राजीव गांधी राम जेठमलानींना भूंकणारा कुत्रा म्हणाले, मग जेठमलानींनी त्यांचा हिसका दाखवला.
आज सकाळी राम जेठमलानी यांच्या निधनाची बातमी आली. त्यांच वय ९५ वर्ष होतं. भारतातले सर्वात महाग वकिल म्हणून लोक त्यांना ओळखायचे. कधी काळी १ रुपया फी घेवून त्यांनी वकिलीची सुरवात केली होती. १ रुपया फि आज कमी वाटत असली तरी हि गोष्ट ब्रिटीश भारतातली. त्या काळात हि रक्कम देखील मोठ्ठी होती. त्यांचे आजोबा आणि वडिल वकिलच होते. राम जेठमलानी वयाच्या १८ व्या वर्षीच वकिल झालेले.
फाळणी झाली आणि ते मुंबईत आले. मुंबईतलं प्रस्थ वाढत गेलं. शिवसेनेच्या पाठींब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढले. त्यात पराभूत झाले. पण मुंबईच्या बार असोशिएशनमध्ये त्यांच मोठ्ठ प्रस्थ निर्माण झालं. ते मुंबई बार असोसिएशनचे चेअरमन झाले. त्यानंतर आणिबाणीत इंदिरा सरकारला विरोध केला.
हळुहळु भारतातले सर्वात मोठ्ठे, हूशार आणि राजकारणाचा नाद असणारे वकिल म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली.
ते साल होतं १९८७ चं.
देशामध्ये राजीव गांधींच सरकार बोफोर्स प्रकरणातील आरोपांच्या गर्तेत सापडलं होतं. त्यावेळी रामजेठमलानी स्वीडनच्या दौऱ्यावर होते. स्वीडनच्या दौऱ्यावरुन भारतात येताच राम जेठमलानी यांनी बोफोर्स प्रकरणात जोरदार फैरी डागण्यास सुरवात केली.
राम जेठमलानी म्हणाले होते की,
“राजीव गांधी आणि त्यांच्या संबधित लोकांनी किमान ५० कोटींची लाच या प्रकरणात घेतली आहे. जर राजीव गांधींना माझ्या आरोपात चूक वाटतं असेल तर खुश्शाल त्यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा.”
राम जेठमलानी यांचा हा दावा सरळ खोडण्यासारखा देखील नव्हता. आपल्या आरोपात काही चुक असेल तर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी खुद्द जेठमलामीच प्रवृत्त करत होते. आत्ता सर्वांचा लक्ष कॉंग्रेस आणि खासकरून राजीव गांधी यांच्याकडे लागलं होतं.
राजीव गांधी मात्र या आरोपांना प्रतिउत्तर देताना गडबडले, ज्यांचा उल्लेख शांत, संयमीत नेते म्हणून केला जायचा ते राजीव गांधी राम जेठमलानींना म्हणाले,
मी कुत्र्यांच्या भूंकण्याकडे लक्ष देत नाही..
राम जेठमलानींना कुत्रा म्हणण्याची चूक राजीव गांधी यांनी केली होती. आत्ता पुन्हा एकदा डाव राम जेठमलानी यांच्या ताब्यात आला.
राम जेठमलानी म्हणाले की,
कुत्रा इमानदार असतो. चोर आले की तो भुंकतो. मी कुत्रा असेल आणि आत्ता भुंकत असेल तर ओळखून जा चोरी झालेय.
आत्ता राजीव गांधींची बोलती बंद झाली होती. राम जेठमलानी यांच्या प्रतिउत्तरावर राजीव गांधींनी शांत पसंत केलं. पण राम जेठमलानी हे काही शांत बसणाऱ्यातले नव्हते. त्यात त्यांची संभावना कुत्रा अशी केल्यामुळे राम जेठमलानी जास्तच त्वेषाने मैदानात उतरले.
बोफोर्स प्रकरण आणि एकंदरीत राजीव गांधींना टार्गेट करण्यासाठी राम जेठमलानी यांनी इंडियन एक्सप्रेसचं व्यासपीठ निवडलं. त्यांनी सांगितलं की येणाऱ्या महिन्याभरात मी रोज दहा प्रश्न थेट राजीव गांधींना इंडियन एक्सप्रेसद्वारे विचारणार. राजीव गांधी खरच निर्दोष असतील तर माझ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यावीत.
येत्या ३० दिवसात रोज दहा प्रश्न. शरमेची गोष्ट सोडा पण या हे प्रश्न वाचून स्वत:च्या अंतर्मनाला जरा जरी काही वाटलं तर राजीव गांधींनी राजीनामा द्यावा. राजीनामा दिला तरच हे प्रश्न थांबतील.
त्यानंतर राम जेठमलानी इंडियन एक्सप्रेस मध्ये राजीव गांधींना प्रश्न करु लागले, ते प्रश्न असे होते की, जस की राजीव गांधी आणि अजिताभ बच्चन यांचे कोणते संबंध नेमके काय आहेत, कमला नेहरु ट्रस्ट आणि अजिताभ बच्चन यांची कोणती भूमिका राहिली आहे, राजीव गांधींचा स्पेनचा साडू जोस वाल्देमर, सोनिया गांधींची आपल्या माहेरच्या संपत्तीत किती वाटा होता, जॉर्डनच्या बादशाहकडून नेमक्या किती कार भेट मिळाल्या होत्या, गायब झालेले विन चढ्ढा.
एकामागून एक प्रश्न विचारले जात होते पण शेवटी हे प्रश्न अत्यंत खाजगी स्वरुपाचे होते पण या प्रश्नांवर उत्तर देण्यात ना कॉंग्रेस समर्थ ठरली ना की राजीव गांधी. येणाऱ्या काळात कॉंग्रेसला अडचणीत येण्यासाठी हि गोष्ट पुरेसी ठरली आणि याच आरोपांच्या नादात राजीव गांधीच सरकार गुरफटत गेलं. १९८९ ला ४१४ जागांपासून १९७ जागांवर कॉंग्रेस मर्यादित झाली.
हे ही वाचा.
- मेहमूदने राजीव गांधींच्या हातावर पाच हजार रुपये टेकवले..
- राजीव गांधींनी शहाबानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय एम.जे.अकबरांच्या सल्ल्यावरून पलटवला होता..?
- बोफोर्सची फाईल गायब करणारे माननीय मुलायम सिंह !
- पाच अशा तोफा, ज्यांच्यापुढे बोफोर्सचा आवाज देखील फिका पडेल.