नानासाहेब पेशवे हेच पुढे “साईबाबा” झाले असं का म्हणतात..?

एक अफवा जोरात असते. मित्रांच्या मैफिलीत बसलं की असं मटेरियल बाहेर पडतं. त्याच महत्वाच कारण म्हणजे लोकांच्या भावनांचा विचार केला तर जाहिरपणे अस कोणी म्हणायचं धाडस करत नाही. अशा अफवांना सहसा आधार नसतो. पण त्या अफवा मात्र एखाद्या सत्याला अनुसरून असतात. 

अशीच एक अफवा म्हणजे साईबाबा हे मुळचे नानासाहेब पेशवे होते. १८५७ चा उठाव फसल्यानंतर ते शिर्डीत आले आणि साईबाबा हे नवे नाव धारण करून राहू लागले. इंग्रजांपासून वाचून राहण्यासाठी त्यांनी हे नाव स्वीकारलं. 

याच धर्तीवर अजून दोन अफवा सांगितल्या जातात. त्या म्हणजे शेगावचे गजानन महाराज हे सेनापती तात्या टोपे होते तर अक्कोलकोटचे स्वामी समर्थ हे मुळचे पानीपतामध्ये पराभूत झालेले सदाशिवभाऊ पेशवे होते. 

आत्ता याला नेमका आधार काय ? 

वास्तविक याला कोणताच असा आधार नाही. यासंबधित पहिल्यांदा लिखाण केल्याच सांगितलं जातं ते १९ जुलै १९९४ सालच्या सह्याद्री या अंकात. सह्याद्री या अंकात हा लेख छापून आल्याचं सांगितलं जातं. सोबत असही सांगितल जातं की हा लेख छापल्यानंतर लोकभावना भडकल्या लेखकांनी माफी मागितली आणि सर्व अंक जाळून टाकण्यात आले. मात्र काही लोकांनी या अंकाच्या प्रतींची कॉपी करून ते गावागावात पोहचवण्याच काम केलं. 

Screenshot 2019 12 18 at 2.01.21 PM

मुळ लेख शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर एक ब्लॉग सापडतो. मुलनिवासी अर्थाने या ब्लॉगवर बरेचसे कात्रण असून त्यावर एका वर्तमानपत्रातील कात्रण इथे जोडण्यात आले आहे. त्याचसोबती त्याचे हिंदी भाषांतर देखील उपलब्ध करण्यात आलेले आहे. 

आत्ता यातली गंमत आपण विस्ताराने पुढे पाहूच पण त्याअगोदर सांगतो की, तुम्ही कोणालाही साईबाबा हे नानासाहेब पेशवे होते याचा संदर्भ विचारला की तो हेच कात्रण समोर करतो. 

आत्ता नानासाहेब पेशवे कोण होते व त्यांचा कालखंड कोणता होता ? 

नानासाहेब पेशव्यांचा जन्म ८ डिसेंबर १८२४ सालचा. पेशव्यांची पुण्यातील सत्ता संपुष्टात आल्यानंतर दूसरा बाजीराव बिठुर येथे गेला. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील माधवराव भट हे देखील बिठूर येथे गेले होते. माधवराव भट यांच्या मुलाचे नाव धोंडोपंत उर्फ नानासाहेब. ७ जून १८२७ साली दूसऱ्या बाजीरावाने धोंडोपत या मुलाला दत्तक घेतले. बाजीरावाच्या मृत्यूनंतर धोंडोपत म्हणजेच नानासाहेब बाजीराव हा पेशवा झाला. 

नानासाहेब पेशव्यांचा सहभाग १८५७ च्या उठावात होता.

वास्तविक इथेच साईबाबा आणि नानासाहेब यांचे संदर्भ जोडण्यासाठी जागा मिळते. कारण नानासाहेबांच्या मृत्यूबद्दल ठोस अशी कोणतीच माहिती नाही. 

