त्या एका गॉसिपमुळे साहिल खानचं अख्खं करियर संपलं.

साहिल खान आठवतोय? हा तोच स्टाईल सिनेमातल्या चंटूबंटू जोडीतला चंट चंटु. २००१ साली आलेल्या एन चंद्राच्या स्टाईलने आणि त्यातल्या एक्स्क्यूज मी या गाण्याने अख्ख्या देशभरात धुमाकूळ घातला होता.

शर्मन जोशी आणि साहिल खान यांची फ्रेश जोडी म्हणजे अंदाज अपना अपना मधल्या आमिर- सलमानची नेक्स्ट कॉपी आहे असं अनेकांचं मत होतं.

साहिल खान तर डिक्टो सलमान खान होता.

साहिल मूळचा कलकत्त्याचा. आई चायनीज तर वडील बंगाली मुस्लिम. लहानपणापासून सलमान खानचा फॅन. अगदी त्याच्यासारखी बॉडी केली, ऍक्टिंगसुद्धा तशीच करायचा.

मुंबईत मॉडेलिंग करत असताना त्याला एक म्युजिक व्हिडीओ मिळाला. त्यात त्याला बघून एन.चंद्रा यांनी स्टाईल साठी साइन केलं.

स्टाईल हा एक कॉलेजला जाणाऱ्या मुलांची कॉमेडी असणारा सिनेमा. त्याच यश हे अगदीच अनपेक्षित होतं.

एन चंद्रा यांनी शर्मन आणि साहिलला घेऊन एक्सक्यूज मी हा स्टाईलचा सेकंड पार्ट काढला. हा पण अनेकांना आवडला पण तो स्टाईल एवढा सुपरहिट झाला नाही.

शर्मन जोशीने स्टाईल आणि एक्सक्यूज मीचा पुरेपूर फायदा उठवला. त्याला रंग दे बसंती, गोलमाल, ढोल, लाईफ इन मेट्रो अशा अनेक चांगल्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. थ्री इडियट्सच्या यशाने तर अनेक रेकॉर्ड्स तोडून टाकले.

या मानाने साहिल खान कमनशिबी ठरला.

शर्मनप्रमाणे नाटकाची पार्श्वभूमी नसल्यामुळे त्याच्या अभिनयक्षमतेला मर्यादा होत्या. त्यात त्याचे सिनेमा निवडीचे काही निर्णय चुकले.

साहिलचे सगळे सिनेमे फ्लॉप झाले. वैयक्तिक आयुष्यातही त्याचे निर्णय चुकतच गेले.

२००४ साली त्याने सुपरमॉडेल निगार खान हिच्या सोबत लग्न केलं. हे लग्न जास्त काळ टिकल नाही. मार्च २००५ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

आउटसायडर असल्यामुळे फिल्मइंडस्ट्रीमध्ये साहिल खानला सल्ला देणारा मदत करणारा असं कोणी नव्हतं. अशातच त्याच्या आयुष्यात आयेशा श्रॉफ आली.

आयेशा श्रॉफ म्हणजे आपला भिडू जॅकीची बायको आणि टायगरची मम्मी.

ही एकेकाळची मिस इंडिया. जॅकीच्या प्रेमात पडली आणि तिने मॉडेलिंग बंद केलं. तिला स्वतःला बिझनेसचा बराच सेन्स आहे. तिने सोनी चॅनेल भारतात येत होतं तेव्हा त्यात पैसे इन्व्हेस्ट केले. सध्या तिच्याकडे सोनीचे १०% शेअर्स आहेत.

अस म्हणतात की आयेशा आहे म्हणून आपल्या भिडूला फायनान्शियल कधी टेन्शन नाही.

आयेशा सुद्धा बंगाली आहे. तिने साहिलला बरीच मदत केली. दोघांनी मिळून कर्मा नावाची फिल्म प्रोडक्शन कंपनी सुद्धा सुरू केली.

काही वर्षे तसं ठीक चाललं होतं

मात्र आयेशा आणि साहिल सगळ्या पब्लिक फंक्शन मध्ये एकत्र असायचे. हळूहळू गॉसिप मीडिया मध्ये त्यांच्याबद्दल कुजबुज सुरू झाली.

