सॅम माणेकशॉ यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या जवानांना बांगड्या भेट म्हणून पाठवल्या.

अशक्य हा शब्दच ज्याच्या शब्दकोशात नव्हता असे सॅम माणेकशॉ. गोरापान शिडशिडीत देह, चेहर्‍यावर पिळदार मिश्या अणि प्रसन्न भाव. हा रूबाबदार मिलिटरीचा अधिकारी भेटेल त्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव टाकत असे. त्यांच्यात हजरजबाबीपणा ही कमालीचा होता. त्यांना कोणीतरी विचारले तुम्ही फाळणीत पाकिस्तानात गेला असता तर काय झाले असते? ते म्हणाले,

” मग १९७१ चं युद्ध पाकिस्ताने जिंकले असते .”

ह्या उत्तरातून त्यांचा बलाढ्य आत्मविश्वास दिसून येतो.

सॅम माणेकशॉ यांचे वडील डॉक्टर होते. सॅमला पण डॉक्टर व्हायचे होते. शिक्षणासाठी त्याला लंडनला जायचे होते मात्र वडीलांनी नकार दिला. सॅमनी बंडखोरी केली अणि १ ऑक्टोबर १९३२ ला इंडिअन मिलिटरी अकादमीत प्रवेश मिळवला. ती मिलिटरी वेगळी होती ती ब्रिटीश इंडियन आर्मी होती जी स्वातंत्र्यानंतर इंडियन आर्मी झाली.

माणेकशॉ यांनी चाळीस वर्ष मिलिटरी मध्ये नोकरी केली. त्यात त्यांनी दुसरे महायुद्ध,१९६२ ची भारत चीन, पाकिस्तान बरोबरचे १९६५ आणि १९७१ च्या सर्व लढाया लढल्या. भारत-चीन आणि त्यानंतरची सर्व युद्ध भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वात लढली.

sam manekshaw

दुसऱ्या महायुद्धात त्यांना आठ गोळ्या लागल्या कोणालाच ते जगतील असे वाटले नाही पण अत्यंत चिवट वृत्तीचे माणेकशॉ त्यातून वाचले. त्यांची कामगिरी पाहून एका ब्रिटीश अधिकार्याने आपल्या खांद्यावरील प्रतिष्ठित मिलिटरी क्रॉस त्यांना दिला. १९६८ मध्ये नागालंड मधला आतंकवाद मोडून काढल्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण  देऊन त्यांच्या शौर्यास सन्मानित केले.

१९६९ साली त्यांना लष्कराचे प्रमुख पद देण्यात आले आणि त्यानंतरच झालेल्या १९७१ च्या भारत पाक युद्ध त्यांनी जिंकले. आजही त्यांना याच युद्धासाठी ओळखले जाते.१९७१ चं युद्धधात माणेकशॉंनी विक्रमी तेरा दिवसात पाकिस्तानची नांगी ठेचली.त्यानंतर बांगलादेश नावाच्या नवीन देशाच उदयास आला. १९७२ साली एकाहत्तरच्या लढाईतील कामगिरी बद्दल सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले.

तर भिडूनों हा किस्सा हे १९६२ च्या भारत चीन युद्धातला. त्याचं झालं असं की मिझोरम मध्ये तैनात असलेल्या एक बटालियनने हार समोर दिसतंय म्हणून युद्धातून अंग काढण्याचा प्रयत्न केला.

ही गोष्ट माणेकशॉ यांना कळाली. ते तेव्हा जनरल होते त्यांना प्रचंड संताप आला. त्यांनी मिझोरमच्या त्या बटालियनला बांगड्या पाठवल्या आणि पत्रात लिहिले,

“जर तुम्हाला लढायचे होत नसेल तर ह्या बांगड्या हातात घाला.”

त्यानंतर मात्र त्या बटालियनने युद्धात चांगली कामगिरी केली. माणेकशॉनी त्या बटालियनला परत पत्र पाठवले आणि अभिनंदन करून बांगड्या परत पाठवण्यास सांगितले.माणेकशॉ हाडाचे सैनिक होते. त्यांचे एक ब्रिदवाक्य होते.

“fight to win ” लढ्याचं तर जिंकण्यासाठीच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.