ब्रिटीशांच्या मते नानासाहेब पेशवे मलेरिया होवून १८५७ सालीच गेले होते. मात्र जून १८५८ साली ग्वालेरमध्ये राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे व रावसाहेब यांनी नानासाहेब जिवंत असल्याचा व तेच पेशवेपदावर असल्याचा दावा केल्याचं सांगण्यात येत. 

काहीजण लिहतात ते नेपाळला पळून गेले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. 

तर काहीजणांनी अस लिहलं आहे. हर्षराम मेहता या नानासाहेबांचा संस्कृत शिक्षकाला नानासाहेबांनी लिहलेलं पत्र १९७० सापडलं. ज्यामध्ये असा उल्लेख आहे की नानासाहेब गुजरात येथील सिंहोर येथे योगेंद्र दयानंद महाराज या नावाने राहतं होते. याच हर्षराम मेहता यांनी नानासाहेबांच्या मुलाला वाढवल्याचं सांगण्यात येतं आणि श्रीधर यांचे वंशज सिंहोर येथे राहत असल्याचं सांगण्यात येत. यासाठी दाखला म्हणून जी थेअरी मांडण्यात आली आहे त्याला नॅशनल म्युझियमचे डायरेक्टर जीए पंत यांनी दाखला दिल्याचं सांगितल जातं. 

के.वी. बेलसरे यांच्या पुस्तकात लिहलं आहे की ब्रम्हचैतन्य नावाचे जे संत होते त्यांनी सांगितलं होतं की नानासाहेब उत्तरप्रदेशातील एका जंगलात राहिले होते. ते ४० वर्ष तिथेच राहिले व १९०६ साली त्यांचा मृत्यू झाला. 

नानासाहेब पेशव्यांचे वय हे १८५७ च्या सुमारास ३३ वर्ष इतके होते. 

१८५७ च्या उठावानंतर नानासाहेब पेशवे कुठे होते? ते खरच गेले का? याबाबत कुठेच एकवाक्यता नाही. काही ठिकाणी ते जिवंत असल्याच्या नोंदी आहेत तर काही ठिकाणी ते मृत्यू पावल्याच्या नोंदी आहेत. 

आत्ता साईबाबा नेमके शिर्डीत कधी प्रकटले…? 

साईबाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे झाल्याच सांगण्यात येत. साईबाबा हे हिंदू होते की मुस्लीम यात मतभिन्नता आहे. काही ठिकाणी साईबाबा हे मुस्लीम असल्याचं ठामपणे सांगितलं जातं तर काहीठिकाणी साईबाबा हिंदू असल्याचं सांगण्यात येतं. 

साईबाबांना शिर्डीमध्ये प्रथम पाहिलं गेल्याचं दाखले आहेत त्यात १८५७ नंतरचाच संदर्भ आलेला आहे. साईबाबांचे मुळ पाथरी. तिथे त्यांचे मुळ गाव असे संदर्भ दिले जातात. साईबांबाचे किनरवापी अंगरखा घालायचे तसाच अंगरखा नानासाहेब पेशवे देखील वापरत असल्याचे सांगितले जाते.

साईबाबा शिर्डीत नेमके कधी आले त्याबाबत मतभिन्नता असली तरी ते १८५७ नंतरच शिर्डीत आल्याचे सांगण्यात येते. यापुर्वी ते वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीत आले होते मात्र ते पुन्हा आपल्या गावी परतल्याचं सांगण्यात येत मात्र त्यास ठोस पुरावा नाही. 

साईबाबांवर श्री साई सच्चरित्र गोविंदराव दाभोळकर यांनी लिहलं आहे. त्यामध्ये साईबाबा हे एका मिरवणुकीसोबत शिर्डीत आले. ते प्रथम खंडोबाच्या मंदिरामध्ये राहिले. पुस्तकातील माहितीनुसार साईबाबांचे मुळ गाव पाथरी होते. त्यांच्या वडिलांचे नाव परशुराम भूसारी होते. परशुराम भुसारी यांना एकूण पाच मुले होती त्यातील तिसऱ्या मुलाचे नाव हरीभाई भूसारी होते. तेच पुढे साईबाबा झाले. 