पण दोघांच्या वयात १७ वर्षांचा फरक होता यामुळे चर्चा काही वाढली नाही.

पण २०१४ साली खरा गोंधळ सुरू झाला. एकदा साहिल खाननेच मीडिया समोर आयेशा बद्दल काही तरी आरोप केले. तिथून काँट्रॅव्हर्सी सुरू झाली.

आयेशाने साहिलविरुद्ध माझे बिझनेसमधले ८ कोटी रुपये दिले नाहीत अशी केस केली.

साहिलच्या वकिलाने कोर्टात तिचे आणि साहिलचे खुप जवळीक असलेले व्यगतिगत फोटो सादर केले अन दोघांच अफेअर होत यातून आयेशाने साहिलचा फायदा उठवला असे आरोप केले.

या सगळ्या काँट्रॅव्हर्सीला अतिशय घाणेरडे वळण लागले होते.

आयेशाने कोर्टात आरोप केला की साहिल खान हा समलैंगिक असल्यामुळे आमचे संबंध होणे शक्यच नाही.

मीडियामध्ये सुद्धा या वरून खूप गॉसिप चालवलं गेलं. पण शेवटी कोर्टाबाहेर हा वाद मिटवला गेला. दोघांनीही एकमेकांविरोधातले केसेस मागे घेतले.

पण दरम्यानच्या काळात साहिलच करियर सगळेच संपले.

आता तर त्याला सिनेमा सुद्धा ऑफर होत नाही. साहिल खान युट्युब आणि इन्स्टाग्रामवर फिटनेस व्हिडीओ टाकत असतो.

सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूनंतर त्याने एक जुना फिल्मफेअर मॅगझीनचा फोटो शेअर केला आहे. त्यात त्याच्या फोटो खाली सलमान आणि शाहरुख आहेत.

View this post on Instagram

BOHUT KAM LOGON KE SAATH ZINDAGI MAIN AESA HOTA HAI KE APNI 1st FILM 🍿 #STYLE ❤️ KE BAD INDIA KE SABSE TOP FILM MAGAZINE KE COVER PAR, DO INDIA KE SAB SE BADE SUPER STAR KE SAATH HO…. MAGAR UNME SE EK SUPER STAR KO BOHUT BURA LAGA 🤣🤣 JAB KE MAIN TO NAYA THA, UNKA FAN THA, KAMZOR THA 😂 PHIR BHI WOH MUJHE KAI BAAR SIDE ROLE KE LIYE BULATE RAHE, TV SHOW KE LIYE BHI BULATE RAHE – AUR PHIR KAI FILMS SE MUJHE NIKALWA DIYA 😜 NAAM BADE AUR DARSHAN CHOTE 😂 GUESS WHO ??? I DONT GIVE A FUCK TODAY FOR HIM COZ @sushantsinghrajput NE UNKA SUCHHA ASLI CHEHRA DIKHA DIYA. DUNIYA KE WOH LOG NEW TALENTS SE KITNA DARTE HAI – 20 SAAL MAIN JOHN ABRAHAM KE ILAWA KOI NAHI AYA INDUSTRY MAIN BADA STAR COZ KOI ANE HI NAHI DETA; ONLY STAR SON KO HI KAAM MILTA HAI – THINK ABOUT IT – RIP💔💔🙏🏽 @sushantsinghrajput . . #IfYouDontKnowNowYouKnow #SahilKhan #Hunk #hunkwater #bollywood #history #OneLife #Mumbai #FitnessIC⭕️N #KaamKaroNaamKaro #OneLifeBaby

A post shared by India’s Fitness & Youth IC⭕️N (@sahilkhan) on

 

साहिल म्हणतो की या एका फोटोमुळे दोन्ही खान पैकी एकाने माझं करियर संपवलं. फिल्मइंडस्ट्रीमधल्या घराणे शाही आणि दबावतंत्राचा वापर याबद्दलही साहिल खान बोलला आहे.

सलमान किंवा शाहरुखने साहिलला चांगले सिनेमे मिळू दिले नाहीत हे शक्य देखील आहे पण वारंवार वादात अडकत राहिल्यामुळे देखील साहिलच्या करियरची नौका कायमची पाण्यात अडकली हे सुद्धा तितकंच खरं?

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.