राजकुमार सलमानला म्हणाला, “तुझ्या बापाला विचार मी कोण आहे”
बॉलिवुडमध्ये असे अनेक अभिनेते होऊन गेले ज्यांचा औराच निराळा होता, आपल्या मोजक्याच बोलण्याने आणि तेहू सेवेज रिप्लाय देऊन समोरच्याची बोलती बंद करण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. त्यापैकीच एक म्हणजे राजकुमार. सिनेमा चालो अथवा न चालो राजकुमारचा डायलॉग मात्र लोकांच्या थेट काळजाला भिडायचा. राजकुमार फक्त सिनेमात हिरो नव्हते तर ते रियल लाईफमध्ये सुद्धा किंग माणूस होते. फटकळ बोलण्यात तर त्यांचा नाद कुणी करत नव्हते आणि समोरच्याचा पाणउतारा कसा करायचा याचा फंडा अचूक माहिती असणाऱ्या लोकांपैकी ते एक होते. असाच आजचा किस्सा की राजकुमार यांच्या तोंडातून निघालेल्या कडवट शब्दांचा शिकार सलमान खान झाला होता.
हम आंखो से सुरमा नहीं चुराते, हम आंखे ही चुरा लेते है…
हा तिरंगा मधला डायलॉग चांगलाच गाजला होता. राजकुमारचा सिनेमा ज्यावेळी थेटरात लागायचा त्यावेळी तिकिटांसाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडायची आणि काहीवेळा तर मारामारी सुद्धा व्हायची. पण खऱ्या आयुष्यात देखील एखादा माणूस इतका रॉयल कसा असू शकतो याचा हा किस्सा ज्यात राजकुमारने सलमान भाईचा गर्व धुळीस मिळवला होता. 1990 चा हा किस्सा सलमान भाई नव्यानेच इंडस्ट्रीत आला होता. मैने प्यार किया तुफ्फान चालला आणि सलमान त्यामुळे लोकांच्या घराघरात जाऊन पोहचला. सुरज बडजात्याने भरपूर पैसे छापले.
मैने प्यार किया सुपरहिट ठरला म्हणून एके दिवशी या सिनेमाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. तारीख होती 11 फेब्रुवारी 1990. सुरज बडजात्या जास्तच फॉर्ममध्ये होते कारण बॉलिवूडमध्ये त्यावर्षी सगळ्यात जास्त पैसे त्यांनीच कमावले होते. या पार्टीत सगळी मोठी मंडळी आलेली होती त्यात महेश भट्ट, सुभाष घई, यश चोप्रा सामील होते. संजय दत्त, सुनील दत्त, आलोकनाथ अशी सेलिब्रिटी गँग सुद्धा या पार्टीत आलेली होती. याच पार्टीत राजकुमार सुद्धा आलेले होते आणि याआधी त्यांचा सुर्या हा सिनेमा रिलीज झालेला होता आणि यातले डायलॉग लोकांच्या मनात कोरले गेलेले होते आणि सगळीच लोकं राजकुमारसाठी वेडी झालेली दिसत होती.
पार्टी सुरू झाली, सलमान खान साडेअकरा वाजता पोहचला खरा पण तो पूर्णपणे झिंगलेला होता. सलमान आणि सुरज बडजात्या यांची चांगली मैत्री होती, दोघांनी गळाभेट घेतली. मग सुरज बडजात्या सलमानला म्हणाला की मी तुला सुपरस्टार राजकुमार यांना भेटवतो, बॉलिवूडचे ते सगळ्यात मोठे स्टार आहेत आणि त्यांच्याकडून तुला बरंच काही शिकायला मिळू शकतं.
सुरज बडजात्याने राजकुमार यांना हस्तांदोलन केलं आणि सलमान खानकडे हात करून म्हणाले की हा माझ्या सिनेमाचा हिरो, सलमान खान. सलीम साहब के बेटे है ये…
सलमान खान त्याचवेळी काहीतरी उद्धट बोलला कारण सक्सेसची नशा आणि दारूची नशा यावर तो स्वार झालेला तो दिसत होता. सलमानचं वागणं राजकुमार यांना अजिबात आवडलं नाही.
सलमान म्हणाला हा कोण आहे ? याला मी नाही ओळखत…यावर राजकुमार एकदम शांतपणे म्हणाले की जा के अपने बाप से पुछ के मै कोण हुं….
यावर सलमान खान आणि बडजात्या दोघेही माना खाली घालून उभे राहिले आणि राजेशाही थाटात राजकुमार तिथून निघून गेले. सुरज बडजात्या राजकुमारच्या मागे पळत होते आणि सांगत होते की जाने दो वो बच्चा है…पण राजकुमार स्वाभिमानी असल्याने तिथून निघून गेले.
हे ही वाच भिडू :
- तडप तडपके गाण्यावर रडणारा सलमान दिसतो, पण इस्माईलच्या कम्पोजिशनने थेट भन्साळींना रडवलं होतं…
- त्या पिक्चरवेळी अक्कल आली आणि सलमान खानचा बॉलिवूडमध्ये पुनर्जन्म झाला…
- टॉयलेट सलमानच्या घरापाशी बांधायचं की शाहरुखच्या, या वादात आशिष शेलारांचं सॅण्डविच झालं
- कॉन्स्टेबल रवींद्र पाटील अक्षरशः खंगून वारले पण सलमानच्या विरोधातली साक्ष बदलली नाही…
Webtitle : Salman khan birthday : Raaj Kumar and Salman khan had a fight in movie success party