सदा सुखे रहो सांगणारा झील ब्रँड भारतात सगळ्यात जास्त रेनकोट विकतो…

पावसाळा सिझन हा बऱ्याच लोकांचा आवडीचा सिझन असतो. अर्धे लोकं ट्रेकिंगला जातात आणि तिथून सोशल मीडियावर फोटो सोडून हवा करत असतात. अर्धे लोकं गरम भजे आणि कविता टाकून चिल करत असतात. पण हे सगळं एन्जॉयमेंट एका बाजूला आणि पावसापासून वाचण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेनकोट आणि छत्र्यांची मार्केटिंग एका बाजूला. आजचा किस्सा अशाच एका पावसाळी ब्रॅण्डचा.

मागच्या काही वर्षात झील [ ZEEL ] या ब्रॅण्डची पावसाळ्यात भयंकर मार्केटिंग चालते. दर पावसाळ्यात झील कंपनी सगळ्या भारतभरात आपल्या ब्रँडचे रेनकोन आणि पावसाळ्यातल्या इतर वस्तू विकते. झील हि कंपनी भारतातील सगळ्यात मोठी रेनकोट विकणारी कंपनी आहे. १९९५ साली स्थापन झालेल्या झील कंपनीला ISO ची मान्यता आहे. 

दिनेश त्रिवेदी यांनी १९९५ साली पावसाळी प्रोडक्ट विक्री व्हावे म्हणून झील हि कंपनी सुरु केली. आज घडीला झील कंपनी जवळपास सगळ्या वयोगटातील ३०० सिझनल प्रॉडक्ट विकते. झिलचा मेन उद्देशच हा आहे कि पावसाळी रेनकोट म्हणजे झील. २०१५ सालापासून NZ Seasonal Wear Pvt. Ltd चा उद्देश हा ग्लोबल होऊन जवळपास ४-५ देशांना झीलचे रेनकोट आणि पावसाळी प्रॉडक्ट विकण्याचा आहे.

झील ब्रँडचं व्हिजन आहे कि जगातली सगळ्यात मोठी पावसाळी कपड्यांची कंपनी आपली असावी. पावसाळा आल्यावर निसर्गप्रेमी लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहताना दिसतो. पण आनंद वैगरे सगळं ठीक आहे पण डेली रुटीनची काम करणाऱ्या लोकांना पावसाचा जास्त त्रास होतो. पण झिलने असा विश्वास निर्माण केला कि झील ब्रॅण्डच्या रेनवेअर कपड्यांसोबत तुम्ही पावसाचा सुद्धा आनंद घेऊ शकतात. 

१९९५ साली दिनेश त्रिवेदी [ मॅनेजिंग डायरेक्टर ] यांनी हा प्रवास सुरु केला होता तेव्हा रेन वेअर, रेन कोट आणि रेन सूट अशा सगळ्या वयोगटातील प्रॉडक्ट विक्रीला ठेवले होते. त्यांची इच्छा हि होती कि पावसाळी कपड्यांचा एकमेव ब्रँड म्हणून झिलला ओळख मिळावी आणि १०० रेनकोट ऐवजी २०हजार रेनकोट दर दिवशी विक्री व्हावे.

सुरवातीला २ हजार स्क्वेअर फुटपासून NZ Seasonal Wear Pvt. Ltd सुरु झाली आणि पुढे जवळपास ३ लाख स्क्वेअर फूट इतकी मोठी झील कंपनी झाली. आज घडीला झील हि फक्त कंपनी राहिली नसून तो आज एक ब्रँड झाला आहे. ग्राहकांची काळजी घेणे आणि पावसापासून त्यांना वाचवणे या उद्देशाने ३०० प्रोडक्ट आज झील विकते. 

मार्केटिंगचा उत्तम वापर कंपनीने केला. देशभरात आपल्या ब्रॅन्डचं नाव व्हावं म्हणून सिनेस्टार विवेक ओबेरॉयला झील ब्रँडचा अँबेसिडर बनवलं. झीलचे अनेक होर्डिंग शहरा शहरांमध्ये पावसाळ्यात पाहायला मिळतात.

झीलचा प्लस पॉईंट म्हणजे त्यांनी प्रमोशनसाठी तयार केलेली टॅगलाईन. हि टॅगलाईन लोकांमध्ये चांगलीच गाजली होती ती होती सदा सुखे रहो…..हि टॅगलाईन भरपूर चर्चेत राहिली.

फक्त पावसाळ्यात आपला ब्रँड उतरवणारी झील कंपनी करोडो रुपयांची उलाढाल करते. पावसाळ्यात अनेक रेनकोट बाजारात असतात पण बेस्ट क्वालिटी म्हणून झील विक्रमी विक्री करते. दर पावसाळ्यात झील सगळ्या वयोगटातले प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवते आणि तेही विक्री होतात यावरून झिलच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो.

ग्राहकांच्या सेवेसाठी आणि पावसापासून वाचवण्यासाठी तर त्यांनी सांगितलं आहे झील वापरा आणि

सदा सुखे रहो….

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.