सलमान खानच्या लग्नाच्या पत्रिका छापून तयार होत्या पण..

नव्वदच्या दशकाची गोष्ट. आजही भारताचा सर्वात एलिजिबल बचलर ही पदवी मिरवणारा सलमान सलीम खान नावाचा प्राणी तेव्हा २५ वर्षाचा होता. नुकताच त्याचा मैने प्यार किया सुपरहिट झाला होता. फिल्मफेअरसकट बरेच पुरस्कार मिळाले होते. छोटी मोठी अॅड करणाऱ्या मॉडेलपासून थेट भारताच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचा समावेश होता.

जेष्ठ फिल्मरायटर सलीम खान यांचा हा थोरला चिरंजीव. दिसायला देखणा जवान, नुकताच पॉप्युलर झालेला. मग बापाला वाटल वेळीच दोनाच चार हात केलं तर पोरग आपल्या ताब्यात राहिलं. पोरग किती खोडगुणी आहे त्यांना माहित असाव. आता बाहेरून पोरगी शोधून आणायची त्यापेक्षा त्यालाचं बाहेर काय झंगाट चाललंय का विचारलं? सल्लूनं हळूच मान खाली घालून सांगतील.

“व्ह्य आबा. आपल्याला एक पोरगी आवडत्या पण आपल्यातली नाही, माझ्या पेक्षा वयान मोठी पण हाय. पण लग्नाला तयार हाय”

सलीम खान खुश झालं. त्यांनी तर कुठ लग्न जातधर्म बघून लग्न केलेलं. पोरग लग्नाला तयार झालं एवढ्यावरचं ते खुश झाले. पोरगी वयान मोठी म्हणजे सलमान पेक्षा जरा जास्त शहाणी असणार हा हिशोब त्यांनी मनाशी केला.

सलमानन पटवलेल्या पोरगीच नाव होतं संगीता बिजलानी. एकेकाळची मिस इंडिया. कुठल्यातर जाहिरातीच्या शुटींग वेळी दोघांची भेट झाली होती. तेव्हा अजून मैने प्यार किया अजून रिलीज झाला नव्हता. प्रेमाचं फुलपाखरू असलेलं सलमान या सुंदर फुलावर जाऊन बसायला किती वेळ लागणार होता? पण हे फुल होतं लई वांड. प्रेम वगैरे ठीक आहे पण लग्न व्हायला पायजे असं तिने त्याला ठणकावून बजावलं.

Do you know Salman Khan and Sangeeta Bijlani’s wedding cards were printed just before they separated 1

सल्लूनं पिक्चरचं कारण सांगून अशीच एक दोन वर्ष ढकलून काढली. संगीताचे पण काही सिनेमे रिलीज झाले पण तिला काय लई हिट मिळाले नाहीत. मग मात्र तिने सलमानवर लग्नाचं प्रेशर आणायला सुरवात केली. त्याच्या पुढ पर्याय उरला नाही. त्यान आईबाबानी लग्नाचा विषय काढल्यावर संगिताबद्दल सांगितलं.

मिया बीबी राझी झाल्यावर काझी मियांनी लग्नाची तारीख काढली,२७ मे १९९४.

लग्नाची तयारी सुरु झाली. हॉल बुक झाला. कापड शिवून झाली. पत्रिका छापल्या. गावभर वाटून पण झाल्या. एवढ्यात बातमी आली नवरी मुलगी बोहल्यावर उभा राहायला नाही म्हणत्या. दोन्ही घरातल्या थोरामोठ्यांना टेन्शन आलं. दोघांना अमोरासमोर आणून विचारलं नेमक काय झालंय. संगीतान सांगितलं,

तुमच पोरग माझ्या पाठीमाग दुसऱ्या पोरगीला फिरवतय.

झालं असं होतं की लग्नाला एक महिना उरला होता आणि सलमानचा सोमी अली नावाच्या एका पाकिस्तानी मॉडेल बरोबर टाका भिडला होता. संगीताला शंका आल्यावर तिनं त्याची पाळत ठेवली आणि सलमान तिला सोमी बरोबर रंगेहाथ गावलं. त्यान तिला ती माझी मैत्रीण हाय, आमचं तसं काय बी नाही असली थातूरमातुर कारण सांगून गंडवायचा प्रयत्न केला. पण त्याच्या पेक्षा चार पावसाळे जास्त बघितलेल्या संगीतानं लग्नाची निमंत्रणपत्रिका फाडून लग्न मोडलं.

पुढ तिनं भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान मोहम्मद अझरूद्दीन बरोबर तिने आपलं प्रकरण जुळवल. अझरूद्दीन तेव्हा मोठा स्टार होता. अजून मॅच फिक्सिंग वगैरे चं झेंगट त्याच्या माग लागल नव्हत. नेहमी कॉलर ताठ करून रुबाबात असणारा अझर स्टाईलच्या बाबतीत सलमानच्या दोन पावलं पुढचं होता. त्यांची पण ओळख एका जाहिरातीच्या शुटींगवेळीच झालेली. 

फक्त एकच प्रॉब्लेम होता अझरूद्दीनच लग्न झालं होतं. एवढचं नाही पण त्याला दोन मुलं देखील होती. भारताचा कप्टन बनल्यापासून अझरला आपल्या हैदरबादच्या गावठी बायकोचा कंटाळा येऊ लागला होता. ग्ल्मरस संगिता बिजलानी बरोबर लग्न करण्यासाठी त्याने नुरीनला सोडचिठ्ठी दिली.

Mohammad Azharuddin Married with Naureen 1

१९९६ साली अझर आणि संगिताचं लग्न झालं. मुंबईच्या ताज हॉटेल मध्ये झालेल्या रिसेप्शनच्या जंगी कार्यक्रमासाठी क्रिकेट ते बॉलीवूड सगळे सेलिब्रेटी हजर होते.

अझर आणि संगिताच लग्न चौदा वर्ष टिकलं. २०१०साली अझरूद्दीनचं आणि बडमिंटनपट्टू ज्वाला गुट्टाचं अफेअर चालू असल्याच्या बातम्या आल्या नी संगिताने डिव्होर्ससाठी अॅॅप्लिकेशन केलं. सध्या तीही सिंगलचं आहे.

इकडे आपला सल्लू मिया सोमी अली बरोबर सुद्धा खूप दिवस टिकला नाही. तिने त्याच्यासाठी आपल फिल्मी करीयर पणाला लावलं पण सलमान तिच्या हाती सापडला नाही. त्याने विश्वसुंदरी ऐश्वर्यासाठी तिच्याशी ब्रेकअप केलं. त्यांनतर कतरिना, लुलीया अशा अनेक मुली आल्या गेला. पन्नाशीत गेलेला सलमान अजूनही लग्नाचं लाडू पासून दूरच आहे.

सलमान रोज करत असलेले कांड, त्यानिम्मीताने पाठीमागे लागत असलेले कोर्ट केसेस बघून सलीम खानना अजून पश्चताप होतो की तेव्हाच याच लग्न लावून दिल असत तर बर झालं असत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.