छ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक बनला

शिवछत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली ती बारा मावळातील सवंगड्याबरोबर. याच विश्वासू सोबत्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं, भगवा जरीपटका प्रत्येक संकटाच्या काळात आपल्या खांद्यावर उचलून धरला. त्याकाळात निर्माण झालेली परंपरा पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत चालत राहिली.

याच स्वामिनिष्ठ मावळ्यांमध्ये प्रमुख नाव येत खंडो बल्लाळ.

छ. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक बाळाजी आवजी चिटणीस हे त्यांचे वडील. बाळाजी आवजी यांचं खरं नाव बल्लाळ आवजी चित्रे असं होतं पण महाराजांचे खाजगी सचिव म्हणजे चिटणीस यापदी नेमणूक झाल्यावर त्यांनी आपलं आडनाव चिटणीस अस करून घेतलं.

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू असलेल्या बाळाजी आवजी यांचे वडील जंजिऱ्याच्या सिद्दीचे कारभारी होते. छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केल्यावर बाळाजी यांनी त्यांना एक पत्र पाठवून स्वराज्यात सामील होण्याची विनंती केली होती.

त्यांचं हस्ताक्षर पाहून खुश झालेल्या महाराजांनी त्यांना आपल्या पदरी ठेवून घेतलं.

बाळाजी आवजी यांनी शिवरायांच्या काळात अनेकदा आपल्या मुत्सद्देगिरीचं दर्शन घडवलं.

पण महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपतीपदाच्या गादीच्या सत्तासंघर्षात त्यांनी युवराज संभाजी महाराजांच्या ऐवजी महाराणी सोयराबाई यांची बाजू घेतली.

अण्णाजी दत्तो यांच्या सोबत केलेल्या कटकारस्थानात त्यांचाही सहभाग आढळल्यामुळे संभाजी महाराजांनी त्यांना व त्यांच्या भावाला हत्तीच्या पायाखाली चिरडून मारण्याची शिक्षा दिली.

बाळाजी आवजी यांचा पुत्र खंडोजी हा तेव्हा लहान होता. महाराणी येसूबाई यांनी हस्तक्षेप केल्यामुळे संभाजी महाराजांनी खंडोजी यांना अभयदान दिले.पुढे त्यांची हुशारी व स्वामीभक्ती पाहून चाकरीसाठी ठेवून घेतले.

छ.संभाजी महाराजांना खंडोजीनी सावली प्रमाणे साथ दिली.

महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत ते सहभागी असत. १६८३ साली पोर्तुगीजांच्या गोव्यावर जेव्हा शंभूराजे चालून गेले तेव्हा खंडोजी त्यांच्या सोबतच होते. जुवे बेटावर जेव्हा मराठ्यांनी हल्ला केला तेव्हाची रोमहर्षक घटना मनूची या लेखकाने लिहून ठेवली आहे.

संभाजी महाराजांनी ओहटीच्या वेळी आपले चार हजार सैन्य पाठवून सँटो एस्टेव्होचा किल्ला ताब्यात घेतला. मराठ्यांनी किल्ल्यातील सर्व शिबंदीची कत्तल केली. किल्ला ताब्यात आला याचा इशारा म्हणून या सैनिकांनी तोफेचे गोळे गोव्याच्या दिशेने सोडले.

त्यावेळी गोव्यात विलक्षण गोंधळ उडाला. दि.२५-११-१६८३ या दिवशी सकाळी ७ वा. सुमारास विजरई कोंदि द आल्व्होर याने ४०० शिपायांसोबत जुवे बेटाकडे कूच केले. मराठ्यांचे सैन्य जणू वाटच बघत बसले होते.

पोर्तुगीज सैन्याने माऱ्याच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी हल्ला चढवला व पोर्तुगीजांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. या लढाई मधे विजरई घायाळ झाला.

जुवे बेट मराठ्यांच्या ताब्यात गेल्यामुळे नदीच्या बाजूस लागून ज्या शेतीच्या जमिनी होत्या त्याचे बांध पोर्तुगीजांनी फोडून टाकले. त्यामुळे जवळील मांडवी नदीचे पात्र वाढू लागले.  त्यांच्या सोबत आता विजरई कोंदि द आल्व्होर हा देखील पळत सुटला.

तो तीरावर पोहोचताच एका मचव्यात बसला आणि पळाला.

संभाजी महाराज देखील तीरावर पोहचले विजरई कोंदि द आल्व्होर याला मचव्यात बसून जाताना पाहताच त्या तुडुंब भरलेल्या मांडवी नदीच्या पात्रात संभाजी महाराजांनी आपला घोडा घातला !

