जिने भारताला पहिली ‘व्हायरल हेअरस्टाईल’ दिली, आज तिचा बड्डे आहे.

सशाधर मुखर्जी. १९६० च्या दशकातलं एक प्रसिद्ध नाव. सधाधर मुखर्जी हे प्रोड्यूसर होते. त्यांना एक फिल्म काढायची होती. फिल्म पण साधीसुधी नव्हती आपल्या मुलाला लॉन्च करायचं म्हणून ते फिल्म करणार होते. फिल्म झाली. खूप चांगली चालली. सोबत या फिल्मनं एक इतिहास रचला. तो इतिहास होता साधना “हेअरस्टाईलचा”.
सशाधर मुखर्जी हे त्या काळातलं नावाजलेलं नाव होतं. आपला मुलगा ज्वॉय मुखर्जी याला घेवून ते फिल्म करायच्या विचारात होते. आपल्या मुलाचं लॉन्चिंग देखील तितकच तगड व्हावं म्हणून हा सिनेमा त्यांनी मनावर घेतलेला. सगळ फिक्स होतं पण हिरोईन कोण असावी हा विचार त्यांच्या डोक्यातून जात नव्हता. एखाद्या फ्रेश चेहऱ्याबरोबरच आपल्या मुलाचं लॉन्चिंग कराव याबाबत ते ठाम होते. अशातच त्यांची नजर त्या काळातल्या एका नावाजलेल्या मासिकावर पडली. या मासिकामध्ये एका मुलीचा फोटो छापून आलेला. त्या मुलीचं नाव होतं “साधना शिवदासानी”. सशाधर मुखर्जी यांनी तो फोटो पाहीला आणि थेट त्या मुलींला आपल्या सिनेमात घेतलं. त्या सिनेमाचं नाव होतं “लव्ह इन शिमला”. लव्ह इन शिमला हा त्याकाळातला सुपरहिट सिनेमा होता आणि त्याहून सुपरहिट ठरली ती साधना हेअरस्टाईल.
आर. के. नायर यांना साधना कटची कल्पना कशी सुचली –
लव्ह इन सिमला डायरेक्ट केला होता तो आर. के. नायर यांनी. त्यांनी साधनाची हेअरस्टाईल नेमकी कशी असावी याचा पुरेपुर अभ्यास केला. वेगळं काहीतरी करता येईल का यासाठी त्यांनी शोधाशोध चालू केली आणि त्यांचा शोध त्यावेळीची हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री औड्रे हेपबर्न जवळ येवून थांबला. औड्रे हेपबर्न ही हॉलिवूडची नावाजलेली अभिनेत्री होती. तिचा कट देखील “साधना कट” होता असच म्हणावं लागेल कारण या हेअऱस्टाईलच हेच नाव पडलं. या अभिनेत्रीची हेअरस्टाईल आर. के. नायर यांनी त्यांच्या हिरोईनसाठी वापरली. त्यानंतर ही हेअरस्टाईल आणि साधना कट हे एक न तुटणार समिकरण झालं.