पुराना मंदीर मधलं भूत खऱ्या आयुष्यात इंजिनियर होतं, तेही IIT पासआऊट.

आज इंजिनियर्स डे. सध्याच्या काळात इंजिनियर काय करतायत..?

महाराष्ट्रातले १० टक्केच इंजिनियर जॉब करत असतील. उरलेले इंजिनियर सध्यस्थितीत MPSC,UPSC करत आहेत. त्यातून राहिलेले चार पाच वर्ष कॉलेज करुन पुन्हा एक्स्ट्रॉ क्लास करत आहेत. त्यातूनही काहीजण राहिले आहेत ते स्टॅण्डअप कॉमेडी, राजकारण, एकांकिका, शास्त्रीय संगीत, माय फोटोग्राफी आणि गणपतीची मुर्ती मातीच्या कुंडीत कशी विसर्जीत करावी याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. 

इतकां शिकवला म्हणून वडिल विचारायला आले तर त्यांना थ्री इडियन मधली आर. माधवनची क्लीप दाखवून वातावरण डाऊन करायचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. थोडक्यात या सर्व गोष्टीतून जे तावून सुलाखून बाहेर पडत आहेत ते कुठेतरी अरविंद केजरीवाल, चेतन भगत, अनिल कुंबळे, ओसामा बिन लादेन होण्याची स्वप्न पाहत आहेत. 

आज अशाच एका इंजिनियरची गोष्ट आम्ही आपणास सांगणार आहोत. तो इंजिनियर देखील साधा सुधा नव्हता तर IIT पासआऊट होता. त्याच नाव अनिरुद्ध उर्फ अजय अग्रवाल. त्याने योग्य वयात इंजनियर मधून पुढं करियर करायचं नाही ठरवलं आणि तो सिनेमात आला. 

रामसे ब्रदर्सच भूत अजय अग्रवाल ! 

अनिरुद्ध अग्रवाल अर्थात अजय अग्रवाल. या नावात तसा काहीच दम नव्हता. दम होता त्याच्या दिसण्यात. अजय अग्रवाल हा IIT रुरकीचा पासआउट. त्यांची उंची साडेसहा फूट. व्हिलन जसा दिसतो तसा त्याचा परफेक्ट चेहरा होता. कॉलेजच्या वयात त्याच्या शरीरामुळे तो खेळात पुढे होता. त्यानंतर तो मुंबईला आला ते हि खिश्यात शंभर रुपये घेवून. मुंबईत आला आणि काय करु लागला तर जॉब. पहिल्या फेरीत जसे सगळे इंजनियर करतात तसच. सिव्हील इंजनियर हि पदवी त्याला काम मिळण्यात बास होतीच. 

त्याच बरोबर अजयला फिल्म लाईनमध्ये शिरण्याची खुमखुमी होती. त्यातूनच त्याचा संबध वेगवेगळ्या डिरेक्टर सोबत येत गेला. तेव्हाच रामसे ब्रदर्स हे नाव फिल्मलाईनमध्ये गाजत होतं. तो व्हिलनचे छोटे मोठ्ठे रोल करतच होता. रामसे ब्रदर्सने त्याला मोठ्ठी ऑफर दिली.

ती ऑफर होती पुराना मंदिर मधल्या सामरी या भूताची.

फिल्म हिट झाली ती सामरीमुळे. सामरीच्या व्यक्तीरेखेमुळे अजय अग्रवाल आणि भूत हे समीकरण चांगलच जमलं. त्यानंतर बंद दरवाजा, सामरी यांसारख्या फिल्ममध्ये तो चमकून गेला.  बी ग्रेडचा व्हिलन अशी नवी ओळख त्याला मिळू लागली. अशातच मेन स्ट्रीम बॉलीवूडची नजर देखील त्याच्यावर गेली त्यातून राम लखन,मेला सारख्या फिल्म त्याने केल्या. फुलदेवीच्या आयुष्यावर बेतलेल्या बॅण्डेड क्वीन सिनेमात देखील हो चमकला. हॉलीवुडमध्ये देखील त्याला संधी मिळाली. 

नंतरच्या काळात भारतात ZEE TV ने दुरचित्रवाणीचं खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण केलं. ZEE हॉरर शो मधून अजय पुन्हा हिट झाला. दरम्यानच्या बॅन्डेड क्वीन सारख्या सिनेमातून त्याने वेगळी झलक देखील दाखवलीच होती पण तो लक्षात राहिला तो फक्त आपल्या भूतांच्या रोलसाठी. 

आज अजय काय करतो तर त्याने २०१० साली मल्लीका नावाचा सिनेमा केला होता. शेवटी त्याला सिनेमाच्या ऑफर येणं देखील बंद झाला आणि त्याला देखील तोच तो रोल करणं कंटाळवाण वाटू लागलं. 

मात्र या सर्वात भूत आणि अजय हे समीकरण प्रत्येकाच्या मनात हिट करण्यात अजय हिट झाला होता. त्याची दूसरी बाजू म्हणजे तो इंजनियर होता. तो देखील IIT मधून पासआउट झालेला. कदाचित तो पहिल्या पिढीतला इंजनियर होता ज्याने वेगळा मार्ग स्वीकारला. त्याला नंतरच्या काळात अनेकांनी विचारलं तु बॉलीवूडमध्ये येवून चुक केलीस का? तर तो हसत उत्तर द्यायचा कधीच नाही. 

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.