या बाईंचं हृदय त्यांच्या छातीत नाही तर बॅगेत धडधडतंय

दिल तो उनके सीने में भी मचलता होगा,

हुस्न भी सौ सौ रंग बदलता होगा,

उठती होंगी जब भी निगाहें उनकी,

खुदा भी गिर गिर के संभलता होगा

या अशा शायऱ्या आपल्यापैककी  कित्तेकजणांनी व्हाटसऍपवर फॉरवर्ड मारल्या असतील. मात्र काही सुंदर पऱ्या अशा असतात ज्यांना पाहून तोंडातून शायरी आपोपच निघते. 

ब्रिटनमधील सल्वा हुसेन यांना एकेकाळी त्यांच्या नवऱ्यानं अश्याच शायरी पेश केल्या असतील. आता मात्र त्यांना आपण लिहलेल्या शायरीची पहिली लाइन ‘दिल तो उनके सीने में भी मचलता होगा’ लागू होत नाही. 

कारण त्याचं दिल म्हणजेच हृदय त्यांच्या शरीरात नाही तर त्यांच्या बॅगेत धडधड करतं. 

असलं काई तर विचत्र ऐकून आता तुम्ही म्हणाला थर्टी फर्स्टला दोन दिवस होत आलं तरी भिडू तरी तुझी अजून उतरली नाहीये का? पण मित्रांनो विश्वास ठेवा सल्वा हुसेन यांचा दिल खरच त्यांच्या बॅगेत आहे.

तर ही स्टोरी आहे ब्रिटनमधील सल्वा हुसेन यांची . जून 2017 मध्ये सुरू त्यांना एकदमच भयंकर दम लागला. श्वास घेण्यास त्रास होत असतानाही त्या कशातरी गाडी चालवून त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे पोहचल्या. फॅमिली डॉक्टरनं मग त्यांना एका स्‍थानिक रूग्‍णालयात रेफर केलं तिथं डॉक्‍टरांनी त्यांना गंभीर हृदयविकाराचा त्रास असल्याचं निदान केलं. चार दिवसांनंतर मग त्यांना एका मल्टीस्पेशियालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची धडपडत चालूच होती. त्यात निकामी झालेल्या हृदयाला मदत करण्यासाठी सपोर्ट पंप नसल्यामुळे त्या खूप आजरी पडल्या .

त्यांच्या मेडिकल कंडिशनमुळे त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करणं पण शक्य नव्हतं. 

मग डॉक्टरांनी निर्णय घेतला त्यांचं नैसर्गिक हृदय काढून त्याजागी कृत्रिम रोपण करण्याचा आणि त्यांच्या पाठीवरील बागेत एक विशेष युनिट लावण्याचा.
त्यांच्या नैसर्गिक हृदयाच्या जागी जी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे त्याला विज्ञानाचा चमत्काराचं म्हनावं लागेल. वास्तविक सल्वा यांच्या छातीत पॉवर प्लॅस्टिक चेंबर बसवण्यात आले आहेत. त्यातून 2 पाईप निघतात. ते पाइप बॅगेतील पंपाला जोडण्यात आले आहेत. मग तो पंप जो बॅटरीद्वारे चालविलेल्या इलेक्ट्रिक मोटरद्वारे त्या चेंबरना हवा देतो. या हवेद्वारे, चेंबर्स हृदयाप्रमाणे कार्य करतात आणि संपूर्ण शरीराला रक्त पुरवतात. या सिस्टिममध्ये चेंबर साल्वा यांच्या छातीच्या आत हेत तर पंप, मोटर आणि बॅटरी बाहेर असतात.सल्वा या तीन गोष्टी त्यांच्या बॅगेत ठेवतात.

बॅटरीचं डीसचार्ज होणं जीवावर बेतू शकतंय.
सल्वा हुसेन यांचे पती अल यांना नेहमी भीती असते की बॅटरी अचानक काम करणं बंद करणार नाही ना.

त्यांच्याकडे नवीन बॅटरी लावण्यासाठी फक्त ९० सेकंद असतात.


पण सल्वा या सगळ्या त्रासाला न जुमानता आनंदाने जगत आहेत.सल्वा हुसेन अशाप्रकारे राहणाऱ्या ब्रिटनमधील एकमेव महिला आहेत. सल्वा हुसेन विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. पण सल्वा या सगळ्या त्रासाला न जुमानता आनंदाने जगत आहेत, परंतु त्यांच्यासमोर एक आव्हानही असते. सल्वा यांचे हृदय ज्या पिशवीत ठेवलेले असते, ती नेहमी त्यांच्या सोबत असते.

भारताबद्दल बोलायचे झाले तर, NCRB च्या आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी 22 हजारांहून अधिक लोक गंभीर आजारांमुळे आत्महत्या करतात. सल्वा हुसेन यांची ही स्टोरी अशा लोकांना नक्कीच प्रेरणा देऊ शकते. 

हे ही वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.