एका मतानुसार साईबाबांचे वंशज आजही औरंगाबाद, हैद्राबाद, निझामाबाद अशा ठिकाणी विखुरले आहेत.  परशुराम भूसारी यांच्या घराशेजारीच मुस्लीम कुटूंब रहायला होते. वडिलांच्या मृत्यूनंतर लहान असणारे हरीभाऊ एका मुस्लीम फकिरासोबत घर सोडून गेले ते थेट पंधऱा वर्षांचे असताना घरी आले. घरी आल्यानंतर आपल्या कुटूंबाची वाताहत झालेली त्यांनी पाहिली. शेजारच्या मुस्लीम कुटूंबातील चांद बी त्यांना सेलू येथे वैकुंशा यांच्याकडे घेवून गेल्या. तिथे काही काळ व्यतित केल्यानंतर साईबाबा शिर्डी येथे पोहचले. 

साईबाबा हेच नानासाहेब पेशवे होते ही थेअरी समोर येण्यामागची कारणे. 

  • पहिली गोष्ट म्हणजे नानासाहेब पेशवे यांच्या मृत्यूबद्दल अनेक मतप्रवाह आहेत आणि दूसरी गोष्ट म्हणजे साईबाबा यांच्या मुळाबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. वेगवेगळे लोकं वेगवेगळे दावे करत असल्यानेच असे समीकरण जुळवण्यात येते. 
  • दोघेही समकालीन व्यक्तिमत्त्व होते. साईबाबांच्या जन्माचे साल अंदाजे १८३० सांगण्यात येथे तर नानासाहेब पेशव्यांचे जन्मसाल हे १८२४ असल्याचे सांगण्यात येते. १८५७ च्या सुमारास नानासाहेब पेशव्यांचे वय ३७ तर साईबाबांचे वय ३१ इतके होते. वयात जास्त फरक नसल्याने हा संदर्भ लावण्यात येतो. 
  • याचप्रमाणे साईबाबा हे शिर्डीत १८५७ च्या उठावानंतरच प्रकट झाल्याचे सांगण्यात येते त्यामुळे या अफवेला बळ मिळते. 
  • साईबाबांचा पेहराव हा मुस्लीम सुफी संताप्रमाणे होता. ते किनरवापी अंगरखा परिधान करत असत. अशाच प्रकारचा अंगरखा नानासाहेब पेशवे घातल असल्याचं सांगण्यात येत. 
  • याचसोबत गजानन महाराज हे सेनापती तात्या टोपे असल्याची अफवा देखील सांगण्यात येते. समजा या दोन्ही गोष्टी खऱ्या असत्या तर कधीना कधी गजानन महाराज आणि साईबाबा यांची भेट झालीच असती. मात्र अशी कोणतीच भेट झाल्याची नोंद नाही. 

या अफवेला बळ मिळण्याच एकमेव कारण म्हणजे नानासाहेबांचा मृत्यूबद्दल संभ्रमता असणे व साईबाबांच्या जन्माबाबत संभ्रम असणे इतकेच आहे. याहून अधिक गोष्टी कोणत्याच नाहीत. समजा या गोष्टी खऱ्याच असत्या तर नानासाहेब पेशवे अखेरपर्यन्त साधूच्या वेषात राहणं अशक्य होतं. कधीना कधी त्यांनी पत्रव्यवहार केले असतेच. पण तशा कोणत्याच गोष्टी आजवर समोर आलेल्या नाहीत.  

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. नितीन says

    भिडू तो लेख वाचायचा आहे🙏
    नीट दिसत नाही पाठवता का??

Leave A Reply

Your email address will not be published.