सहकार मंत्रालय निर्माण होणं हे नरेंद्र मोदींच्या गुरूंचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता.

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या घोषनणेनंतर पंतप्रधान मोदींनी आता सहकार क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. 

आता सहकारातून समृद्धी म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. यामुळे सहकार क्षेत्रातील वाटचाल सोपी होणार असून सहकार क्षेत्रात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ला वाव मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडेच सहकार मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात कळलेच कि, भाजप या क्षेत्रात काय आणि कसे योगदान देतील, काय बदल घडवतील तेही आपण पाहूच …

आधी हे जाणून घेऊया कि हे मंत्रालय स्थापन करण्यामागे नक्की पार्श्वभूमी काय आहे. 

केंद्र सरकारने ‘सहकार मंत्रालया’ची स्थापना करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले याबद्दल शंका नाही पण संपूर्ण श्रेय आपण मोदींना नाही देऊ शकत कारण, याचं खर श्रेय जात ते त्यांच्या गुरूला !

केंद्र सरकारने खास वेगळं सहकार मंत्रालय स्थापन करावं यासाठी संघाचा भाग असणाऱ्या ‘सहकार भारती’ या संस्थेने पुढाकार घेतला होता. याच सालात फेब्रुवारी महिन्यात त्याचा ठराव करून सहकार भारती संस्थेने तो केंद्र सरकारला सोपवला होता.

या संस्थेची स्थापना केली ते नरेंद्र मोदींचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांनी.

मोदी जसे सत्तेत आले तसे त्यांनी सहकार मंत्रालय असावं यासाठी प्रयन्त केल्याचं खुद्द सहकार भारती संस्थेचं म्हणणं आहे.

‘बिना संस्कार नहीं सहकार’ हे ब्रीद घेऊन या चळवळीसाठी खास स्थापन झालेल्या ‘सहकार भारतीची’ स्थापना ११ जानेवारी, १९७९ रोजी झाली. सहकार चळवळीत सुसंस्कारित कार्यकर्त्यांची फळी तयार व्हावी म्हणून स्व. लक्ष्मणराव इनामदारांनी हि संस्था स्थापन केली होती.
केंद्रीय कृषी व सहकारमंत्री ना. राधामोहन सिंह हे सध्याचे अध्यक्ष आहेत, तर महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. हि संस्था गेली ३८ वर्ष झाली देशव्यापी संघटन उभे करत आहे.
ही सहकार चळवळ पक्षीय राजकारणापासून अलिप्त असली पाहिजे असं ‘सहकार भारती’ची भूमिका असते.
म्हणूनच ‘सहकार भारती’ च्या वतीने झालेल्या आतापर्यंत अधिवेशनांमधून  विविध राजकीय नेत्यांनी आणि सहकार – सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी देखील याबाबत आपले स्पष्ट मत नोंदवले आहे.
कै. दत्तोपंत ठेंगडी, रा. स्व. संघाचे भूतपूर्व सरसंघचालक कै. बाळासाहेब देवरस, कै. रज्जूभैय्या, ज्येष्ठ काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण, बाळासाहेब विखे पाटील, शिवाजीराव पाटील, अण्णासाहेब शिंदे, गोपीनाथ मुंडे, मोहन धारिया, भाजपाचे नेते नितीन गडकरी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अर्थसल्लागार नीलकंठ रथ, पंजाब उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व झारखंड राज्याचे माजी राज्यपाल रामा जॉईस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. अण्णा हजारे इ. विविध पक्षांच्या नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी, ‘सहकार भारती’च्या व्यासपीठावरून अनेकदा मार्गदर्शन केले आहे.
सहकार भारती’चे काम आता देशातल्या २७ राज्यांमध्ये सुरू झाले असून सर्वच राज्यांमध्ये कार्यकारिणीची स्थापना व नोंदणीची प्रक्रिया पूर्णही झाली आहे. सहकारी चळवळीची व्यापकता वाढावी, सहकारी चळवळीचा प्रचार-प्रसार व्हावा; याबरोबरच देशभरातील प्रत्येक जिल्हास्थानी नागरी सहकारी पतसंस्था गठीत व्हाव्यात, स्वायत्त सहकारी कायद्याची तसेच वैद्यनाथ समितीच्या अहवालाची अंमलबजावणी व्हावी, अशी उद्दिष्ट्ये ठरवली गेली आहेत.
स्व.लक्ष्मणराव इनामदार जे कि नरेंद्र मोदी यांचे गुरु होते त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने सहकार भारती संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातून २२ कार्यकर्ते पूर्णवेळ सहकार भारतीच्या प्रचारासाठी बाहेर पडले आहेत.
 बंगलोर व गोवा येथे प्रशस्त कार्यालये सुरू झाली आहेत.
संपूर्ण देशभराच्या कामासाठी या सर्वच कार्यालयांचा चांगला उपयोग सहकार भारतीच्या कामासाठी होणार आहे. लवकरच स्व.लक्ष्मणराव इनामदार गौरव ग्रंथाचे देखील प्रकाशन केले जाणार आहे.

थोडक्यात या मंत्रालयाचा उद्देश असा आहे कि, सहकारी संस्थांसाठी ’व्यवसाय सुलभीकरण’ प्रक्रिया सुरळीत करणे आणि बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हा आहे. 

गेल्या काही काळापासून त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सहकारी संस्थांची ‘इमेज’अतिशय नकारात्मक झालेली आहे.

अगदी पूर्वीपासूनच अपवाद सोडता या सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. जे देशासाठी  लोकांच्या सहभागातून आर्थिक विकासाचं एक उत्कृष्ट मॉडेल बनलेल्या सहकारी क्षेत्रात प्रस्थापितांचा वावर आणि त्यांचा भ्रष्टाचार हा कंट्रोल करता आलेला नाही.

पण तरीही नव्याने स्थापन झालेले हे खाते देशातील सहकार चळवळ बळकट करू शकेल का, हि शंका आहे पण ते आपल्याला येत्या काही काळात कळूनच जाईल.

हे मंत्रालय या क्षेत्रासाठी प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक अशी त्रिसूत्री मांडणार आहे.

महाराष्ट्रासह देशातील काही सहकारी बँकांमध्ये, सहकारी साखर कारखाने, सुतगिरणी यात झालेल्या भ्रष्टाचारामुळेही सहकार चळवळीवर संशय येतोय पण आता या क्षेत्रात किती साफसफाई होणार आहे  जसं हे केंद्र सरकार सांगतंय तसंच होणार का हा एक प्रश्न आहे.

सहकाराच्या आर्थिक विकासाचे मॉडेलला हे मंत्रालय किती बळकटी देतंय हे भविष्यात बघूया.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.