आपल्या जीवाचे काय बरे वाईट होईल याची पर्वा देखील संभाजी महाराजांनी केली नाही.

नदीला आलेल्या भरतीमुळे संभाजी महाराजांचा घोडा बुडू लागला यावेळी खंडो बल्लाळ तिथे शंभूराजांसोबत सोबत होते. घोडा बुडू लागलेला पाहताच, त्यांनी देखील त्या नदीच्या पात्रात उडी घेतली आणि जावून संभाजी राजांचे प्राण वाचवले.

त्यांच्यावर चालून आलेल्या पोर्तुगीज सैनिकांचे शीर कलम केले.

एकेकाळी याच खंडोजींच्या वडिलांना महाराजांनी हत्तीच्या पायदळी देण्याची शिक्षा दिली होती. खंडोजीची स्वामिनिष्ठा इतकी प्रखर होती की त्याने कोणताही द्वेष न ठेवता छ. संभाजी महाराजांसाठी आपले प्राण पणाला लावले. बखरीमध्ये नोंद आहे,

संभाजी महाराजांनी बहुत संतोष होऊन पोटाशी धरिले, घोडा बक्षिस दिला, खासा उतारपोशाख दिला. मोत्याची कंठी व तुरा दिल्या. सोबत पालखीचा मान दिला.

तेव्हा पासून महाराष्ट्रात एक म्हण रूढ झाली.

होता खंडो म्हणून वाचला शंभो

छ.संभाजी महाराजांनी खंडोजी यांना चिटणीसपदाची वस्त्रे दिली. महाराजांना अखेरच्या क्षणापर्यंत खंडोजी यांनी साथ दिली.

त्यांना दगाफटका करून औरंगजेबाच्या सैन्याने पकडले तेव्हा संगमेश्वर येथे उपस्थित असलेल्या खंडोजी व संताजी घोरपडे या वीरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर राजाराम महाराजांचे चिटणीस म्हणून देखील खंडो बल्लाळ यांनीच कार्य केलं.

राजाराम महाराज यांना औरंगजेबाच्या मगरमिठीतुन वाचवून जिंजीला पाठवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

त्यांच्या मुत्सदेगिरीचा उपयोग पुढे महाराणी ताराबाई यांनी देखील करून घेतला. शंभू पुत्र शाहू महाराज स्वराज्यात परतल्यावर त्यांनी देखील आपला वैयक्तिक मदतनीस म्हणून खंडो बल्लाळ यांची नेमणूक केली.

अखेरच्या क्षणापर्यंत ते स्वामिनिष्ठ राहिले. त्यांच्या पुढच्या पिढ्यादेखील सातारच्या छत्रपती घराण्याच्या चिटणीसपदी राहिल्या.

हे ही वाच भिडू.

 

4 Comments
 1. आकाश+पवार says

  काय चुतीयापणा आहे , बाळाजी आवजी सिद्दी चे कारभारी होते 😂 अरे ब्रिगेडी इतिहासकार , इतिहासाच्या पुराव्याच्याआधारे किती तरी लेखकांनी हे लिहून ठेवलंय की बाळाजी आवजी ज्यांना कोकणात कोणी तरी (नाव नाही आठवत) त्यांना संबाळल होत महाराज जेव्हा कोकण च्या मोहिमेत गेले होते तेव्हा त्यांनी त्यांना स्वराज्यात सामील करून घेतलं होतं , त्यांचं अक्षर बघून
  किती बेअक्कल लोक असतात ते आज समजलं भिडू 😂

 2. Vikas says

  Beakkal 🙄 kahi chukiche asel tr samjun sang pn shivigal karnyatch kay mardangi watte kalat nay, ekhada aaplya vicharashi, matashi, mahitishi sahmat aslach pahije ha attahas ek divas saglyanna gheun dubnaar. Sabhya mansagat sanwad karayla shika mg dusryala beakkal siddh kara. 🙏

 3. Vivek says

  ChAn ahe khup vichar purvak lihilay…..

 4. *ajay chitnis says

  काहीच माहीत नसतांना काहीपण लिहू नये बालाजीचे वडील सिद्दीचे कारभारी होते त्यांना सिद्दीने मारले आणि बाळजीना त्यांच्या मामांनी सांभाळले कोणीतरी नाही मराठी माणसांच्यामध्ये द्वेष पसरू नका पण कावीळ झालेला काय कळणार

Leave A Reply

Your email address will not be published.