सलमान आपल्या मित्रांच्या मागे कसा उभा राहतो हे मोहनीश बहलच्या किस्स्यावरून कळतं.

एक लडका औंर लडकी कभीं दोस्त नहीं हो सकते… 

मोहनीश बहलचा हा एकच डॉयलॉग त्याच आणि फ्रेन्डझोनमध्ये आयुष्य काढणाऱ्याचं आयुष्य सेट करणारा आहे.

मोहनीश बहलने मेने प्यार किंया पुर्वी त्यांने साधारण सात ते आठ सिनेमे केलेले. मात्र यातले सगळे दणकूण आपटले होते. त्यातही त्याच्या चेहऱ्याची दखल देखील कोणी घेतली नव्हती. इतकं सगळं केल्यानंतर आत्ता वैमानिक म्हणूनच आपलं करियर सेट होवू शकत म्हणून रोजच्या वैमानिक होण्याच्या प्रॅक्टिसला तो लागला होता.. 

मोहनिश बहल सी-रॉक या हॉटेलच्या जीममध्ये जायचा. तिथेच एक हाडकुळा पोरगा यायचा. मोहनीश बहल दिसायला चांगला होताच पण त्याची बॉडी पण चांगली होती. दूसरीकडे हे हाडकुळं पोरगं रोज येवून जीममध्ये स्टाईल मारून जायचं. 

दोघांच्यात चांगली दोस्ती झाली. मोहनीश बहलने त्या पोराला विचारलं पुढे काय करायचा विचार आहे तेव्हा त्या पोरांन सांगितलं मला ॲक्टर व्हायचाय.. 

ते पोरगं म्हणजे सलमान खान. सलमान खान तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन देत होता. MPSC च्या चार मेन्स आणि दोन इंटर्व्हू देवून सिनियर झालेला मुलासारखं मोहनीश बहल त्याला समजावून सांगत होता की तूला नाही जमणार. इकडं पहिल्याचं ठोक्यात DySp ची स्वप्न घेवून सलमान कामाला लागलेला. 

एक दिवशी सलमान आनंदातच जीममध्ये आला आणि बडजात्या ग्रुपचा मेनें प्यार किंया हा सिनेमा त्याला मिळाल्याचं तो सांगू लागला. मोहनिश देखील खूष झाला. त्यानंतर सलमान फिल्मच्या प्रोसेसमध्ये भाग घेवून लागला. या सिनेमात एक व्हिलन आहे तो देखील आपल्याच वयाचा आहे हे स्क्रिप्ट समजून घेतल्यावर सलमानला कळालं. त्याने राजकूमार आणि सुरज बडजात्यांना व्हिलनच्या रोलसाठी कोणी फाईनल झालं आहे का याची विचारणा केली. दोघांकडून असा व्हिलन अजून न मिळाल्याचं सांगण्यात आलं.. 

दूसऱ्या दिवशी सलमान मोहनीश बहलला भेटला व त्याला व्हिलनच्या रोलबद्दल सांगू लागला. शेवटचा ट्राय म्हणून मोहनीश देखील तयार झाला. मोहनीश ऑडिशन देवून गेला.. 

इकडे सुरज आणि राजकुमार बडजात्यांचा मोहनीश वरुन विषय चालू असतानाचा ताराचंद बडजात्यांना समजलं की मोहनीश तर नुतनचा मुलगा आहे. ताराचंद हे नुतनला खूप मानत होते. अशा अभिनेत्रीच्या मुलाला व्हिलनचा रोल द्यावा हे त्यांना पटण्यासारखं नव्हतं. त्यांनी तशी चर्चा सुरू केली आणि ही गोष्ट नुतनला समजली.. 

नुतनने थेट ताराचंद यांना फोन लावला व त्या म्हणाल्या, 

माझा मुलगा आहे म्हणून त्याला शिक्षा देवू नका, तो व्हिलनचा रोल देखील करेल.. 

ताराचंद यांच्या डोक्यावरच ओझ उतरलं. ते नुतनला म्हणाले की, मला जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मी तुझ्या मुलाला चांगल्या भूमिका देईल.. 

अशाप्रकारे मोहनीश बहलला एकदाचा रोल मिळाला. सिनेमा रिलीज झाला आणि सलमान खान इतकीच चर्चा मोहनीश बहलची झाली. बॉलिवूडला अजून एक तगडा व्हिलन मिळाला तो म्हणजे मोहनीश बहल. पण राजश्री प्रोडक्शनने मात्र नूतनला दिलेला शब्द वेळोवेळी पाळला. मोहनीशला चांगल्या भूमिका देण्याचं काम त्यांनी केलं.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.