याच्या लक्षात आलं कि सगळे खेळाडू त्याच्याकडे बघून हसत आहेत. ज्यावेळी श्रीनाथने नीट निरखून स्वतःकडे बघितलं तेव्हा त्याला कळलं कि तो दुसऱ्याच कोणाचीतरी पॅन्ट घालून आला आहे. तेव्हा श्रीनाथसुद्धा हसायला लागला आणि पळत पळत जाऊन स्वतःची पॅन्ट घालून आला. 

हेमांग बदानी टीममध्ये नव्हता पण जेव्हा श्रीनाथने त्याला या प्रकाराबद्दल विचारलं कि हा प्रॅन्क कोणी केला होता ? पण हेमांग बदानीने काहीच माहिती नसल्याचा आव आणत श्रीनाथला टाळलं. या सामन्यात श्रीनाथने ४१ धावा देऊन १ विकेट मिळवली होती. २००३ च्या वर्ल्ड कपनंतर जवागल श्रीनाथने क्रिकेटला राम राम ठोकला.

हा किस्सा इतक्या वर्षानंतर बाहेर आला तो हेमांगी बदानीमुळे. त्यावेळी सचिनचा हा प्रॅन्क जवागल श्रीनाथला चांगलाच भोवला होता. पण संघात खेळीमेळीचं वातावरण आणि गंभीर परिस्थितीचा ताण हलका करण्यासाठी सचिन तेंडुलकरने हा प्रॅन्क केला होता. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.